पारितोषिकांमध्ये संगीतातील परमोच्च समजल्या जाणाऱ्या २८ ग्रॅमी बाहुल्या, २९००हून गाण्यांमध्ये निर्माता-नियोजक- संगीतकार म्हणून सहभाग, ५० हून अधिक चित्रपट आणि मालिकांचे पार्श्वसंगीत. यांपैकी निम्मे कार्य झाले असते, तरी क्विन्सी जोन्स यांचे नाव अमेरिकी संगीत इतिहासातून काढता आले नसते. पण जोन्स काही तितक्यावरच थांबले नाहीत. विल स्मीथ, ओप्रा विन्फ्रे यांसारख्या कित्येक डझनांहून अधिक कलाकारांची कारकीर्द ही क्विन्सी जोन्स या व्यक्तीने घडविली. त्या कित्येक डझनांपैकी सर्व खंडात ज्ञात असलेले नाव म्हणजे मायकेल जॅक्सन. ‘एमटीव्ही’ वाहिनी अमेरिकेत जन्मास येण्याचा (१ ऑगस्ट १९८१) आणि जॅक्सनचा दुसरा आल्बम ‘थ्रिलर’ (१९८२) येण्याचा काळ समांतर. जगातील सर्वाधिक विक्री झालेल्या या आल्बमचा निर्माता क्विन्सी जोन्स होता. १९३३ साली जन्मलेल्या आणि शिकागोतील स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये चर्चमधील संगीतावर पोसलेल्या जोन्स यांनी भवताल गुन्हेगारीने भरलेला पाहिला. महायुद्धानंतर त्यांच्या पालकांना सिएटलमध्ये स्थलांतर करावे लागले. तिथल्या छोट्या हॉटेल्स आणि बारक्लबांतील बॅण्डमध्ये ‘ट्रम्पेट’वादक म्हणून उमेदवारी करीत, विविध शिष्यवृत्त्यांमधून संगीत महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत जोन्स यांची कला बहरली. अंध संगीतकार रे चार्ल्स याच्यासह काही काळ उमेदवारी करून युद्धोत्तर काळातील संगीतपटलावर चमकणाऱ्या सर्वच काळ्या कलाकारांसह काम केले. ‘रॉक अॅण्ड रोल’, ‘जॅझ’,‘ऱ्हिदम अॅण्ड ब्लू’ या साऱ्या प्रकारांतील संगीतांचे एकत्रीकरण केले.

हॉलीवूडमध्ये चित्रपटांत- संगीतात प्रयोग होत असतानाच कृष्णवर्णीय कलाकारांची फळी त्यात महत्त्वाची भूमिका बजावत होती. फ्रॅन्क सिनात्रा आणि काऊण्ट बेसी यांना एकत्र करणाऱ्या कार्यक्रमांचे संयोजन त्यांनी केले. ‘पॉनब्रेकर’ या चित्रपटापासून त्यांची कारकीर्द विस्तारली. अॅलिस वॉकर यांच्या ‘कलर पर्पल’ या कादंबरीवर सिनेमा उभारायचे धाडस त्यांनी केले. शॉन कॉनरी यांच्या गोल्डफिंगरपासून माईक मेअर्सच्या ‘ऑस्टिन पॉवर्स’पर्यंत क्विन्सी जोन्स यांचे संगीत ऐकू येते. या वर्षी देखील ‘लोला’ नावाच्या चित्रपटासाठी त्यांनी ‘म्युझिक प्रोड्युसर’ म्हणून शेवटची भूमिका बजावली. इथिओपियामधील दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यासाठी १९८५ साली ‘वुई आर द वर्ल्ड’ या गाण्याचे त्यांनी केलेले संयोजन सर्वाधिक ऐकले-पाहिले गेलेले मानले जाते. ‘क्यू’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या पुरस्कारांचा तपशिलाने १८ पाने व्यापली आहेत, पण त्या पुरस्कारांनाही थिटे पाडणारे त्यांचे संगीतातील काम किती आहे, हे वाचल्यास त्यांच्या मृत्यूनंतर जगातील सर्व माध्यमांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचे महत्त्व कळेल.

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Uddhav Thackeray Chief Minister Career Public welfare works
दिखावा विरुद्ध सलोखा!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Story img Loader