‘सोल (१९८८) ऑलिम्पिक दिमाखदार होते. बार्सिलोनाचा (१९९२) उद्घाटन सोहळा भपकेबाज होता. अटलांटा (१९९६) पूर्णपणे व्यावसायिक होते. सिडनी (२०००) युवा स्वयंसेवकांचा वावर असूनही अतिशय सुसूत्रपणे पार पडले. ग्रीसची अर्थव्यवस्था कोलमडणार याचे संकेत अथेन्समधून (२००४) मिळाले. बीजिंग (२००८) महाग होते. लंडन (२०१२) चैनीच्या भानगडीत न पडता यथास्थित आटोपले. आर्थिक स्थिती दोलायमान असूनही रियो (२०१६) कसेबसे पूर्णत्वाकडे नेण्यात आले…’ आठ ऑलिम्पिक स्पर्धांचे वार्तांकन करण्याची संधी मिळालेले हरपालसिंग अलीकडेपर्यंत प्रत्येक स्पर्धेच्या आठवणी रंगून सांगायचे, त्याविषयी लिहायचेही. ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धांच्या वार्तांकनाचा एक विशाल पटच हरपालसिंग यांच्या निधनामुळे इतिहासजमा झाला. परंतु क्रीडा वार्तांकन आणि वृत्तसंस्था वार्तांकनाविषयी त्यांनी सांगितलेले आणि लिहिलेले अनुभव असंख्य पत्रकारांसाठी संदर्भखजिना ठरले.

यूएनआय या वृत्तसंस्थेमध्ये उपसंपादक म्हणून १९८०मध्ये हरपालसिंग यांची कारकीर्द सुरू झाली. पुढे ते या संस्थेचे सर्वांत युवा क्रीडा संपादक बनले. ४० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत आठ ऑलिम्पिक स्पर्धा, अनेक आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धा, हॉकी आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, जागतिक व राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धांचे वार्तांकन त्यांनी केले. अखेरच्या टप्प्यात ‘द स्टेट्समन’चे संपादकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. हरपालसिंग परखड मतांसाठी ओळखले जात. खासगी वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट झाल्यानंतरही ते दूरदर्शन व ऑल इंडिया रेडिओच्या कार्यक्रमांनाच हजेरी लावत. परखड मते मांडतानाही त्यांच्या स्वभावात उग्रपणा नव्हता. व्यक्तिमत्त्वात हजरजबाबीपणा आणि लिखाणात नर्मविनोद दिसून येत असे.

Team India coach Gautam Gambhirs support staff
Team India : गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये मॉर्ने मॉर्केलसह ‘या’ चार माजी दिग्गजांची लागू शकते वर्णी, जाणून घ्या कोण आहेत?
Symphony Limited, Air Cooler Market, Global Presence of Symphony Limited, Symphony Limited company, Symphony Limited company share, stock market, share market, share market portfolio, investment article, finance article,
माझा पोर्टफोलियो : हवेत थंडाव्याचा स्वरसंघ, सिम्फनी लिमिटेड
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
2024 copa america colombia beat uruguay to reach copa final
कोलंबियाची दमदार कामगिरी कायम; उरुग्वेला हरवत अंतिम फेरीत; लेर्माचा निर्णायक गोल
Andre Russells six hit video viral
MLC 2024: विराटनंतर रसेलनेही हरिस रौफला दाखवले तारे, ३५१ फूट उंच मारलेल्या षटकाराचा VIDEO व्हायरल
Vande Mataram Singing Plan Video Viral
Victory Parade : विराट कोहलीने आधीच योजना बनवली होती का? ‘वंदे मातरम’ गाण्यापूर्वीचा VIDEO आला समोर
argentina beat ecuador in copa america
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मार्टिनेझमुळे अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत; इक्वेडोरला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत उपांत्य फेरीत
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल

वार्तांकनासाठी आवश्यक दोन गुणांसाठी हरपालसिंग नेहमी ओळखले जात – वस्तुनिष्ठपणा आणि वक्तशीरपणा. पण भारतीय हॉकीविषयी लिहिताना काही वेळा त्यांच्या वस्तुनिष्ठपणावर भावना स्वार होत असे. खेळावरील प्रेमामुळेच ते क्रीडा वार्तांकनाकडे वळले. अन्यथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून एमए आणि एमफिल मिळवून विद्यामान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या समकालीन मित्राच्या वाटेनेही त्यांना जाता आले असते. महान क्रिकेटपटू बिशनसिंग बेदींशी त्यांची घनिष्ठ दोस्ती होती. क्रीडा वर्तुळात हे दोघेही त्यांच्या आद्याक्षरांनी म्हणजे ‘बीएसबी’ आणि ‘एचएसबी’ म्हणून ओळखले जात. ऑलिम्पिकमध्ये केवळ हॉकीचे वार्तांकन करण्यासाठीच जायचो, असे म्हणणारे हरपालसिंग बेदी अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये भारतीय पदकांचा चढता आलेख पाहून सुखावले होते. पण हा बदल होत असताना, हरपालसिंग मात्र तब्येतीने खचत होते आणि अखेरीस कायमचे शांतावले.