उज्ज्वला देशपांडे

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची बातमी अलीकडेच अनेक वृत्तपत्रांतून आली… तरीही अनेकांचे या बातमीकडे दुर्लक्षही झालेले असेल, कारण ही अशीच बातमी अधून-मधून येतच असते. ज्ञानदेवांच्या आळंदीतून, तुकोबारायांच्या देहूतून वाहणारी ही नदी आज प्रदूषणामुळे जीर्ण- जर्जर होऊन वाहाते. पण ही परिस्थिती गेल्या जुलैपासून सुधारेल असे वाटले होते, एवढे खरे.

Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट

याचे कारण, जुलै २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची’ झालेली स्थापना. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आळंदीत जाऊन वारीच्या तयारीचे अवलोकन केले आणि इंद्रायणी प्रदूषणमुक्तीच्या सूचना दिल्या. ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळाने’ जी कामे करणे अपेक्षित आहे त्यात एक महत्त्वाचे काम म्हणजे ‘चंद्रभागा, इंद्रायणी आणि गोदावरी नद्या प्रदूषणमुक्त करणे’ हे आहे. हे सर्व सुरू असतानासुद्धा परत-परत हे भयानक प्रदूषण पण सुरूच राहते.

भारतातल्या बहुतांशी सगळ्याच नद्या अशाच प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत, आपणच अडकविलेल्या आहेत. वेगवेगळे तज्ज्ञ याविषयी सतत आपल्याला जागृत करायचे प्रयत्न करतात, थोड्या प्रमाणात ती जागरुकता होते सुद्धा, पण ती पुरेशी नाही, हेच वारंवार सिद्ध होत राहाते. परंतु या नद्या फक्त ‘पवित्रस्नान करण्याच्या नद्या’ म्हणून स्वच्छ नाही करायच्या. महामंडळ शासनाबरोबर काम करून हे करेलही परंतु नेहमीच प्रशासन, मंत्रिमंडळ यांवर अवलंबून राहून बदल होत नाहीत. नदी पुनरूज्जीवनासाठी ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे परंतु निधी अभावी हा पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला आहे. अनेक प्रकल्पांमध्ये निधी उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा प्रश्न अनुत्तरितच राहिलेले आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येते, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा निधी उपलब्ध झाल्यावर सुटेल याची खात्री नाहीच. अशा वेळी आठवते ते, दुसऱ्या संतसाहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण!

आणखी वाचा-आचार्यांच्या ‘दर्पणा’त आजची पत्रकारिता कशी दिसते?

अर्थशास्त्र आणि संतसाहित्याचे तज्ज्ञ अभ्यासक अभय टिळक हे २०१३ साली नेरुळ (नवी मुंबई) येथे भरलेल्या त्या संतसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे त्या संमेलनातील अध्यक्षीय भाषण फक्त विशिष्ट समूहालाच नाही तर आपणा सर्वांनाच मार्गदर्शन करणारे आहे. संत विचार आचरणात आणण्याचे त्यांचे आग्रही मत – प्रत्यक्षात आचरण खूप अवघड आहे हे माहीत असूनही – आजच्या काळात महत्त्वपूर्ण ठरते. आपल्या रोजच्या जगण्याशी, आपल्या समस्यांशी संतांच्या शिकवणीची सांगड घालून ते प्रश्न कसे सोडवता येतील याचे आत्मपरीक्षण कसे महत्त्वाचे आहे हे अभय टिळक यांच्या लिखाणातूनही समजत असते, हे विशेष. अभय टिळक यांनी त्या भाषणात, ‘संतविचार फक्त पारायणातच महत्त्वाचे नाहीत तर आचरणासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत’ हे प्रामुख्याने सांगितले आहे. त्या भाषणाला संमेलनातील उपस्थितांचा प्रतिसादही मिळाला होता… पण तो कोरडाच ठरला. इंद्रायणी प्रदूषित होतच राहिली.

शालेय अभ्यासक्रमापासून पुढे उच्च शिक्षणातल्या सामाजिक शास्त्रांमध्ये ‘भक्ती चळवळ आणि त्यांनी घडविलेला महाराष्ट्र’ ह्याचे संदर्भ अनेकदा येतात. आता तर शासन, ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’च्या मदतीने सर्वसामान्य, कष्टकरी, पांडुरंगाचे वारकरी भक्त जर या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची ‘पर्यावरण भक्ती चळवळ’ मोठ्या प्रमाणात करू शकले तर ‘महाराष्ट्र नव्याने घडायला’सुद्धा खूप मोठा हातभार लागेल. दबावगट म्हणून वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी – यात मुख्यत्वे तरुण वारकरी आणि स्त्रियांनी – काम करणे अतिशय गरजेचे आहे. वारकरी, वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. संतविचारांनी जसे चित्त शुद्ध होण्यास मदत होते तसेच ‘पर्यावरण भक्ती चळवळी’ने नद्या शुद्ध होतील.

आणखी वाचा-लिलियन कार्टर नसत्या तर जिमी कसे घडले असते?

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये संतांच्या नावाने ‘अध्यासने’ सुरू आहेत. त्या अध्यासनांमधल्या तज्ज्ञांना सुद्धा यात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष कृतीतून चांगले बदल होतील हे बघता येईल. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मध्ये इंटर्नशिप वर खूप भर दिलेला आहे. वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून याविषयी जागृती निर्माण करणे शक्य आहे आणि विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांचे प्रयत्न समजून घेऊन, त्यांची पाठ थोपटणेदेखील महत्त्वाचे आहे.

‘मी वारकरी नाही’, ‘मला इंद्रायणीत स्नान वगैरे कधी करायचे नाही’, ‘मी कशाला यात पडू’ असे संकुचित विचार बिगर-वारकरी समाजाने करून उपयोगी नाही. सर्वसामान्य माणसाने पण नजरेसमोर चुकीचे घडत असेल तर त्या विरोधात बोलले पाहिजे. ‘चुकीचं वागणारी माणसं आपल्या जिवाचं काहीतरी वेडवाकडं करतील, मी कशाला पडू मध्ये’ अशी भीती वाटत असेल तर निदान वृत्तपत्रात त्याविषयी लिहा. नद्यांमध्ये प्रदूषण कशामुळे, कोणामुळे होतं (रसायनमिश्रित पाणी, सांडपाणी, अस्थिविसर्जन, निर्माल्य, इ.) हे माहीत असून सुद्धा जर त्यावर कारवाई होत नसेल तर त्यात वेगवेगळ्या लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत असाच अर्थ निघतो.

नद्या प्रदूषणमुक्त झाल्या नाहीत तर आपल्याला कायमस्वरूपी (कोविड नसताना सुद्धा) क्वारंटाईन होण्याची वेळ येईल! हा प्रश्न इंद्रायणीचा, भीमेचा, यमुनेचा, गंगेचा आहेच; पण धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध नसलेल्या अनेक नद्यांचाही आहे. तो सोडवण्यासाठी ‘पर्यावरण-भक्ती चळवळ’ गरजेची आहे.
अशी चळवळ सुरू करण्याची सुबुद्धी पांडुरंग आपणा सर्वांना देवो!

ujjwala.de@gmail.com

Story img Loader