नॉफ डबलडे या जगप्रसिद्ध प्रकाशनाचीच शाखा असलेली ‘आऊटसायर एडिशन्स’ गेल्या वर्षी सुरू झाली ती नजीकच्या भूतकाळात गाजून गायब झालेल्या पुस्तकांना पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी. ऐंशी-नव्वदीच्या दशकात भरपूर चर्चा झालेल्या आणि आता दुकानांत-वाचनालयांत कुठेच उपलब्ध नसलेल्या पुस्तकांचा जीर्णोद्धार करणे हा तिचा मुख्य उद्देश. याच आठवड्यात त्यांची सहा पुस्तके नव्याने आली. त्यात शिवा नायपॉल यांच्या ऐंशी सालातील गाजलेल्या रिपोर्ताजाचे पुस्तक ‘जर्नी टू नोव्हेअर’ आहेच. त्याशिवाय केट ब्रेव्हरमन या लेखिकेचा लॉस एंजेलिसमधील महिलांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला ‘स्क्वॉण्डरिंग द ब्लू’ हा कथासंग्रहदेखील नव्या प्रस्तावनेसह दाखल झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून या नव्या आवृत्तीनिमित्ताने नव्वदीत लेखिकांना धाडसी लिहिण्यास प्रवृत्त करणार्या ब्रेव्हरमन आणि तिच्या बर्यापैकी अदृश्य झालेल्या पुस्तकावर चर्चा होत आहे. कवी, कादंबरीकार आणि कथालेखिका असा एकूण १२ पुस्तकांचा तिचा प्रवास. ३५ वर्षांच्या विरामानंतर नव्याने येणारे हे पुस्तक आजही स्फोटक का आहे, हे सांगणारा ताजा लेख. त्यासह केट ब्रेव्हरमनचे कोकेनग्रस्त तारुण्य ते व्यसनमुक्त काळातील कथालेखन शिकवणारा वर्ग असा जीवनपट चितारणारा काही वर्षांपूर्वीचा एक उत्तम लेख.
https:// tinyurl. com/3 sxyn34 k
https:// tinyurl. com/ bdhrmd47
मुखपृष्ठाचे नेटफ्लिक्सीकरण…
ताज्या गाजत असलेल्या पुस्तकांच्या मालिका ‘नेटफ्लिक्स’वर तरळण्याचा प्रवाह दहा वर्षांपासूूनचा. पण पुस्तक खरेदीदेखील आणखी विस्तारावी म्हणून नव्या पिढीला पुस्तकांकडे ओढण्यासाठी त्यांच्या मुखपृष्ठावर ‘नेटफ्लिक्सने मालिका आणली बरे का यावरती’ अशा स्टिकर्सची क्लृप्ती अलीकडची. तर हा प्रकार न आवडणार्या नव्या पिढीच्या लेखिकेचाच निबंध.
https:// tinyurl. com/ yhars644
द ओडिसी आणि लेखनखोड…
ख्रिस्तोफर नोलन यांनी होमरच्या ‘द ओडिसी’ या महाकाव्यावर रचलेला चित्रपट पाहण्यात आणि त्यावर बेछूट व्यक्त होण्यात उद्याच्या सुटीकालापासून भारतीय समाजदेखील जोरावर असेल. गेल्या आठवड्यापासून हा चित्रपट ‘सायको थ्रिलर’ असल्याच्या संदिग्ध माहितीचा पूर आला आहेच. तर या वेगवेगळ्या ठिकाणी छापून आलेल्या जोडलेखांतील पहिला ‘ॲन इडियट्स गाइड टू रिडिंग द ओडिसी’ या शीर्षकाचा- पुस्तकावरचाच पण सिनेमामुळे जन्मलेला. दुसर्यात पुस्तकप्रेमीने नोलनच्या पटकथेतील आणि सिनेमातील दोषांचा पाढा वाचला आहे.
https:// tinyurl. com/5 dnu6 sxe
https:// tinyurl. com/45 dy5 byd
