Premium

समोरच्या बाकावरून: सेंगोनमाई चिरायू होवो..

आपले पंतप्रधान, दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक पसरवणारे लोक, आणि भाजपचे फिरकीपटू या सगळय़ांनी सेंगोलबद्दल जे काही अजबगजब म्हटलं आहे,

sengol
(सेंगोल)फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

आपले पंतप्रधान, दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक पसरवणारे लोक, आणि भाजपचे फिरकीपटू या सगळय़ांनी सेंगोलबद्दल जे काही अजबगजब म्हटलं आहे, ते तिरुवल्लुवर, एलांगो अडिगल या प्राचीन काळातील आणि अववैय्यर तसंच संगम युगातील कवींनी ऐकलं तर त्यांना आता भूकंप होऊन धरणीमाता आपल्याला पोटात घेईल तर बरं असंच वाटण्याची शक्यता आहे. ऐहिक शक्तीचं प्रतीक असा या लोकांनी सेंगोलचा अर्थ लावला आहे. खरंतर एखाद्या धर्मगुरूने किंवा एखाद्या शासकाने नव्या शासकाला सेंगोल देणं हे प्रतीकात्मक आहे. पण सध्या त्याचं चित्रण सत्तेचं हस्तांतरण असं केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास आणि नैतिक तत्त्वं यांचा कसा निर्लज्जपणे विपर्यास केला जाऊ शकतो, याचंच प्रदर्शन २८ मे २०२३ रोजी मांडलं गेलं. त्या दिवशी तुतारी, रणिशगं अशी वाद्यं वाजवली गेली. दरबाऱ्यांनी सत्ताधीशांवर आपली निष्ठा व्यक्त केली. तो संसदेच्या दोन्ही सभागृहांना सामावून घेणाऱ्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा नव्हे तर जणू काही राज्याभिषेकाचाच सोहळा होता. लोकशाही प्रजासत्ताकाशी विसंगत अशा या राज्याभिषेकाच्या शाही समारंभात लॉर्ड माऊंटबॅटन आणि सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांचा उल्लेख करण्यात आला होता. धर्मनिरपेक्ष असणं अपेक्षित होतं, अशा कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्यासाठी शैव अधीनम (मठ) प्रमुखांना बोलावलं जाणं ही खरंच दुर्दैवाची गोष्ट होती.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiruvallu late tamil poet and philosopher thirukkural poetry literature in tamil language amy