माध्यम विस्फोटाच्या आजच्या काळातील तरुण मंडळींना एखादी व्यक्ती डॉ. विश्वास मेहेंदळे असते म्हणजे काय ते कदाचित नेमके उमगणार नाही. नभोवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमे ही सारीच दारे आज या तरुणांसाठी उघडी आहेत. आज या माध्यमातून उद्या त्या माध्यमात असे माध्यमांतरही अगदी सहज शक्य आहे. वेळोवेळी अनेकांकडून ते केलेही जाते. कारण असे माध्यमांतर करताना कसा विचार करायचा असतो, कशाचे भान बाळगायचे असते, स्वत:मध्ये कोणकोणते बदल करायचे असतात, त्यासाठी काय करायचे असते, याचे मार्गदर्शन त्यांना उपलब्ध आहे. कुणी तरी एके काळी मळलेली पाऊलवाट आता त्यांच्यासाठी राजमार्ग झाली आहे. हे ‘कुणी तरी’ म्हणजे विश्वास मेहेंदळे यांच्यासारखे काही मोजके लोक, एवढे सांगितले तरी विश्वास मेहेंदळे यांचे महत्त्व लक्षात येईल. आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र, नाटय़सृष्टी, माध्यमशिक्षण, लेखन या सगळय़ाच क्षेत्रांमध्ये ते कसे लीलया वावरले याचे तपशील त्यांच्या निधनासंदर्भातील बातम्यांमध्ये आले आहेत. त्यांची पुनरावृत्ती इथे करण्याचे कारण नाही. त्या बातम्यांमधून डॉ. विश्वास मेहेंदळे यांचा प्रवास दिसतो, पण हा प्रवास ज्या काळात झाला तो काळ दिसत नाही.

दिल्ली आकाशवाणीवरून मराठी बातम्या वाचणाऱ्या पहिल्या वृत्तनिवेदकांपैकी ते एक. मुंबई दूरदर्शनचेही ते पहिले वृत्तनिवेदक. हे पहिलेपण जसे मानाचे तसेच जोखमीचेही असते. आपल्याआधी कुणीच नसल्यामुळे आधीच्या कुणाला विचारायची सोय नसते आणि आपण जे करणार ते पाहून पुढची पिढी वाटचाल करणार आहे याचेही भान ठेवावे लागते. ते भान डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी कायमच बाळगले आणि त्यामुळेच नंतरच्या काळात माध्यमविषयक वेगवेगळय़ा संस्थांचे प्रमुखपदही सांभाळून त्यांनी पुढील पिढीला मार्गदर्शनही केले. तंत्रज्ञानाची जाण, सादरीकरणाचे भान, अभिनयाचे अंग, लेखनाची आस या सगळय़ामधून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व समाजापुढे येत गेले. ‘जे जे आपणांसी ठावे, ते इतरांसी सांगावे’ ही त्यांची ओढ इतकी अनिवार होती की अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर पुस्तके लिहून ते थांबले नाहीत, तर ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री प्रयोग ते अनेक वर्षे करत. त्यांच्या या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत असे. या प्रयोगातून श्रोत्यांना त्या माणसांचे वल्लीपण कळे, अटलबिहारी वाजपेयींसारख्या व्यक्तिमत्त्वाची उंचीसुद्धा प्रतीत होई. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांवर पीएच.डी. मिळवणाऱ्या विश्वास मेहेंदळे यांनी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकपदी काम केले असले तरी ‘सामान्य माणूस’ ही भूमिका त्यांनी कधी सोडली नाही. ‘पंडित, आता तरी शहाणे व्हा’ या त्यांच्यामुळेच गाजलेल्या नाटकात सामान्य माणसाची जी कोंडी त्यांनी साकारली होती, ती मात्र अगदी आताआतापर्यंत हसतमुख असणाऱ्या मेहेंदळे यांनी दूरच राखली!

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध