डॉ. नितीन सखदेव
आपल्या रोजच्या आयुष्यात आपण इतक्या उपकरणांसाठी बॅटरी (विद्याुत घट) वापरतो की रिचार्जेबल बॅटरीशिवाय रोजच्या आयुष्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. ही जीवन पद्धती केवळ आपण लिथियम व कोबाल्ट असलेल्या बॅटरीज वापरत असल्याने शक्य आहे. बॅटरीमध्ये ऊर्जा ही रासायनिक स्वरूपात साठवली जाते. लिथियम आणि कोबाल्ट वापरून तयार केलेल्या बॅटरीमध्ये ग्राफाइटपेक्षा दहापट ऊर्जा असते तरीही त्या आकाराने छोट्या आणि वजनाने हलक्या असतात. आपण वापरत असलेल्या अद्यायावत फोनमधील (स्मार्ट फोन) बॅटरीमध्ये १० ग्रॅम कोबाल्ट असते तर लॅपटॉपच्या बॅटरीला ३० ग्रॅम कोबाल्ट लागते व विद्याुत वाहनामधील बॅटरीमध्ये तर दहा किलो कोबाल्ट वापरले जाते. हे कोबाल्ट कुठून येते, हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? ते खाणींतून कसे काढतात याची किती जणांना जाणीव आहे? साधारणपणे जगातील ७५ टक्के कोबाल्ट हे काँगोमधील खाणींमधून येते. ही जी खनिजे आपल्याला लागतात ती पृथ्वीच्या पोटात दडलेली आहेत व ती बाहेर काढण्यासाठी फार मोठी पर्यावरणीय आणि सामाजिक किंमत मोजावी लागते.

‘कोबाल्ट रेड: हाउ द ब्लड ऑफ द काँगो पॉवर्स अवर लाइव्ह्ज’ या डॉ. सिद्धार्थ कारा यांनी लिहिलेल्या पुस्तकात काँगोमधील कोबाल्ट खाणीमुळे तिथल्या पर्यावरणावर आणि सामान्यजनांवर केवढा भयंकर परिणाम होत आहे, हे त्यांनी पहिल्यांदाच उघडपणे मांडले आहे. कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात ते ‘सार्वजनिक धोरणे’ या विषयातील व्याख्याता आहेत व त्याचबरोबर इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठात ‘आधुनिक गुलामगीरी’ या विषयाचे प्राध्यापक आहेत. २०१४ पासून सिद्धार्थ कार यांनी काँगोमधील सैन्याच्या आधिपत्याखाली असलेल्या कोबाल्टच्या खाणी असणाऱ्या प्रदेशात खूप दूरवर प्रवास करून तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. सर्व जगाला पुरवठा करणाऱ्या कोबाल्टच्या देशांतर्गत पुरवठा साखळीत (सप्लाय चेन) किती अत्याचार घडतात याचा सखोल अभ्यास ते या पुस्तकात मांडतात. जोसेफ कॉनराडच्या ‘हार्ट ऑफ डार्कनेस’ या एकोणीसाव्या शतकाच्या शेवटास लिहिलेल्या लघुकादंबरीतील नायकाला काँगो नदीतून आफ्रिकेच्या घनदाट अंतरंगात जाताना ज्या मानवी क्रौर्याच्या परिसीमा बघायला मिळाल्या तसेच क्रौर्य व हालअपेष्टा डॉ. सिद्धार्थ कारा यांना त्याच देशात एकविसाव्या शतकातसुद्धा आढळल्या.

Vivo V50 is launching in India on February 17
Vivo V50 : 6,000mAh बॅटरीसह लाँच होणार विवोचा स्लिम, ड्रीम स्मार्टफोन; कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल? जाणून घ्या
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Countrys first lithium refinery and battery manufacturing plant in Butibori
रोजगार संधी! बुटीबोरीत देशातील पहिला लिथियम रिफायनरी, बॅटरी उत्पादन कारखाना

डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोला (पूर्वाश्रमीचा झाईर) अतिशय संपन्न असा नैसर्गिक संसाधनांचा वारसा आहे. पण राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार आणि कित्येक शतके चालू असलेले व्यापारी शोषण याने हा देश कायमच गरीब राहिला. अठराव्या शतकात जेव्हा युरोपियन व्यापाऱ्यांना काँगो नदीतून आफ्रिकेच्या अंतरंगात जाण्याचा मार्ग सापडला, तेव्हापासूनच या सर्व प्रदेशाचे अखंड शोषण झाल्याचा इतिहास आहे. काँगोच्या लोकांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांच्या बदल्यात जो काही आर्थिक मोबदला मिळाला तो कधीही खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि त्यांच्या फायद्याचा नव्हता. कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त कष्ट करून वेठबिगार म्हणून तेथील लोकांना कामाला लावले जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी काँगो हा बेल्जियमचा राजा लिओपोल्डच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश होता. नावापुरते ते स्वतंत्र राज्य होते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात या देशाला हस्तिदंतासाठी लुटले गेले. हजारो हत्ती हस्तिदंतासाठी मारले गेले. त्यामुळे हत्ती या देशातून नामशेषच झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी हस्तिदंताच्या धंद्यातील भरभराट लयाला गेली. तेव्हाच चार चाकी वाहनांचा व्यवसाय जोम धरू लागला. हवेने फुगणारे रबराचे टायर १८८८ मध्ये शोधले गेले. विषुववृत्तीय जंगलातील झाडे रबराच्या जंगली वेलींनी संपन्न होती. या नैसर्गिक संपत्तीचा फायदा घेण्याची शक्यता लिओपोल्डच्या लक्षात आली आणि त्याने त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. रबराचा व्यवसाय वाढण्यापूर्वी काँगोची निर्यात थोडेसे तेल आणि हस्तिदंत इतकेच मर्यादित होती. पण १९०२ पर्यंत रबराची काँगोमधून होणारी निर्यात केवळ १८ वर्षांत १५ पटींनी वाढली व त्याची किंमत कोट्यवधी फ्रांकपर्यंत होती.

रबर निर्माण करण्यासाठी स्वस्त मजुरांची गरज होती. काँगोतील लोकांना गुलामासारखे वागवून त्यांच्याकडून काम करून घेतले जाई. कामावर यायला नकार दिला तर कामगारांना शिक्षा केली जाई. जर कमी रबर जमा झालं तर निर्दयपणे हात तोडल्याच्या भयानक कथा आणि छायाचित्रे याची साक्ष आहेत. अनेक वर्षांनंतर ही निर्दय पद्धत जगासमोर आली आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे ती बंद झाली किंवा करावी लागली. १९६० मध्ये बेल्जियमकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर काँगोमधील जनतेने प्रथमच लोकशाही पद्धतीने पॅट्रिक लुबाम्बांना अध्यक्ष म्हणून निवडले. लुबाम्बांनी देशाची संपत्ती काँगोच्या जनतेत वाटण्याचे आश्वासन दिले. पाश्चिमात्य जगाला याचा धक्का बसला कारण या सगळ्या शोषण व्यवस्थेचे ते सगळ्यात मोठे भागीदार होते. अनेक देशांनी लुबाम्बाच्या धोरणाचा निषेध केला. पाश्चिमात्य देशांच्या मदतीने लुबाम्बांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या जागी जोसेफ मोबुटो या क्रूर हुकूमशाचा उदय झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक हुकूमशहाच येत गेले व त्यामुळे काँगोतील नागरिक कायम गरिबीतच राहिले.

विसाव्या शतकाच्या शेवटी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन वाढले. त्यांत असलेल्या लिथियम बॅटरीमुळेच हे शक्य झाले. जागतिकीकरणामुळे तर अशा प्रकारच्या उपकरणांच्या मागणीत खूपच वाढ झाली. कोबाल्ट हा अशा बॅटरीचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्याच्या मागणीतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली. १९८० मध्ये कोबाल्टची जागतिक मागणी जी ३० हजार टनांची होती ती २०२२ मध्ये दोन लाख टन झाली. जगातील ७५ टक्के कोबाल्ट काँगोसारख्या अफ्रिकेतील गरीब देशात असल्यामुळे जागतिक स्तरावर नको त्या मार्गाने ती मागणी पुरवण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. काँगोमधील कोबाल्टच्या खाणीचे काम दोन पातळ्यांवर चालते. पहिले म्हणजे बहुराष्ट्र कंपन्या औद्याोगिक पद्धतीने कोबाल्ट मोठ्या प्रमाणावर मिळवतात तर दुसरे म्हणजे छोटे छोटे कारागीर स्वत:च्या हातांनी पहार, कुदळ आणि छोट्या हातोड्या हातात धरून उघड्या हाताने कोबाल्ट काढतात. कामगारांकडून एकत्रित गोळा होणारे हे कोबाल्ट देशाच्या उत्पादनाच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

डॉ. सिद्धार्थ कारा यांनी पाच वर्षांत वेळोवेळी अशा खाणींतील कामगारांना भेटून त्यांच्या कष्टमय व हलाखीच्या आयुष्याचा अभ्यास केला. त्यांचे जीवन अश्मयुगात राहत असल्यासारखे आहे. परिस्थिती भयावह आहे. खनिज काढण्यासाठी हातानेच बोगदे खोदले जातात. अशा बोगद्यांना कुठेही आधार नसतो, हवा येण्यासाठी झरोकेही नसतात किंवा सुरक्षिततेसाठी काही साधने नसतात. बोगदे सारखे कोसळतात आणि आत काम करणारी सगळी माणसे गाडली जातात. यात अगदी लहान मुलांचाही समावेश असतो. हे मृत्यूचे तांडव कल्पनेपेक्षाही भयंकर असते. कारागिरांनी हाताने खोदलेले असे जवळजवळ १०-१५ हजार बोगदे डॉ. सिद्धार्थ कारांना खाणीत पाहायला मिळले. या बोगद्यांत घडलेल्या करुण कहाण्या काँगोच्या बाहेर पोहोचत नाहीत वा पोहोचू दिल्या जात नाहीत. कामगारांना वैद्याकीय मदतीची किंवा शिक्षणाची सुविधा नसतेच पण ते करत असलेल्या जोखमीच्या कामासाठी आवश्यक सुरक्षेची खबरदारीसुद्धा घेतली जात नाही. अभ्यासकांच्या मते काँगोमधील अडीच लाख खाण कामगारंपैकी ४० हजार बालकामगार आहेत. डॉ. सिद्धार्थना सहा वर्षांच्या मुलांपासून, गर्भवती, लेकुरवाळ्या आया मुलांना पाठीशी बांधून या विषारी वातावरणात काम करताना आढळल्या. स्त्रियांवर अत्याचार होणे ही नित्याची बाब आहे. कोबाल्ट आणि तिथे मिळणारी इतर खनिजे ही मानवी शरीराच्या दृष्टीने अतिशय विषारी आहेत. कामगारांच्या लघवीमध्ये सुरक्षित पातळीपेक्षा ४० पट जास्त कोबाल्ट, पाचपट शिसे आणि चारपट युरेनियम आढळते. तेथील इतर रहिवाशांमध्येही ते खाणीत काम करत नसूनदेखील ही खनिजे जास्त प्रमाणात आढळतात. पूर्ण जगाने या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. काँगोची जनता जागतिक पुरवठा साखळीच्या तळाशी असल्याने भांडवलशाहीची शिकार ठरत आहे.

काँगोमधील कोबाल्टच्या १९ खाणींपैकी १४ चीनच्या आधिपत्याखाली आहेत; पण याचा अर्थ असा नाही की या उद्याोगांमधील इतर भागीदार कामगारांशी वेगळे वागत आहेत किंवा खाणीतील कामगारांच्या कष्टांबद्दल अनभिज्ञ आहेत. अॅपल, सॅमसंग व टेस्लासारख्या विद्याुत वाहनांचे उत्पादन करणाऱ्या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांना याची जाणीव आहे की त्यांचे तथाकथित ‘निर्मळ कोबाल्ट’ हे हाताने खणलेल्या व रक्ताने माखलेल्या कोबाल्टबरोबर मिसळले गेले आहे. तरीही ते आम्ही बालकामगारांचा वापर करत नाहीत व हाताने खणलेले रक्तरंजित कोबाल्ट वापरत नाही, असे जगाला सांगतात. हे धादांत असत्य आहे.

हे अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे कारण काँगोतील खाणकामगाराच्या अवस्थेला आपण सारेच जबाबदार आहोत याची जाणीव ते आपल्याला करून देते. एकदा हे पुस्तक वाचलेत की आपण आपल्या फोनकडे किंवा रीचार्जेबल बॅटरी असणाऱ्या कोणत्याही उपकरणाकडे पूर्वीसारखे पाहूच शकणार नाही. ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याला वेगवेगळी उपकरणे देतात, त्यांनासुद्धा आपण या परिस्थितीला जबाबदार धरले पाहिजे. अनेक वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे आणि वारंवार बदलणे याची पर्यावरणीय किंमत आपण दूरच्या देशात व पुढच्या पिढीवर ढकलत आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपल्याला आपले फोन सुखेनैव वापरता यावेत म्हणून काँगोमधील खाणींत मुले रोज मरत आहेत. विद्याुत वाहने वायू प्रदूषणाच्या दृष्टीने चांगलीच आहेत पण ती वापरताना काँगोमधील अपुऱ्या वेतनावर राबणाऱ्या खाणकामगारांच्या फुप्फुसात कोबाल्टचे हे विष आपल्यामुळे जाऊन बसते याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण वापरत असलेल्या उपकरणांच्या निर्मितीत बालकामगारांचा वापर होऊ नये, पर्यावरणाची कमीतकमी हानी व्हावी म्हणून त्या उपकरणासाठी आपण दुप्पट, तिप्पट किंवा चौपट किंमत द्यायला तयार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. आपल्यापैकी किती जण ही किंमत मोजतील असा विचार मनात येतो. ‘वापरा आणि फेका’ संस्कृती आपल्याला नको आहे. रीचार्जेबल बॅटरीचा वापर कमीत कमी ठेवून त्या जास्तीत जास्त काळ वापरू असे तरी आपण ठरवू शकतो. अधिक काळ चालणाऱ्या बॅटरीसाठी आग्रही राहू शकतो. जाहिरातबाजीला बळी न पडता ही उपकरणे जास्तीत जास्त दिवस वापरूया. हे केल्यानेच यातून काहीतरी मार्ग निघू शकेल.

‘कोबाल्ट रेड: हाउ द ब्लड ऑफ द काँगो पॉवर्स अवर लाइव्ह्ज’

लेखक : डॉ. सिद्धार्थ कारा

प्रकाशक – सेंट मार्टिन्स प्रेस

मूल्य- १७४९ रुपये

पृष्ठे – २७९

बुकनेट : पुस्तकवेडाचा वारसा…

रॉबिन इन्स हा ब्रिटिश लेखक, अभिनेता आणि स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून दशकापूर्वी ओळखला जात होता. २०२१ साली त्याचे ‘बिब्लिओमॅनिअॅक’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. यात संपूर्ण ब्रिटनमधील पुस्तक दालनांचा तपशील त्याने लिहिला. ही डॉक्युमेण्ट्रीवजा ५६ मिनिटांची क्लिप इन्सच्या वडिलांचा पुस्तकवेडाचा गुण त्याच्यात हस्तांतरित कसा झाला याविषयीची. गेल्या वर्षी त्याच्या वडलांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काही आठवड्यानंतरची.

https://tinyurl.com/3 eapuak8

मुराकामीचे शहर…

हारुकी मुराकामी या जपानी लेखकाची जगभरात (अनुवाद झालेल्या) पुस्तकखपाची संख्या त्याच्या मूळ देशातील लोकसंख्येपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्याच्या कैक कथांमध्ये येणाऱ्या होकाईडो या शहराचे पर्यटन कथांच्या संदर्भांसह घडवून आणणारा लेख.

https://tinyurl.com/26b4mj26

एक कथा…

जोन सिल्बर या अमेरिकी कथा-कादंबरीकार. गेली दोन-अडीच दशके त्यांच्या कथा महत्त्वाच्या अमेरिकी मासिकांत झळकत आहेत. इमर्सन कॉलेजच्या ‘प्लाऊशेअर’ या प्रसिद्ध नियतकालिकात त्यांची नवी कथा ‘मर्सी’ येत्या आठवड्याअखेरीपर्यंत मोफत वाचता येईल.

https://tinyurl.com/yzuyfvmk

Story img Loader