‘त्यात काय, सामान्यांच्या घरीही चार-पाच कोटी रुपये सहज सापडतात’ कर्नाटकचे भाजप आमदार मंडल विरुपक्षप्पा यांचे हे विधान ऐकून भारताच्या अर्थगतीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या जागतिक वित्तसंस्था चक्रावल्या. या देशाचे मानांकन ठरवण्यात आपण चूक तर करीत नाही ना, या शंकेने मग साऱ्या संस्थाप्रमुखांनी एकत्र येत भारताची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. यात तथ्य आढळले तर या देशाचे मानांकन वाढून तो पाचव्यावरून पहिल्या स्थानावर झेप घेऊ शकतो यावर सर्वाचे एकमत झाले. या संभाव्य पाहणीची कुणकुण सत्ताधीशांना लागताच त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या. ही पाहणी यशस्वी झाली तर विरुपक्षप्पाच काय देशभरातील सत्तारूढ लोकप्रतिनिधी खरेच बोलतात हे सिद्ध होईल, विरोधकांची तोंडे बंद होतील आणि अर्थव्यवस्थेचे मानांकन वाढताच विश्वगुरूची प्रतिमा आणखी उजळेल. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची ही संधी अजिबात दवडायची नाही असे ठरवत साऱ्या यंत्रणा सज्ज झाल्या. पाहणी पथकाला अजिबात सुगावा लागू न देता ते ज्या सामान्याला भेटतील तो कसा कोटय़धीश आहे हे दाखवून द्यायचे ठरले. पथक सर्वात आधी त्या आमदाराच्या भेटीला चन्नानगरीत गेले.

वरून सूचना मिळाल्याने आधीच तयारीत असलेल्या या आमदाराने स्वत:च्या घरातील पाच कोटींचा हिशेब दिलाच शिवाय सुपारीची एक एकरची बाग असलेल्या अनेक सामान्यांच्या घरात कोटय़वधी रुपये कसे ठेवले आहेत हेही पथकाला दाखवले. मग पथक गोव्याकडे निघाले. वाटेत ते ज्या ठिकाणी थांबले, सटरफटर व्यवसाय करणाऱ्या लोकांशी बोलले त्या साऱ्यांनी त्यांच्या घरात कोटय़वधी रुपये ठेवलेले असल्याचे अभिमानाने सांगितले. २०१४ नंतरच ही अर्थसमृद्धी आम्ही अनुभवत आहोत असे प्रत्येकजण म्हणत होता. ‘ही रक्कम बेहिशेबी नाही, मग ती तुम्ही बँकेत का ठेवत नाही’ असा प्रश्न पथकातील एकाने काही ठिकाणी विचारला. त्यालाही सर्वानी समर्पक उत्तरे दिली. रोजचे व्यवहारच कोटय़वधीचे, त्यामुळे रोज बँकेत जाणे शक्य होत नाही. रोखीच्या व्यवहारातसुद्धा भारत कसा नंबर एक व विश्वसनीय हे जगाला दाखवून द्यायचेय. विश्वगुरू सांगतील त्या दिवशी बँकेत नगदी जमा करू असे अनेकांनी सांगितले. मग पथक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात फिरले. तिथेही घरोघरी मोठी रोकड. विश्वगुरुपर्वात केवळ सत्तावर्तुळातले सामान्यच कोटय़धीश होत आहेत, विरोधक नाहीत असे या पथकाच्या कानात कुणी तरी कुजबुजले. मग पथक ठरवून काही सामान्य विरोधकांना भेटले. त्यांनीही त्यांच्या घरातील नगदी आनंदाने दाखवली. यामुळे पथकाला भारताच्या अर्थप्रगतीविषयी खात्री पटली. ते आनंदाने परदेशी परतले.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या

..त्यांच्या विमानाने उड्डाण घेताच सत्ताधाऱ्यांच्या यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. या पथकाला घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांना एकत्र बोलावून त्यांच्या दिमतीला तपास यंत्रणांतील खास अधिकारी देण्यात आले. मग ठिकठिकाणी वाटलेली रोकड गोळा करण्याची मोहीम सुरू झाली. सर्वात आधी सामान्य विरोधकाचे घर गाठले गेले. ठेवलेल्या रकमेतील दोन टक्के त्याला देऊन उर्वरित ठिकाणची रक्कम तातडीने गोळा केली गेली. आधी ठरल्यानुसार वाहनचालकांना तगडे मानधन- रोखीने नव्हे, थेट बँकेत- दिले (तेवढेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन!) सर्व सोपस्कार आटोपल्यावर सत्ताधारी नव्या मानांकनाच्या बातमीची वाट बघू लागले.