ताराबाईंनी आपल्या राजकीय आयुष्यात तीन लढे दिले. पहिला लढा मोगल बादशहा औरंगजेबाशी, दुसरा लढा आपला पुतण्या शाहूराजांशी आणि तिसरा लढा शाहूराजांचा भट घराण्यातील तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाशी. तिन्ही लढ्यांचे कालखंड वेगवेगळे, उद्दिष्ट्ये वेगवेगळी व फलितेही वेगवेगळी होती आणि ती तशी असणे स्वाभाविकच होते. पण या तिन्ही लढ्यांत एक गोष्ट समान होती. ती म्हणजे होते. पहिल्या लढ्यात स्वराज्यावरील औरंगजेब हे तिन्ही लढे कोणत्या ना कोणत्या आक्रमणाविरुद्ध ‘आयत्या बिळात… शिरणाऱ्या शाहाजाचे बादशहाचे आक्रमण होते. दुसऱ्या लढ्यात ताराबाईंनी प्राणपणाने रक्षण केलेल्या स्वराज्यावर आक्रमण होते, तर तिसऱ्या लढ्यात स्वराज्याच्या छत्रपतीच्या अधिकारांवर झालेले नानासाहेब पेशव्याचे आक्रमण होते. या तिन्ही लढ्यांत आणखी एक बाब समान होती.

ती म्हणजे हे तिन्ही लढे त्यांनी जिद्दीने चालविले. त्यात यश कमी अधिक मिळाले असेल. पण तिन्ही प्रतिस्पध्यांपुढे तिने हार पत्करली नाही. त्यापैकी औरंगजेब परका शत्रू पण शाहूराजा व नानासाहेब दोघे स्वकीय. हे तिघेही ताराबाईंना हटवू शकले नाहीत. औरंगजेबाने तर तिच्या पुढे हताशपणे हात टेकले होते. शाहूराजांस खेडच्या लुटीपुटीच्या लढाईत विजय मिळाला. पण पुढे जेव्हा वारणा पार करून ताराबाईंच्या राज्यावर त्यांनी स्वारी केली, त्या वेळी गनिमी काव्याने लढणाऱ्या आपल्या चुलतीस ते पूर्णपणे हरवू शकले नाहीत. मोहीम अर्धवट टाकून ते साताऱ्यास परतले. ते परत जाताच ताराबाईंनी त्यांनी जिंकलेले सर्व किल्ले व प्रदेश पुन्हा काबीज केले! वारणेच्या दक्षिणेकडील शाहूराजांचा विजय पूर्ण वाया गेला.तिसरा लढा तर ताराबाईंच्या बाजूने विचार करता फारच अवघड होता. कारण औरंगजेबाशी काय अगर शाहूराजांशी काय लढताना ताराबाईंजवळ स्वतःचे राज्य, स्वतःचे सैन्य व राजकीय पदाचा अधिकार या गोष्टी होत्या. पण काहीच नव्हते. ना राज्य, ना सैन्य, ना कोणत्या नानासाहेबांशी लढताना यापैकी त्याच्याजवळ पदाचा अधिकार ! अशा अवस्थेत पेशव्याशी दोन हात करण्यास उभे राहणे, ही काही सामान्य गोष्ट नव्हती. त्यासाठी वाघिणीचे काळीज असायला लागते. ते ताराराणीकडे होते.

घटनात्मकदृष्ट्या हिंदुस्थानात मराठ्यांचा दर्जा मोगलांच्या छत्राखालचे एक मांडलिक राज्य अशीच राहिली. या देशातील एतद्देशीय सत्ताच नव्हे तर परकीय सत्तेच्या दृष्टिकोनातूनही मराठे हे मोगलांचे मांडलिकच मानले गेले. पोर्तुगीज इतिहास-संशोधक स. शं. देसाई म्हणतात की छ. संभाजीराजास पोर्तुगीज एखाद्या सार्वभौम राजाप्रमाणे सन्मान देत असत. पण त्यांचा पुत्र शाहूराजास मात्र त्यांनी हा सन्मान देण्यास नकार दिला होता. देसाई सांगतात, “वसईचे युद्ध चालू असताना देखील शाहूराजे पोर्तुगीजांना पत्रे पाठवून त्यांना आपणास नजराणा पाठविण्याबद्दल कळवीत होते. पण ही मागणी पोर्तुगीजांनी कधीच मान्य केली नाही. गोव्याचा व्हिसेरेई (व्हाइसरॉय) पोर्तुगालच्या राजास लिहिलेल्या पत्रात म्हणतो की, ‘एका मांडलिक राजाकडे नजराणा पाठवून आम्ही आमची प्रतिष्ठा कमी करून घेणार नाही.’ पोर्तुगीजांचे हे हट्टाग्रही धोरण शेवटपर्यंत टिकले. “(पोर्तुगीज-मराठा संबंध, पृ. १४) पूर्वसुरींनीच सुरू केलेली भूमिका स्वीकारून ताराबाईनी शाहूराजांस विरोध सुरू केला होता.

त्यामागे राज्याचे खरे हित होते, असा निष्कर्ष इतिहासाचार्य राजवाडे यांनीही काढला आहे. शाहूराजाच्या प्रत्यागमनाने मराठ्यांत सरंजामशाहीचा स्वीकार व मोगलांचे अंकितत्त्व या बाबी उदयास आल्या असे सांगून राजवाडे म्हणतात, “शिवाजीने व राजारामाने घालून दिलेला कित्ता ताराबाईस व तिच्या सरदारांन सर्वस्वी गिरवावयाचा होता. त्यात त्यांना या येते तर शिवाजीने स्थापन केलेल्या स्वराज्याचे फारच हित होते. परंतु मोठमोठ्या जहागिरीच्या लालुचीत शत्रूच्या पक्षास मिळालेल्या सेनापती प्रभूतो बड्याबड्या सरदारांपुढे ताराबाईसारख्या स्त्रीचे व तिच्या लहान सरदारांचे तेज पडले नाही व महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेत बेबंदशाहीचे बीज अप्पलपोटेपणाच्या तडाख्यात कायमचे पेरले गेले.” (निजाम-पेशवे संबंध, पृ. १९) शाहूराजांच्या आगमनानंतर ताराराणींस सोडून शाहूराजांस मिळालेले सरदार हे कोणा शाहूराजाच्या आगमनानंतर ताराबाईंचा पक्ष तत्त्वासाठी नाही, तर जहागिरीच्या लालुचीने मिळाले, असा घणाघाती आरोप इतिहासाचार्यांनी केला असून महाराष्ट्रातील बेबंदशाहीला शाहूराजा व त्याला मिळालेले मराठा सरदार कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.पार्श्वभूमीवर ताराबाई-शाह संघर्ष तपासून पाहिला पाहिजे. केवळ आपल्या पुत्राच्या राज्याच्या आमचे म्हणणे एवढेच की या सर्व हक्कासाठी वेडी झालेल्या एका मातेने केलेला हा लढा नव्हता; तर त्यामागे शिवशाहीत अखंडपणे प्रवाहित झालेले शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे तत्त्व कार्यान्वित होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

 ताराबाईंची नैतिक बाजू त्यांच्यापासून राज्याचा हक्क मागणाऱ्या शाहूराजांच्या बाजूपेक्षा भक्कम पायावर उभी आहे. नैतिकता ही शाश्वत मानवी मूल्याच्या साह्याने वाटचाल करीत असते. त्या काळात राजकीय स्वातंत्र्य व सार्वभौमता ही मराठ्यांच्या राजकीय जीवनपद्धतीची मूल्ये होती. आणि ती मराठ्यांच्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींनी निर्माण केली होती. त्या मूल्यांच्या रक्षणासाठी व जोपासणीसाठी शेकडो मावळ्यांनी आपले प्राण खर्ची घातले होते. खुद्द शिवाजी महाराजांना अनेक जीवघेण्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते. या मूल्यांच्या आधारावरच मराठ्यांचा राजा कर्नाटकात आठ वर्षे परागंदा झाला तरी त्याचे अनुयायी स्वराज्यात शत्रूशी लढत राहिले. याच मूल्यांच्या रक्षणासाठी महाराणी ताराबाई शाहूराजाशी संघर्ष करावयास उभी राहिली असेल तर तिच्यावर वैयक्तिक स्वार्थाचा आरोप करणे अन्यायकारक आहे आणि तसेच म्हणायचे तर ताराबाईंनी सुरक्षित ठेवलेले राज्य ‘आयत्या पिठावर’ येणाऱ्या शाहूराजांनी मागणे म्हणजे त्यांचा वैयक्तिक राजकीय स्वार्थ नव्हता काय ? ताराबाईंनी शाहराजाने प्रयत्न केला ना पेशव्यांनी ते आठवणीत ठेवले. पेशवा नानासाहेब आपल्या कारकिर्दीत एकदा म्हणाला होता की आपण शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत.” पण त्याचा हा उद्‌गार ‘वचस्येकं मनस्येकं (बोलणे एक व मनात एक) या न्यायानेच काढलेला होता!

स्वार्थभाव सोडून देऊन शाहाजास साथ दिली पाहिजे होती, असे म्हणणाऱ्यांना शाहूराजाने आपला स्वार्थीभाव सोडन देऊन ताराबाईंना साथ दिली पाहिजे होती, असे का विचारू नये. तुम्ही पूर्वीप्रमाणेच राज्यप्रमुख राहा, मीही तुमच्या पुत्राप्रमाणेच आहे. मी शिवाजीराजांबरोबर ममतेने राहून कारभार सांभाळीन, अशी भूमिका शाहाजांनी घेतली असती, तर मराठेशाहीतील पुढची दुही टळली असती, असे का न म्हणावे ? पण एकदा का ताराबाईंची भूमिका स्वार्थी ठरवून त्यावर शिक्कामोर्तब केला की असे प्रश्न डॉ. ब्रिज किशोरसारख्या पूर्वग्रहदूषित दृष्टीच्या इतिहासकारांना अभावानेच पडतात.