छगन भुजबळ म्हणजे आक्रमक नेते. त्यांच्या भाषणात नेहमीच आक्रमकता असते. इतर नेत्यांची खिल्ली उडविण्याची त्यांची शैलीही वेगळीच. पण त्या दिवशी अशाच आक्रमक शैलीतील भाषणात भुजबळांना बहुधा भान राहिले नाही. त्यातून त्यांची गाडी सुसाट सुटली मग चूक लक्षात येताच त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचे झाले असे की, सावित्रीबाई फुले यांच्या साताऱ्यातील नायगाव या जन्मभूमीतील कार्यक्रमात बोलताना भुजबळ सांगत होते की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर ही महाराष्ट्राची शक्तिस्थळे आहेत. यांच्यामुळे पुरोगामी राज्याची ओळख होते. साताऱ्यातील नायगाव हे सावित्रीबाईं फुलेंचे जन्मभूमी तर पुणे कर्मभूमी. येथे आल्यावर प्रत्येकाला स्फूर्ती मिळते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा कायम येत जा तुम्हालाही येथून नक्की स्फूर्ती मिळेल असे भुजबळ बोलून गेले, व्यासपीठासह सभास्थळी एकच हशा पिकला. तेव्हा काही तरी आपल्याकडून चूक झाल्याचे भुजबळ यांच्या लक्षात आले. मग आपलं भाषण सावरत भुजबळ म्हणाले, तुम्ही कायम मुख्यमंत्री राहिला म्हणून हरकत नाही, पण मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणजे काटेरी खुर्ची असते याची आठवण शिंदे यांना करून दिली.

गुवाहाटी. सारे काही ओक्के..

राज्यात सत्तांतर झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबरील आमदारांनी मुंबई व्हाया सुरत गुवाहाटी गाठली. मग पुढे आठ दिवस आमदारांच्या गुवाहाटीतील मुक्कामाची चर्चा रंगली. आमदार शहाजीबापू पाटील यांचा ‘हाटील, डोंगूर, सारे काही ओक्के’ हा संवाद तर चांगलाच गाजला. आता उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सदस्यांच्या मतांना महत्त्व आले तेव्हा सातारा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सदस्याने ‘ऑन दी वे टू गुवाहाटी’ असे स्टेटस लिहिले. झाले मग या सदस्याला ‘सारे काही ओक्के का’ अशी विचारणा होऊ लागली. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर ५० खोक्यांचा आरोप झाला. बिचारा ग्रामपंचायत सदस्य..  ती पण उपसरपंचाची निवडणूक. पण गुवाहाटीला गेल्याचे सांगून बसला आणि नाहक बदनाम झाला.

kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

भ्रष्टाचारात सुधारणा

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदानकदा काही ना काही आंदोलन सुरूच असतात. शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचे असेच एक आंदोलन झाले. संघटनेचे अध्यक्ष झाकले माणिक; त्यातही ते वकील. गावातील गैरव्यवहाराचे मुद्दे घेऊन त्यांनी धरणे आंदोलन केले. मात्र, ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून आंदोलन केले; त्याबाबतच्या हाती धरलेल्या फलकावर ‘भ्रष्टाचार’ हा शब्दच चुकीच्या पद्धतीने लिहिला होता. आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या छायाचित्रकारांच्या ही बाब निदर्शनास आली. मग सुधारणा करण्यात आली. यावर  ‘भ्रष्टाचारात सुधारणा झाली’, अशी खुमासदार प्रतिक्रिया उमटली.

(सहभाग : विश्वास पवार, दयानंद लिपारे)