रवीन्द्र कुलकर्णी

‘गॉड डज नॉट प्ले डाइस’ हे अल्बर्ट आइन्स्टाइनचे वाक्य मला माहीत आहे. ‘सृष्टीतल्या मूलकणांच्या वागण्याला काही नियम असले पाहिजेत’ ही त्याची भूमिका आणि आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने अनेक वर्षे केलेली धडपड, त्यासंदर्भात नील्स भोरशी त्याने घातलेला जाहीर वाद आणि त्यात त्याला आलेले अपयश याबद्दल मी वाचले आहे. या स्वत:च्याच वाक्यावर त्याचे प्रेम असावे; कारण हेच वाक्य त्याने अनेक प्रकारे वेगवेगळय़ा वेळी म्हटले आहे.. एका  पत्रात त्याने हे पुन्हा लिहिले, ते पत्र माझ्या समोरच आहे. ‘‘माझी भूमिका आता इतकी जुनी व आडमुठी आहे की आजही माझा यावर विश्वास नाही की देव जुगार खेळतो.’’ हे पत्र त्याच्याच हस्ताक्षरातले! कुणा ‘मि. राइशे’

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

(Mr. Reiche) यांना आइन्स्टाइनने पेनाने लिहिलेले आहे. मधल्या काचेला ओलांडून मला त्या पत्राला हात लावण्याची इच्छा आहे. मात्र त्यासाठी हे पत्र कोणीही विकत घ्यावे लागेल –  किंमत २,८०,००० डॉलर!

‘अँटिक्वेरियन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका’ यांचे न्यूयॉर्क येथे भरलेले ६३वे पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी मुद्दाम अमेरिकेची ग्रंथयात्रा केली. साधारण गेल्या १२०० वर्षांचा जगाचा छापील इतिहास इथे उलगडताना दिसतो, तेव्हा  भिरभिरायला होते. तेथे केवळ दर्शनासाठीच नाही तर विकण्यासाठीही ठेवलेली रेखाटने, छायाचित्रे, साहित्य, राजकारण, कला या क्षेत्रांतल्या नामवंतांची पत्रे व हस्ताक्षरे, हस्तलिखिते, नकाशे, चित्रपुस्तके, सोनेरी वर्खाने सजवलेली पुस्तके या साऱ्यांचा अर्थपूर्ण मागोवा आपल्याला उपलब्ध असलेल्या चार-पाच तासांत घेणे दमवणारे आहे. प्रदर्शनातील १२० स्टॉलपैकी बहुतेक इंग्लंड व अमेरिका या इंग्रजीबहुल देशांतल्या दुर्मीळ पुस्तक विक्रेत्यांचे आहेत. फ्रान्स, स्पेन, इटलीतलेही काही विक्रेते आहेत. यातल्या काही पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल पाहायचे असल्यास आधी वेळ ठरवावी लागते. या प्रदर्शनात सारे आपणाहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडच्या दुर्मीळ पुस्तकांपैकी काही पाहायला मिळणे ही पर्वणी आहे.

भारतीय सोडाच, पण एकाही आशियाई देशाचे येथे दालन नाही. भारत आणि इराक या देशांना हस्तलिखितांची समृद्ध परंपरा आहे हे येथे कोणाच्या गावीही नाही.  लॅटिन व इतर युरोपीय भाषांप्रमाणेच जगात कैक प्राचीन भाषा आहेत याचे भान नाही. शापेरो रेअर बुक्सच्या शोकेसमध्ये एक भारतीय नाव मात्र दिसले.. ‘ग्रे एमिनन्स’ हे आपले पुस्तक आल्डस हक्सलेने ‘जे. कृष्णमूर्तीना’ दिले आहे.

अशा विक्रीपर प्रदर्शनात मला खरेदी करायची नसली तरी, काळाचे भान व विविध विषयांचे एकमेकांशी असलेले संबंध याची जाणीव होत राहिली. उदाहरणार्थ प्रवास वर्णने, नकाशे व पशुपक्ष्यांची चित्रे असलेले ‘बर्डस ऑफ अमेरिका’ हे जॉन अदुबओनचे पुस्तक व स्थलांतरितांचे जीवन चितारणारी एखादी कादंबरी यांचे एकमेकांशी असलेलेले नाते आपल्या मनात तयार असले पाहिजे. एका विषयाने दुसऱ्या विषयाची खुमारी आणखी वाढते.

प्रदर्शनाचा सारा थाट अगदी राजेशाही आहे. लिलावगृहे किंवा पुराणवस्तूंचे विक्रेते त्या-त्या वस्तूसोबतच तिची थोरवी सांगणारा मजकूर लिहिलेली कार्डेही ठेवतात, तसे काचेआडच्या बहुतेक साऱ्या पुस्तकांसाठी आहेच. अन्य पुस्तके गिऱ्हाईकांना दाखवण्यासाठी ‘बुक क्रेडल्स’ आहेत. त्यात ठेवून पुस्तक दाखवले जाते. दाखवण्यात एक शाही अदब आहे, जणू हिरे-माणकांची खरेदी चालू आहे.  ज्ञानाविषयी प्रेम मात्र आहे. असा ग्रंथसंग्रह करण्याच्या नादाला निकोलस बॅसबेन्स या पत्रकाराने ‘जंटल मॅडनेस’ म्हटले आहे. प्रदर्शनातील जुन्या पुस्तकांचा राजेशाही थाट पाहिल्यावर त्यात थोडा बदल करून याला ‘रॉयल मॅडनेस’ म्हणावेसे वाटत राहाते.

केप्लर ते न्यूटन!

‘सोफिया रेअर बुक्स’ या डेन्मार्कच्या फर्मकडचा संग्रह प्रचंड आणि चोखंदळही. जोहान्स केप्लरच्या ‘ ठ५ं २३ी१ीेी३१्रं ’्रि१४े ५्रल्लं१्र१४े’ या १६१५ सालच्या पुस्तकाची प्रत त्यांच्याकडे आहे. यात केप्लरने वेगवेगळय़ा आकारांच्या त्रिमितीय वस्तूंचे आकारमान काढण्याच्या पद्धतीचा विचार करताना त्या वस्तू अनंत भागांत विभागून त्यांच्या मोजमापाचा विचार केला आहे. या पद्धतीला, पुढे न्यूटनने शोधलेल्या ‘कॅल्क्युलस’चा पिता म्हणायला हरकत नाही अशी विक्रेत्यांची नोंद आहे. याला जवळ जाणारे व आपल्याला माहीत असलेले शालेय पातळीवरचे गणित म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ. भारतीयांनाही ही पद्धत माहीत होती. पण हे पुस्तक १६१५ सालच्या  फ्रँकफर्टच्या पुस्तक प्रदर्शनात उपलब्ध होते. असाच १७०४ सालचा न्यूटनचा ‘ऑप्टिक्स’ हा प्रकाशावरील ग्रंथही येथे आहे. त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तींना याच्या मोजक्या प्रती भेट दिल्या होत्या त्यातल्या ६ प्रतींपैकी ही एक!  

निरीक्षणांचा काल-पट!

‘अमेरिकाना’ अशा शीर्षकाखाली, अमेरिकी इतिहासाचा वेगळा विभाग जवळपास सर्व दुर्मीळ पुस्तकं विक्रेत्यांनी ठेवलेला आहे. अमेरिकेचे जुने नकाशे, पेंटिंग्ज, रेखाचित्रे अशांची त्यात रेलचेल आहे. स्थलांतरितांना हा नवीन भूभाग त्या वेळेला कसा दिसला? त्या वेळचे जनजीवन कसे होते? याचा अंदाज आपल्याला येतो. बी मार्शल यांच्या स्टॉलवर असलेला, १६३१ साली डचांनी काढलेला आफ्रिकेचा नकाशा हा बऱ्याच प्रमाणात बरोबर आहे, पण त्याच्या अंतर्भागात  काही काल्पनिक डोंगर व नद्या दाखवण्यात आल्या आहेत! हा गैरसमज १९व्या शतकापर्यंत कायम होता. 

पोहावे कसे?

 बेन्जामिन फ्रँकलिन याला पोहण्याची आवड होती व त्यावर त्याचे काही लिखाण आहे. ‘पाण्याच्या खोलीचा अंदाज घेताना एका वेळी दोन्ही पाय वापरू नका’ – हे त्याचे वाक्य तर प्रसिद्धच! इथे फ्रँकलिनचे नाही, पण पोहण्याबद्दल लिहिले गेलेले पहिलेच- १७८२ सालचे – फ्रेंच भाषेतील पुस्तक एका काचेत आहे. याचा उपयोग बेन्जामिन फ्रँकलिनने त्याच्या पोहण्यावरील लिखाणासाठी केला असल्याच दावा या पुस्तकासोबतच्या नोंदीमध्ये आहे. पुस्तकात ३५ चित्रे आहेत.

शेक्सपिअर : समग्र नाटके

लंडनच्या पीटर हॅरिंग्टन फर्मच्या स्टॉलवर १६२३ साली छापलेल्या, पहिल्यावहिल्या समग्र शेक्सपिअरचा बोलबाला होता. शेक्सपिअरच्या हयातीत त्याची १८ नाटके छापली गेली. १६१६ साली त्याच्या मृत्यूनंतर त्याची ही पूर्वप्रकाशित, तसेच तोवर अप्रकाशित असलेली आणखी १८ नाटके असे खंड काढण्याची धडपड त्याच्या मित्रांनी सुरू केली. किंग्स मेन या त्याच्या नाटक कंपनीशी बोलणी करून शेक्सपिअरची ३६ नाटके प्रथम १६२३ साली एकत्र प्रकाशित करण्यात आली. हा समग्र शेक्सपिअर जर त्याच वेळी छापला गेला नसता तर त्याची उरलेली १८ नाटके- त्यात ‘मॅक्बेथ’, ‘ज्युलियस सीझर’ व ‘टेम्पटेस्ट’ ही नाटकेही- हरवूनच गेली असती! या पुस्तकाच्या अंदाजे ७५० प्रती छापल्या गेल्या असाव्यात. आज फक्त २३५ प्रती शिल्लक आहेत. पैकी सात तर न्यू यॉर्कच्या पब्लिक लायब्ररीतच आहेत. यंदा त्या आवृत्तीला ४०० वर्षे होत असल्याने कातडी बांधणीतल्या संपूर्ण शेक्सपिअरची किंमत ७५,००,००० डॉलर लावून टाकली आहे!

जुन्या पत्रांचे मोल..

अमेरिकेचा राष्ट्रकवी वॉल्ट व्हिटमनचे १८८८ सालचे लहानसे पत्र  येथे आहे ज्यात त्याचेच ‘लीव्हज ऑफ ग्रास’ व ‘टू रिव्ह्युलेट्स’ हे काव्यसंग्रह  विकण्यासाठी, ‘पुस्तके  चांगल्या अवस्थेत, अर्धकातडी बाइंडिंगमध्ये आहेत. किमतीत एकतृतीयांश सूटही दिली आहे’ असे त्याने पत्रात नमूद केले आहे! ‘ऑटोग्राफ्स डि सिकल्स’ म्हणजे शतकांच्या स्वाक्षऱ्या या नावाची लिऑन इथली फ्रेंच फर्म आहे. गेल्या शतकातील महनीय व्यक्तींची स्वाक्षऱ्या केलेली लिखित पत्रे, चित्रे व छायाचित्रे गोळा करणे व विकणे, हेच काम ती करते. त्यांच्या छापील ‘कॅटलॉग’मध्ये (मूळ नव्हे) चित्रकार पॉल गोगँचे लहानसे पत्र, डॅनियल नावाच्या मित्राला तीन पेंटिंग्ज पाठवून, १५०० फ्रँक्सची विनंती करणारे आहे. तो लिहितो, ‘ आता माझ्या साऱ्या शक्ती मला सोडून जात आहेत.’’ – हे पत्र ‘एप्रिल १९०३’मधले, नेमक्या तारखेविना. या नंतर काही दिवसांत, ८ मे १९०३ रोजी गोगँचा मृत्यू झाला.

यातल्या एकाही पत्राची किंमत चार हजार डॉलरच्या खाली नाही.अशी पत्रे जमवणाऱ्या फर्मस खूप प्रयत्नाने व पैसे खर्च करून ते अशी पत्रे गोळा करतात, गिऱ्हाईके मिळेपर्यंत सांभाळत असतात. ‘विश्रब्ध शारदा’त अशा पत्रांतून महाराष्ट्राचे सांस्कृतिक चित्र उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न ह. वि. मोटय़ांनी केला, पण त्या मूळ पत्रांचे नंतर काय काय झाले? कुणाला पैसे मोजून ती आपल्या जवळ ठेवावीशी वाटली का? आणि स्वत: पैसे मोजल्याशिवाय त्यांची काळजी कोण कशाला घेईल?!

नक्षीदार चामडी हस्तलिखित

पुस्तकप्रेमी लोकांचे पहिल्या आवृत्तीचे वेड लक्षात घेऊन इथल्या विक्रेत्यांनी पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या मांडून ठेवल्या आहेत. ही पुस्तके आज बाजारात ज्या किमतीला मिळतात त्यापेक्षा किती तरी जास्त किंमत या विक्रेत्यांनी लावलेली आहे. पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्यांच्या शोधत फिरणाऱ्या लोकांना जॉर्ज ऑर्वेलने मूर्ख म्हटले आहे. त्याच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याच पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या हे नादिष्ट लोक जमवत असतात. सर्वात देखणी पुस्तके म्हणजे चामडय़ावर लिहून नक्षीकाम केलेली. युरोपात कागद अजून पोहोचायचा होता तेव्हा लिहिली गेलेली, प्रत्येक पानावर मजकुराभोवती सोनेरी वर्खाने नक्षी काढलेली. चामडय़ावर लिहिली गेलेली पुस्तके बाळगणे हे श्रीमंतीचे लक्षण. नक्षीकामाने त्याची किंमत आणखी वाढत असे. बहुतेक वेळा धार्मिक मजकूर त्यात असे. यापैकी ‘द बुक ऑफ अवर्स’ हे पुस्तक इथे डौलात एका स्टँडवर विराजमान होते. ‘या नक्षीयुक्त हस्तलिखिताचे काम ७ सप्टेंबर १५०८ रोजी फ्लोरेन्सच्या वर्कशॉपमध्ये पूर्ण झाले. काल्कागिनी कुटुंबासाठी ते बनवले गेले’. त्यावरच्या नक्षीकामाचे प्रमाण खुद्द ‘द लाइव्ह्ज ऑफ आर्टिस्ट्स’ लिहिणाऱ्या जिओर्जिओ वसारीने दिले आहे. १९९ पानांचे, नऊ बाय साडेपाच सेंटिमीटरचे हे पुस्तक! कागद व छापण्याचे तंत्र आले व युरोपातल्या वैचारिक पुनरुत्थानाने जसा वेग घेतला तसे हे नक्षीकाम वगैरे उद्योग मागे पडले व मजकुराला महत्त्व आले. पुस्तकांचे बाइंडिंग ही महत्त्वाची कला होती. हे तंत्र सांगणारी पुस्तके उदयाला आली. काही विक्रेत्यांकडे ‘बाइंडिंग’बद्दलची, गेल्या शतकातील पुस्तके पाहायला मिळाली.