यापूर्वी चीन लोकसंख्या आणि अन्नधान्य उत्पादन दोन्हीतही पहिल्या क्रमांकावर होता. आता भारत लोकसंख्येबाबत जगात पहिल्या क्रमाकांवर, पण अन्नधान्य उत्पादनात पहिल्या पाच क्रमांकांत आहे..
एका बाजूला यंदा होणारे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला जगातील १२१ विकसनशील देशांच्या भूक निर्देशांकात १०१ वरून १०७व्या क्रमांकावर झालेली घसरण सावरण्याची चिंता, या दोन परस्परविरोधी गोष्टींचा अन्वयार्थ लावणे हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. कागदोपत्री पुरेसे धान्य निर्माण झाले असले, तरी ते या देशातील प्रत्येक नागरिकाच्या पोटात जाऊ शकत नाही. या वस्तुस्थितीकडे जोवर धोरणकर्त्यांचे दुर्लक्ष होईल, तोवर हा विरोधाभास राहणार. देशात कोणत्या धान्याची नेमकी गरज किती असते, हे जाहीर करणे सरकारच्या कृषी खात्याला सहज शक्य आहे. ते होत नाही, त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपापल्या हिशोबाने हव्या त्या शेतमालाला प्राधान्य देतो. त्यामुळे काही बाबतीत देश गरजेपेक्षा अधिक उत्पादन करतो, तर काही शेतमालाची मोठय़ा प्रमाणावर आयात करणे भाग पडते. कृषी धोरण आखताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले न गेल्यामुळे ही स्थिती उद्भवते. देशात यंदा विक्रमी म्हणजे ३३०.५ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाल्याचा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण
मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial ministry of agriculture food grains produced record production of food grains country ysh