आपल्याकडे शरद तळवलकर, राजा गोसावी, दादा कोंडके, सुहास भालेकर, राजा मयेकर, अशोक सराफ, विजय चव्हाण, सुधीर जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव ते अगदी अलीकडच्या काळात वैभव मांगले, संतोष पवार, मकरंद अनासपुरे, भाऊ कदम, भारत गणेशपुरेपर्यंत विनोदी नटांचे अगदी मायंदाळ पीक कलाक्षेत्रात आलेले दिसते. त्यातही या प्रत्येकाची खासीयतही न्यारी. कुणी वाचिक अभिनयातून, तर कुणी देहबोलीतून, तर कुणी आपल्या हजरजबाबीपणाने विनोदाचे गारूड निर्माण करणारे. मुंबईच्या गिरणगावातून यातले अनेक कलाकार घडले. त्यात विजय कदम हे नावदेखील प्रकर्षाने घ्यावे लागेल. शिरोडकर हायस्कूलमध्ये जाताना वाटेत दिसणाऱ्या भिन्न भिन्न वृत्ती-प्रवृत्तीच्या नमुनेदार माणसांच्या गमती स्वत: अनुभवताना त्यांच्या नकला करायची सवयही त्यांना लागली. अशा चुणचुणीत, हरहुन्नरी मुलाकडे सर्वांचे लक्ष साहजिकच जाते. त्यामुळे शाळेत नकला आणि बालनाट्यापासूनच विजय कदम यांचे रंगमंचावर पदार्पण झाले नसते तरच नवल.

मग गणेशोत्सव वगैरे व्यासपीठे गाजवत ते कलाकार म्हणून हळूहळू घडत गेले. ‘टुरटुर’ या नाटकाने पुढच्या काळात नावाजलेल्या अनेक कलाकारांना जन्म दिला. त्यात विजय कदम हेही एक. पण ‘अपराध कुणाचा?’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. ‘रथचक्र’, ‘स्वप्नगाणे संपले’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘हलकंफुलकं’, ‘आम्ही आलो रे’ अशा नाटकांतून ते झळकत राहिले. ‘आम्ही आलो रे’मध्ये तर ते आणि संजय नार्वेकर भुताच्या भूमिकेत जी काही धमाल आणायचे त्याने प्रेक्षक हसून हसून बेजार व्हायचे. ‘हलकंफुलकं’मध्ये त्यांनी सात-आठ वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या होत्या. खरे तर ते जात्याच सोंगाडे- त्यांच्यात एक मिश्कील, हजरजबाबी लोककलावंत दडला होता. दादा कोंडकेंनंतर ‘विच्छा माझी पुरी करा’ खऱ्या अर्थाने त्यांनीच गाजवले; त्यावर आपली मोहोरही उमटवली, याचे कौतुक दादा कोंडके यांनीही केले होते. नंतरच्या काळात त्यांनी आपल्यातल्या बहुरंगी, बहुढंगी कलाकाराचे सम्यक दर्शन घडवणारा ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम सादर केला. त्याचे देश-विदेशात बरेच प्रयोग झाले. त्यांची मूळ पिंडप्रकृती ही लोककलावंताची होती. भूमिकेबरहुकूम त्यात बदल करण्याचे कसब त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांनी पुढे चित्रपटांतूनही छोट्या-मोठ्या भूमिका लीलया साकारल्या. मालिकांचे क्षेत्रही त्यांना वर्ज्य नव्हते. ‘पार्टनर’, ‘गोट्या’, ‘दामिनी’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘ती परत आलीय’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांत ते रमले. ‘श्रीमान श्रीमती’, ‘मिसेस माधुरी दीक्षित’, ‘घर एक मंदिर’सारख्या हिंदी मालिकांतूनही ते चमकले. हजरजबाबीपणा, भाषेच्या गमतीजमती, सहज मुद्राभिनय लाभलेल्या विजय कदम यांचे अकाली जाणे रसिकांना निश्चितच चटका लावणारे आहे.

ex bjp mp sanjay kaka patil meet sharad pawar
संजयकाका पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला; सांगलीच्या राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
minister dharmarao baba atram face double challenge in aheri assembly constituency
कारण राजकारण : मुलीच्या बंडामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान !
chhatrapati sambhaji raje slams of dhananjay munde for busy in cultural events
शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
Film critic Aruna Vasudev passed away
चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
What Indrjit Sawant Said About Devendra Fadnavis?
Indrajit Sawant : “छत्रपती शिवरायांनी दोनदा सूरत लुटलं, राजकारणासाठी इतिहास…”, इंद्रजित सावंत यांची फडणवीसांवर टीका
What Indrajit Sawant Said?
Indrajit Sawant : “शिवछत्रपतींचे स्मारक हे घाईगडबडीत तयार करुन..”, इतिहासकार इंद्रजित सावंत यांचा आरोप