प्रति, राज्य सरचिटणीस, कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती संघटना. संप हा अधिकार तर लाच हा कर्तव्याचाच भाग अशी बहुतेकांची ठाम धारणा असल्याने ही कारणे दाखवा नोटीस बघून मला आश्चर्य वाटले. मला लाच घेताना अटक झाली हे मान्यच. मात्र यामुळे संघटनेची बदनामी झाली, संपाची धार थोडी बोथट झाली हे अमान्य. मी नव्या पेन्शन योजनेचा धारक आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या भविष्याच्या काळजीने मी वरकमाईचे मार्ग शोधत असतो. शासकीय कर्तव्य बजावतानाच  मुलाबाळांची सोय करून ठेवणे हेही माझे कर्तव्यच. त्यामुळे माझ्या या लाच प्रकरणाकडे संघटनेने सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला हवे. जुनी योजना लागू केली तर लाचखोरी कमी होईल हे सरकारला पटवून द्यायला हवे. ते शक्य नसेल तर ही घटना म्हणजे संपाला बदनाम करण्याचा कट असा  पवित्रा तरी घ्यायला हवा. मला संघटनेतून बाहेर काढण्याची नोटीस देणे अन्यायकारक आहे.

१८ वर्षांपासून सावनेरसारख्या छोटय़ा शहरात मी संघटनेची धुरा यशस्वीपणे सांभाळतो आहे. संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी भरीव आर्थिक मदत केली आहे. अर्थात ती वरकमाईतून हे सुज्ञास सांगणे न लगे. लाच हा कर्तव्याचाच एक भाग या माझ्या वास्तववादी मताशी आपण अधिकृतपणे सहमत होणार नाही याची मला कल्पना आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण नव्या पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे बेहाल होतील हे वास्तव स्वीकारले त्याच दृष्टिकोनातून या वास्तवाचा विचार करून कर्मचाऱ्यांचा बचाव केला पाहिजे. घटनेच्या दिवशी रात्री मी संपासंबंधीच्या बैठकीत मार्गदर्शन करीत होतो. त्याच वेळेत मला तक्रारकर्त्यांचे फोन येत होते. संप दीर्घकाळ चालला तर शासकीय कर्तव्य बजावता येणार नाही. तक्रारकर्त्यांची ‘ओके’ केलेली फाइल तशीच पडून राहील. त्या भीतीने कदाचित तो फोन करत असावा अशा उदात्त विचाराने मी बाहेर गेलो व पावडर लावलेल्या नोटांच्या विळख्यात सापडलो. यात मी फार मोठा अपराध केला असे मला वाटत नाही. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे सरकारशी वाटाघाटी करताना संघटनेची पंचाईत झाली असे नोटिशीत म्हटले आहे. हे मला मान्य नाही. प्रशासकीय स्तरावर सर्रास चालणाऱ्या या वरकमाईच्या व्यवहारात सगळेच कसे सामील असतात याची पूर्ण कल्पना संघटनेतील सर्वाना आहे. लाचखोरी संपवायची असेल तर राज्यकर्त्यांपासून प्रशासनापर्यंत साऱ्यांनाच ‘अर्थमोह’ त्यागावा लागेल. कुण्या एकाने त्यागून चालणार नाही. माझ्यासारख्या प्रवाहपतीताला ते शक्य नाही. त्यामुळे या क्षुल्लक घटनेचा बाऊ न करता संघटनेने संप कसा यशस्वी होईल यावर लक्ष केंद्रित करावे. माझ्यावर पोलीस कारवाई झाली असली तरी शहर व जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांनी संपात स्वत:ला झोकून दिले आहे. जामिनावर बाहेर आलो की मीही तनमनधनाने या आंदोलनात उतरेन अशी ग्वाही देतो. माझ्याविरुद्ध रचलेल्या कटकारस्थानाचा छडा मी नंतर लावीनच व इतरांप्रमाणे माझे निर्दोषत्व सिद्ध करीन. फक्त विनंती एवढीच की माझे हे उत्तर खरे मानून दिलेली नोटीस तेवढी मागे घ्यावी.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आपला , संघटनेचा पाईक