‘हॅलो, मी गज्या बोलतो.. मारणे’ हे ऐकताच नीलेशभाऊंचा फोन व हात दोन्ही थरथरायला लागले. तरीही ‘आलिया भोगासी’ असे म्हणत धीर एकवटून ते बोलले. ‘अरे, तुझ्यामुळे मी कमालीचा अडचणीत आलो आहे. मदतीची परतफेड म्हणून सत्कार ठीक पण फोटो व्हायरल करायची काय गरज होती?’ हे ऐकून गडगडाटी हास्य करत गज्या बोलला. ‘भाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका. गज्याला ओळखतसुद्धा नाही असे जाहीर करा. जे लोक मला नाकारतात त्यांनाच मी मनापासून स्वीकारत असतो. आपला धंदाच असा आहे भाऊ, त्याला तुम्ही तरी काय करणार? एकदा का तुम्ही नाकारले की लोक ‘लंकेत सोन्याच्या विटा’ म्हणून चर्चा सोडून देतील’ हे ऐकून हा गुंड असला तरी बुद्धिमान असल्याची जाणीव भाऊंना झाली. ‘अरे, पण फोटो बाहेर आल्यावर नाकारू कसे?’ भाऊंकडून हा प्रश्न ऐकताच गज्या उत्साहाने बोलू लागला. ‘त्यात काय सोप्पय.. गज्या आमच्याच एरियात राहात होता. धंदा करावा म्हणून मी त्याला वडापावची गाडी लावून दिली होती. नंतर तो गुंडगिरीकडे कसा वळला ते ठाऊक नाही असे सांगा’ हे ऐकून भाऊ आणखी अस्वस्थ झाले. ‘अरे, पण यातून तुझी माझी ओळख आहे व मी सत्कार जाणीवपूर्वक स्वीकारला हे लोकांना कळेल ना!’ गज्या क्षणभर गोंधळला. नंतर लगेच सावरून म्हणाला ‘मग असे सांगा की त्याच्या गुंडगिरीविषयी मला फारसे ठाऊक नाही, पण तो कायम गरिबांना मदत करतो. केवळ पुणे ग्रामीणच नाही तर नगपर्यंत त्याने उपकृत केलेल्यांची संख्या मोठी आहे. राजकारणात सर्वाची मदत घ्यावी लागते. त्याच्यावर गुन्हे असले तरी तो सन्माननीय मतदार आहे. त्यामुळे आभारादाखलचा हा सत्कार स्वीकारून मी चूक केली नाही’ हे ऐकून भाऊ जाम चिडले. ‘माझ्या तोंडून तुला स्वत:ची तारीफ करून घ्यायची का? अरे, राजकारणात इतके खरे कधीच बोलायचे नसते. तुझा माझा संबंध लोकांना दिसायलाच नको. शेवटी काहीही झाले तरी लोकांच्या नजरेत तू एक गुंड व मी अभ्यासू राजकारणी अशीच प्रतिमा राहील असे उत्तर हवे. बाकी तुझी जी कामे असतील ती करतोच की मी’ हे ऐकल्यावर गज्याचा नाईलाज झाला. स्वप्रतिमेला घाबरणारे हे लोक बघून त्याला मनातल्या मनात हसू आले.

मग डोके खाजवता खाजवता त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. ‘हे बघा भाऊ, तुम्ही असे सांगा की मी रस्त्याने जात होतो. काही लोक हारतुरे घेऊन उभे होते. त्यांनी सत्कारानंतर मला एका घरात नेले. तिथे टोपी घातलेल्या एकाने माझा सत्कार केला. फोटो व्हायरल झाल्यावर मला कळले की तो गज्या मारणे होता’ हे ऐकताच भाऊ एकदम खुशीत आले. असे स्पष्टीकरण आपल्या चेहऱ्यावर असलेल्या निरागसतेशी साधम्र्य सांगणारे हे लक्षात येताच ते म्हणाले ‘खूप खूप आभार गज्याभाऊ, माध्यमांच्या कैचीतून तुम्ही माझी मान अलगद सोडवलीत. मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात असला तरी तो बुद्धिमत्तेची चमक दाखवतोच. तू आज तेच सिद्ध केलेस. अगदी अरुण गवळीसारखे. भेटू लवकरच’ मग फोन ठेवून ते घराबाहेर तिष्ठत असलेल्या माध्यमांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले.

Loksatta editorial NCERT changes in 12th Political Science book a
अग्रलेख: ‘गाळीव’ इतिहासाचे वर्तमान!
Loksatta editorial The Agnipath scheme introduced to divert expenditure on soldiers to material is controversial
अग्रलेख: ‘अग्निपथ’ची अग्निपरीक्षा!
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
Loksatta editorial Safety of Railway Passengers Railway accidents in West Bengal
अग्रलेख: ‘कवच’ काळजी!
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
Loksatta editorial A unilateral ceasefire proposal by Russian President Vladimir Putin Ukraine
अग्रलेख: मतैक्याचे मृगजळ..
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!