पायरेटेड पुस्तकांचे रस्तादालन हे सर्वाधिक चालते ते ‘सेल्फहेल्प’ पुस्तकांमुळे. बुकर, नोबेल विजेत्या कादंबऱ्यांच्या जोडीने चलनातील खूपविकी नावे यांची विक्री सेल्फहेल्पच्या खालोखाल. चकचकीत ग्रंथदुकानांत बँगलोरपेपर अथवा मुंबईपेपर (पल्पमधून तयार होणारा स्वस्त कागद) वगळून तयार असलेली हीच पुस्तके पाच- दहा पट किमतीत उपलब्ध असतात. ब्रिटन-अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या खूपविक्या सेल्पहेल्प पुस्तकांच्या वीस ते तीस टक्केच भारतीय ग्रंथदालनांत सापडतात. वर्षाच्या आरंभी या पुस्तकांची जगात सारखीच विक्री होते. गार्डियनने गेल्या आठवड्यात सेल्फहेल्प पुस्तकांच्या लेखकांनाच आयुष्योपयोगी पुस्तके निवडायला सांगितली. तर या निवडीतली आपल्याला कोणती मिळवता येऊ शकतात. ती का वाचावीत, याचा तपशील-

https:// tinyurl. com/4 uduf7 k6

कथाप्रयोग…

निकोलस रॉयल नावाचा ब्रिटिश लेखक त्याच्या प्रयोगी कथा आणि त्यांच्या शीर्षकांसाठी ओळखला जातो. तो लेखक-पत्रकार आणि पुस्तक संग्राहक आहे. त्याच्या सहाव्या कादंबरीचे नाव ‘फर्स्ट नॉव्हेल’ असून त्याला लेखन करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त टिपा असेही म्हणता येईल. बार्सिलोना रिव्ह्यूने नव्या अंकात त्याची कथा वाचण्यासाठी मोकळी करून दिलेली आहे. कथेचे शीर्षक आहे ‘मायकेल हानेक’स फिल्म रॅन्क्ड’. ज्यांना ऑस्करपर्यंत धडकलेले हानेकचे चित्रपट माहिती आहेत, त्यांना कथा कशाबद्दल आहे, ते कळेल. पण चित्रपट-पाहिले-ऐकले अथवा सिनेमाची आवड नसली, तरी हा कथाप्रयोग आनंद देईल. https:// tinyurl. com/ ykuusyra

लेखन ‘स्ट्रगल’बाबत मुलाखत

कार्ल ओव्हे कनौसगार्ड या नॉर्वेमधील लेखकाच्या ‘माय स्ट्रगल’ या चार खंडांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीने आपल्या देशात भरपूर नाव कमावले. दीडएक दशकात इंग्रजी अनुवादाद्वारे तो जगासाठी खूपविका लेखक ठरला. या लेखकाला न्यू यॉर्क टाइम्सच्या मॅगझीनसाठी उत्तर अमेरिकेत फिरून त्यावर लिहिण्याची सुपारी मिळाली होती. ‘माय सागा’ नावाने तो दोन भागात आलेला दीर्घ वृत्तान्त भरपूर वाचनीय झालाय. त्याची लिंक इथे मिळेलच. पण त्याच्या लिहिण्याच्या संघर्षावर म्हणजे आठवड्यातील पाच दिवस दर दिवशी पाच तासांच्या लेखनसत्रावर बीबीसीने अगदीच ताजी लघुमुलाखत घेतलीय. तीदेखील इथे ऐका-पाहा.

https:// tinyurl. com/2 nvjk5 dc