रामनाथ कोविंद ( माजी राष्ट्रपती)

मोदीजींवर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या सर्व कृतींतून, त्यांच्या कार्यक्रमांतून आणि धोरणांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारे पंतप्रधान, असाच मोदी यांचा उल्लेख करावा लागेल..

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Loksatta entertainment The movie Mahaparinirvana will release on December 6
‘महापरिनिर्वाण’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

भारत आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना, ज्यांनी आपल्या समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना पंख दिले ते आपल्या संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत त्यानंतरच्या अनेक सरकारांनी योगदान दिले असले तरी नरेंद्र मोदी सरकारने बाबासाहेब आंबेडकरांची अपूर्ण स्वप्ने साकार केली आहेत.

ज्यांचा मला प्रदीर्घ आणि संस्मरणीय सहवास लाभला, त्या आपल्या प्रिय पंतप्रधानांचाही आज वाढदिवस आहे. आधी संघटनात्मक काम करणारी व्यक्ती म्हणून, नंतर मुख्यमंत्री म्हणून आणि आता पंतप्रधान म्हणून काम करताना त्यांना मी पाहिले आहे. आपल्या समाजातील दलित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी मोदीजींची आस्था आणि यादृष्टीने त्यांचे प्रचंड कार्य; त्यांची दलित, आदिवासी आणि महिलांबद्दल काळजी याने मला सर्वात जास्त प्रभावित केले. बाबासाहेबांचे खरे शिष्य म्हणून मोदीजी भारताला समतावादी समाज बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘फेडरर रिपब्लिक’..

मोदीजींवर असलेला डॉ. आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या सर्व कृतींतून, त्यांच्या कार्यक्रमांतून  आणि धोरणांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. एक संघटनात्मक काम करणारी व्यक्ती असल्यापासून ते मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान या नात्याने मोदीजींनी नेहमीच बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल केली आहे. ‘पंचतीर्थ’च्या रूपाने मोदीजींनी देशाला आणि जगाला आयुष्यभर स्मरणात राहील अशी भेट दिली आहे. ते हेच मोदीजी आहेत ज्यांनी बाबासाहेबांची जयंती ‘समरसता दिवस’ म्हणून साजरी करण्याचा निर्णयच केवळ घेतला नाही तर २६ नोव्हेंबर हा भारताला ‘संविधान दिन’ म्हणून दिला. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकारानेच संयुक्त राष्ट्रांनीही बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली.

डॉ. आंबेडकरांच्या ध्येयाची जाणीव..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपूर्ण ध्येयांची जाणीव करून देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या दोन महत्त्वाच्या कृती म्हणजे अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणे.

डॉ. आंबेडकर यांचा तीव्र आक्षेप असूनही, अनुच्छेद ३७० हा आपल्या राज्यघटनेचा भाग बनला ज्यामुळे जम्मू-काश्मीरचे भारताशी एकीकरण करण्याला खोडा बसला होता. मोदीजींच्या दृढ वचनबद्धतेमुळे आणि इच्छाशक्तीमुळेच अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आला.

पंतप्रधान मोदी सशक्त, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मोहीम उघडल्यासारखे काम करत आहेत. ‘आत्मनिर्भर’ होण्याचा मार्गच भारताला विकसित देश बनवू शकतो हे डॉ. आंबेडकरांना माहीत होते. भारताला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्यासाठी पूर्वीच्या सरकारांमध्ये इच्छाशक्ती आणि वचनबद्धतेचा अभाव होता. मोदीजींनी यात सुधारणा करायला सुरुवात केली आणि भारताचा पराक्रम जगाला दाखवला. आज जगाने आपले सामर्थ्य मान्य केले आहे.

राष्ट्रपती या नात्याने मी जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींशी सामाजिक मुद्दय़ांवर आणि प्रशासनासंदर्भात संवाद साधत असे तेव्हा आपल्या व्यवस्थेत खोलवर रुजलेला भ्रष्टाचार त्यांना सर्वात जास्त चिंतित करत असे. याचा सर्वाधिक त्रास गरीब लोकांना होतो, असे ते म्हणत असत. गेल्या आठ वर्षांत आपण मोदीजींना भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देताना  आणि सर्व सरकारी योजनांची फळे गरिबातील गरिबांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करताना पाहिले आहे. आज सरकारी योजनांच्या लाभार्थीना थेट त्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व योजनांमध्ये गरिबातील गरीब लोकांबद्दलचा कळवळा दिसून येतो.

गुणवत्तेचाच आधार..

मोदीजींच्या चिंतेचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील घराणेशाहीचे राजकारण. घराणेशाहीचे राजकारण खऱ्या आणि मेहनती राजकीय कार्यकर्त्यांचे हक्क कसे हिरावून घेत आहे, याबद्दल त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. आधी संघटनात्मक काम करणारी व्यक्ती म्हणून, नंतर मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी नेहमीच गुणवत्तेच्या आधारावर नेते आणि कार्यकर्त्यांना बढती दिली आहे. मोदीजींनी घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध जो लढा पुकारला आहे, त्याचे परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे. डीएनए-आधारित नव्हे तर गुणवत्तेवर आधारित राजकारण हे आपली लोकशाही अधिक सचेत आणि बळकट करेल.

मोदी सरकारच्या शैलीचे द्योतक असलेले पद्म पुरस्कार हेदेखील एक क्षेत्र आहे. श्रीमंत वर्गासाठी निव्वळ एक उपाधी म्हणून उरलेल्या पद्म पुरस्कारांचा ‘आम आदमी’सोबतचा हरवलेला संबंध सापडला आहे. हे पुरस्कार आता विशेषत: ‘डाऊन टू अर्थ’ म्हणजेच जमिनीवर घट्ट पाय रोवून कार्य करणाऱ्यांना समर्पित आहेत.

मला नरेंद्र मोदी सरकारच्या दोन महत्त्वाच्या उपक्रमांबद्दलही बोलायचे आहे ते म्हणजे, ज्यांनी अत्यंत मागासलेल्या भागात प्रगती आणि विकासाचा एक नवीन अध्याय लिहिला आहे आणि तळागाळातील लोकांच्या जीवनावर परिणाम केला आहे ते उपक्रम : (१) आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि (२) आदर्श ग्राम योजना. मोदीजींची चौकटीबाहेर विचार करण्याची पद्धत, त्यांचे निर्दोष नियोजन आणि चोख अंमलबजावणी हा अनोखा गुणधर्म यांतून दिसतो. 

मोदीजींच्या या गुणधर्मामुळे गरिबातील गरीब लोकांच्या जीवनात मूर्त बदल घडवून आणले आहेत. अनेक समाजकल्याणकारी योजना याचे उत्तम उदाहरण आहेत. ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. ही जगातील सर्वात मोठी मोफत शिधावाटप योजना असून या योजनेचा लाभ करोना महामारीशी धैर्याने लढा देणाऱ्या भारतातील ८० कोटींहून अधिक लोकांना झाला.

दोन स्वदेशी लशी!

प्राणघातक विषाणूविरुद्ध भारताच्या लढय़ात पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे नेतृत्व केले ते मी जवळून पाहिले आहे. त्यांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे आणि प्रोत्साहनामुळेच आपले शास्त्रज्ञ आणि डॉक्टर एक नव्हे तर दोन स्वदेशी म्हणजेच ‘मेड इन इंडिया’ लशी विकसित करण्यात यशस्वी ठरले, ज्या लशींनी आपल्यालाच केवळ सुरक्षा कवच दिले नाही तर इतर अनेक देशांचीही काळजी घेतली. पंतप्रधानांनी १०० कोटींहून अधिक भारतीयांचे लसीकरण करण्याचे मोठे कार्य हाती घेतले, जेव्हा महामारी शिगेला पोहोचली होती तेव्हा अशा प्रकारे जगातील सर्वात मोठा आणि जलद लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. जेव्हा कोविडने विकसित देशांना कोलमडवले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी आपल्या आरोग्य पायाभूत सुविधा बळकट केल्या आणि विस्तारल्या. वेळोवेळी केलेल्या आपल्या धोरणात्मक उपक्रमांद्वारे मोदीजींनी आपला आर्थिक विकास खुंटला जाणार नाही हेदेखील सुनिश्चित केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील गेली आठ वर्षे उल्लेखनीय होती. मोदीजी अनेक नेत्यांकडून प्रेरणा घेतात, पण बाबासाहेब आंबेडकरांची छाप त्यांच्या शासन पद्धतीवर सर्वव्यापी आहे. भारतीयत्व हीच आपली खरी ओळख आहे आणि सशक्त राष्ट्र घडवायचे असेल तर आपण सर्वानी जात, पात, धर्म याच्या पलीकडे गेले  पाहिजे, अशी शिकवण देणाऱ्या भारतरत्न आंबेडकरजी यांचे खरे अनुयायी म्हणून मी मोदीजींना पाहतो. आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या पंतप्रधानांनी ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य बनवले असून सुशासन, सामाजिक एकसंधता आणि शिस्त ही त्यांच्या सरकारची वैशिष्टय़े आहेत.