scorecardresearch

Premium

व्यक्तिवेध : बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम्

निर्यातवृद्धीची नितांत गरज देशास असताना, या क्षेत्रातील अनुभवी म्हणून ओळखले जाणारे सुब्रह्मण्यम् नीति आयोगातील पद स्वीकारत आहेत.

niti aayog ceo bvr subrahmanyam
बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम्

‘नीति आयोगा’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीची घोषणा २० फेब्रुवारी रोजी झाली, त्यामुळे त्यांच्या याआधीच्या कारकीर्दीकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे. सनदी अधिकारी  म्हणून केंद्रात वाणिज्य सचिवपदापर्यंत काम केल्यानंतर निवृत्त होऊन, व्यापारमेळे भरवणाऱ्या ‘इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती १६ सप्टेंबर २०२२ रोजी झाली होती. सप्टेंबरअखेरीस त्या पदाचा कार्यभार प्रत्यक्ष स्वीकारणाऱ्या सुब्रह्मण्यम् यांनी, सहा महिन्यांपेक्षा कमी काळ त्या पदावर काढून नीति आयोगात प्रवेश केला आहे.

निर्यातवृद्धीची नितांत गरज देशास असताना, या क्षेत्रातील अनुभवी म्हणून ओळखले जाणारे सुब्रह्मण्यम् नीति आयोगातील पद स्वीकारत आहेत. मूळचे आंध्र प्रदेशचे, इंजिनीअरिंगपर्यंत (१९८३) दिल्लीतच शिकलेले आणि पुढे ‘लंडन बिझनेस स्कूल’मधून व्यवस्थापनाची पदवी मिळवणारे सुब्रह्मण्यम् हे १९८७ च्या बॅचचे, छत्तीसगड केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी. २००४ ते २००८ या काळात ते तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्वीय सचिव होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत ते जागतिक बँकेतील भारतीय अधिकारी होते, पण तेथून परतल्यावर पुन्हा (२०१२-१५) ते पंतप्रधान कार्यालयात रुजू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात त्यांची पाठवणी छत्तीसगडमध्ये झाली, तेथे गृह सचिव म्हणून काम केल्यावर त्यांना तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्यामध्ये धाडून मुख्य सचिवपद देण्यात आले. ५ ऑगस्ट २०२० च्या राज्य-विभाजन आणि विशेष दर्जा रद्दीकरण निर्णयांची कल्पना असणाऱ्या फार थोडय़ा अधिकाऱ्यांपैकी सुब्रह्मण्यम् होते, असे ‘प्रेस ट्रस्ट’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या निर्णयाची तरफदारी करताना मुख्य सचिव पदावरून त्यांनी काढलेले, ‘नाही तरी या राज्याचे प्रशासन मोडकळीलाच आलेले आहे..’ हे उद्गार वादग्रस्तही ठरले होते.

kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की
Marathi Kirtankar Bharti Tai Adsul
इन्फ्लुअन्सर नव्हे, किर्तनकार! तरुणांना अध्यात्माची गोडी लावणाऱ्या २४ वर्षीय भारतीताई आडसूळ कोण?
Nitin Gadkari
“चांगलं काम करणाऱ्याला सन्मान मिळत नाही, अन् वाईट…”, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
nirmala sitharaman budget speech
२०१४ पूर्वीच्या कामगिरीवर श्वेतपत्रिका; विकासाचा तुलनात्मक आढावा घेण्याची घोषणा

मनमोहन सिंग तसेच नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यालयात काम करणारे ते जसे एकमेव, तसेच जम्मू-काश्मीर राज्य आणि त्याच नावाचा लडाखविना उरलेला केंद्रशासित प्रदेश या दोन्हीचे मुख्य सचिवपद सांभाळणारेही ते एकटेच. तेथून त्यांना दिल्लीच्या उद्योग भवनात, वाणिज्य खात्याचे सचिव म्हणून आणण्यात आले.

नियोजन आयोगाचे रूपांतर ‘नीति आयोगा’त झाल्यानंतर नियोजन आयोगाच्या सचिव सिंधुश्री कुमार याच नव्या आयोगाच्या सीईओपदी गेल्या. २०१६ मध्ये अमिताभ कांत यांची नियुक्ती त्या जागी करण्यात आली, तर जून २०२२ च्या अखेरीस परमेश्वरन अय्यर हे नीति आयोगाचे सीईओ झाले. पंतप्रधान हेच पदसिद्ध अध्यक्ष ही नियोजन आयोगाची रीत नीति आयोगाने कायम ठेवली असून धोरणात्मक महत्त्वाच्या उपाध्यक्ष पदावर आजपर्यंत अरविंद पानगढिया (जानेवारी २०१५- ऑगस्ट २०१७), राजीव कुमार (ऑगस्ट २०१७ ते एप्रिल २०२२) आणि सुमन बेरी (विद्यमान) यांनी काम केले आहे. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Niti aayog ceo bvr subrahmanyam personal information zws

First published on: 22-02-2023 at 05:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×