‘अमुक मुलाचा अमुकच बाप, असा निर्णय सरमिसळ व्यवहारामुळे करता येत नसे, परंंतु अमुक मूल अमुक स्त्रीच्या पोटी जन्मले, हे निश्चित असल्यामुळे आईवरून मुलाला अन्यव्यावर्तक नाव मिळे. जसे विनता या स्त्रीच्या मुलाचे नाव वैनतेय. संभवपर्वात व हरिवंशाच्या पहिल्या तीन अध्यायांत प्रजापतीच्या संततीचे वर्णन व्यास करीत आहेत खरे, परंतु प्रजापतीच्या त्या संततीची परंपरागत पुराणांवरून व्यासांनी दिलेली सर्व नावे आयांच्या नावांवरून पडलेली नावे आहेत’, ही महत्त्वाची वस्तुस्थिती राजवाड्यांनी वाचकांच्या निदर्शनाला आणून दिली आणि लगेच मातृनाम व अपत्यनाम अशा जोड्यांची यादीही जोडली. त्याचा अर्थ स्पष्ट करीत पुढे लिहिले, ‘आर्य समाजात प्रजापतिसंस्था स्थापन होण्यापूर्वी अपत्ये ्त्रिरयांच्या नावाने ओळखली जात म्हणजे पूर्वी वंशावतरण ्त्रिरयांच्या अधीन असे, पुरुषांच्या नसे. म्हणजेच ्त्रिरया वंशप्रवर्तक असत. पुरुष नसत.’

याच निमित्ताने त्या प्राचीन काळी सरमिसळ समाजात घडून आलेल्या एका क्रांतीबद्दलची माहिती राजवाड्यांनी सांगितली. त्यांनी लिहिले, ‘सर्व मुले सर्व ्त्रिरयांची सामायिक समजण्याची चाल मागे पडून अमुक मूल अमुक स्त्रीचे असे वैशिष्ट्यीकरण सुरू झाले. सामायिक मातृत्व जाऊन वैयक्तिक मातृत्व उदयास आले. सामायिक कळपातील अपत्यांच्या माता ज्या ्त्रिरया त्यांच्याकरवी प्रथम अस्पष्ट विभाजन प्रचलित झाले. आई व तिची अपत्ये हे अस्पष्ट कुटुंब झाले. कळपातील प्रजननक्षम अशा सर्व ्त्रिरयांची अशी अस्पष्ट कुटुंबे झाली. अद्याप ही सर्व कुटुंबे पृथक् पृथक् विभक्त होऊन एकापासून दूर राहू लागली नव्हती. सर्व कुटुंबे कळपातच असत.

स्त्रियांशी समागम कळपातील वाटेल तो पुरुष करीतच असे. पुढे ्त्रिरयास्त्रियांत आपापल्या अपत्यांच्या जोपासनेसंबंधाने व इतर अशा मायेच्या कारणांनी बेबनाव वाढून स्त्रिया आपापल्या मुलांबाळांसह स्वतंत्र झोपड्या बांधून स्वतंत्र संसार थाटू लागल्या… ही स्वतंत्र कुटुंबे स्थापणार्‍या स्त्रिया प्रथम प्रथम एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या सोदर बहिणी बहिणी असत. सामायिक यूथसंस्था किंवा कळप फोडून विभक्त कुटुंबसंस्था जी प्रथम उदयास आली, ती कळपातील अशा सोदर बहिणींच्या हस्ते उदयास आली…’

‘कळपातून सोदर बहिणी विभक्त झाल्यावर त्यांनी जे कुटुंब स्थापिले, त्यांत सोदर भगिन्यात्मक बहुपत्नीत्व होते तसेच अंशत: बहुपतिकही होते. पुरातन चाली एकदम नाहीशा होत नाहीत, आस्ते आस्ते नाहीशा होतात व कधीकधी तर वर्तमानकाळात आपले अंशत: अवशेष मागे ठेवतात’, असे सांगून राजवाड्यांनी उत्क्रांत होत चाललेल्या कुटुंबपद्धतीतील पुढच्या एका टप्प्याचाही ऊहापोह केला. त्यांनी लिहिले, ‘सोदर भगिनींनी सोदर भ्रात्यांच्या समागमाने स्वतंत्र कुटुंबसंस्था स्थापिल्यावर त्याही संस्थेत पुढे फेरफार झाले. सार्‍याच बहिणींना सारे भाऊ किंवा सार्‍याच भावांना सार्‍याच बहिणी सारख्याच आवडत नसत. आवडनिवड रूपामुळे, स्वभावामुळे व कामसूपणामुळे व्हावयाला लागून, इतर भावांहून सर्वतोप्रकारे श्रेष्ठ अशा एखाद्या भावावर बर्‍याच बहिणींचे मन बसून, त्यांनी त्या एकाच्याच समागमात कुटुंबसंस्था चालविण्याचा संकेत केला. अशा स्थितीत स्वस्त्रीय बहुपत्नीक व एकपतिक कुटुंबसंस्था निर्माण झाली. याची ठळक उदाहरणे म्हटली म्हणजे दक्षाच्या साठ कन्यांची. ह्या साठांपैकी काहींनी धर्माशी, काहींनी सोमाशी तर काहींनी कश्यपाशी पत्नीभावाने राहण्याचे पत्करिले. अशा पद्धतीने बहुपत्नीक व एकपतिक कुटुंब अस्तित्वात आले… त्याचप्रमाणे इतर बहिणींहून गुणांनी सर्वतोप्रकारे श्रेष्ठ अशा एखाद्या बहिणीवर बर्‍याच भावांचे मन जाऊन, त्या भावांनी त्या एकाच बहिणीच्या समागमात राहून कुटुंब चालवण्याचा इरादा केला. अशा स्थितीत एकपत्नीक व बहुपतिक कुटुंब ज्याला म्हणतात, ते निर्माण झाले. याचे ठळक उदाहरण म्हटले म्हणजे हरिवंशाच्या दुसर्‍या अध्यायात वर्णिलेले प्रचेतस बंधूंचे. ह्या दहा प्रचेतस भ्रात्यांनी मारिषा नामक वृक्षकन्येशी समागम केला व त्यापासून दक्षप्रजापति जन्मास आला. या अशा दोन प्रकारच्या कुटुंबसंस्था विविध कारणांमुळे निर्माण झाल्या… पहिल्याला बहुपत्नीक अशी व दुसर्‍याला बहुपतीक अशी संज्ञा सोईखातर देऊ…’