बुकरची लांबोडकीनामांकन यादी प्रसिद्ध होते, तेव्हा त्यातल्या १२ कादंबऱ्यांवर जगभरातील पुस्तकवेड्यांचे सारखेच लक्ष जाते. खरेदी किंवा वाचनयादीत तिची नोंद होते. पण लघुयादी आल्यानंतर उरलेल्या सहा कादंबऱ्या लवकरच दुर्लक्षित होतात. त्यात लेखक वा लेखिकेची पहिली कादंबरी असली, तर तातडीने विसरलीही जाते. पण खेळाशी संबंधित असली, तरी रिटा बुलविंकल (या पूर्वाश्रमीच्या खेळाडूची) यांच्या ‘हेडशॉट’बाबत हे झाले नाही. गेले वर्ष अखेरीपर्यंत माध्यमांच्या महत्त्वाच्या वाचनयादीत ती बुकरउत्साहानंतरही टिकून राहिली.

‘हेडशॉट’ ही कादंबरी जितकी मुष्टियुद्धातील सर्वोत्तम आठ अमेरिकी तरुण मुलींच्या खेळाची कथा आहे, त्यापेक्षा अधिक ती त्या मुलींच्या मनात चालणाऱ्या आंदोलनाची कहाणी आहे. ही कादंबरी मुष्टियुद्ध या खेळाबद्धल, खेळाडूंसमोरील आव्हाने, त्यावर त्यांनी केलेली मात, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शेवटी अथक प्रयत्नांनी मिळालेले यश यांची प्रेरणाकथा आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
delhi assembly election loksatta news,
मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी आता दिल्ली विधानसभेच्या मैदानात… ‘हे’ आहेत भाजपचे ४० स्टार प्रचारक
Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
fti former president gajendra chauhan s
“नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आता पंतप्रधान देणार”, ‘या’ अभिनेत्याच्या वक्तव्याने…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ

इथे पहिल्याच पानावर पुुस्तकाच्या पारंपरिक रचनेनुसार प्रकरणांची नावे नसून जे मुष्टियुद्धाचे सात सामने होणार आहेत त्यांची सूची आणि सामन्यांतील स्पर्धकांची नावे दिली आहेत. माहिती फलकावर जसा सामन्यांचा तपशील दिला जातो तशीच माहिती या राष्ट्रीय स्तरावरील, अठरा वर्षांखालील ‘डॉटर्स ऑफ अमेरिका कप’, मुष्टियुद्ध स्पर्धा, स्थळ बॉब्स बॉक्सिंग पॅलेस (जी खरंतर एक वखार किंवा गोदामाची जागा आहे) रेनो, नेवाडा, इथे १४ आणि १५ जुलै २०२० रोजी होत असल्याची माहिती कादंबरीच्या सुरुवातीला येते. त्यावरून प्राथमिक फेरी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूंची माहिती सहजच कळते, फक्त अंतिम फेरीत विजयी कोण होते, याचे रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवले जाते. त्यामुळे हे स्पष्टच आहे की सामन्यातील जय पराजय यापेक्षा वेगळे काहीतरी वाचकांसमोर मांडण्याचा लेखिकेचा मानस आहे. प्रत्येक प्रकरणात एका सामन्याचे वर्णन आले आहे, ज्यात लेखिका प्रत्यक्ष मुष्टियुद्धाच्या चालींबरोबरच त्या मुलींची पार्श्वभूमी, वर्तमान आणि भविष्याचे चित्र उभे करताना त्यांच्या प्रत्येकीच्या मनात चाललेल्या द्वंद्वाचेही चित्रण करते. पौगंडावस्थेतील या मुली आयुष्यातील परिवर्तनाच्या सीमारेषेवर आहेत.

या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे कथानकामध्ये प्रत्येक सामन्यानंतर जिंकलेल्या खेळाडूला महत्त्व देण्याऐवजी हरलेल्या खेळाडूचा सर्व तपशील अधिक्याने दिला आहे. आपल्या समस्यांचे निराकरण करायचे असेल तर जिंकलेल्या व्यक्तीपेक्षा हार झालेल्या व्यक्तीच्या अभ्यासातून बरेच शिकता येते हा हेतू. मुष्टियुद्धाच्या सामन्याच्या अंतिम निकालापेक्षा या सर्व तपशिलाला देण्यात आलेले महत्त्व हा यातील वेगळेपणा. परिच्छेदांची लांबी कधी कधी अगदी काही ओळींची आहे. त्यामुळे सलग कथन न होता टप्प्याटप्प्याने होते आणि वाचक माहितीसाठी मनात वेगवेगळे सुटसुटीत कप्पे तयार करू शकतात.

अन्य कोणत्याही खेळाच्या तुलनेत मुष्टियुद्ध या खेळाचं वैशिष्ट्य हे आहे की, या खेळात खेळाडूचे शरीरच खेळाचे आयुध असते. इतर खेळांना काही माध्यमे असतात. उदा. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट खेळताना रॅकेट, बॅट, सॉकरसाठी बॉल, अगदी बुद्धिबळातसुद्धा चौसष्ट घरांचा पट आणि बत्तीस प्याद्यांचे माध्यम असते. मुष्टियुद्धात मात्र खेळाडूंचे शरीरच खेळाचे मैदान असते. या शरीरात एक मनही असते आणि त्यामध्येही भावनांचे युद्ध सुरू असते. जसे दृश्य स्वरूपात मुष्टियुद्ध सुरू असताना खेळाडू एकमेकांना चित करण्यासाठी वार-प्रतिवार करत असतात आणि स्वत:चा बचाव करत प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करण्याच्या चाली आखतात, तसेच मनाच्या रणभूमीवर या अशा परस्पर विचारांचा संघर्ष होताना अनुभवायला येते.

आर्टेमिस व्हिक्टर, अॅन्डी टेलर, केट हेफर, रेचल डोरिको, इग्गी लॅन्ग आणि इज्झी लॅन्ग या चुलत बहिणी, रोझ मुलर आणि तान्या मॉव या त्या आठ खेळाडू. या प्रत्येक पात्राचे वर्णन विस्ताराने आले आहे. प्रत्येकीचे एक तत्त्वज्ञान – उदा. रेचलचा विश्वास प्रतिस्पर्ध्यांमध्ये भीती निर्माण करण्यावर आहे. ‘ज्या गोष्टी पूर्णपणे अनाकलनीय आहेत त्याचे समोरच्याला भय वाटू शकते’, अशी तिची धारणा. त्यामुळे विरोधकांना भयकंपित करण्यासाठी ती कधी पुरुषाचा पोशाख धारण कर, कधी प्राण्याचा पेहराव कर, अशा युक्त्या योजते.

त्यांचे सामने सुरू असताना प्रत्येकीचा भूतकाळ डोकावतो. एकीला प्रत्यक्ष सामन्यात प्रतिस्पर्ध्याला ठोसे मारत असताना, ज्या पोहण्याच्या तलावात ती जीवरक्षकाची नोकरी करत होती तिथे बुडून मृत्यू पावलेल्या छोट्या मुलाची सतत आठवण येते. ती जणू त्याच सतावणाऱ्या आठवणीशीही दोन हात करत राहते. दुसऱ्या एकीला सामना खेळताना तिच्या कुटुंबाच्या मुष्टियुद्धपटुत्वाच्या इतिहासाशी लढावे लागते. तिचा या खेळातला वारसा हाच तिचा मुख्य प्रतिस्पर्धी. तिच्या बहिणीचे जेतेपदच तिला आव्हानात्मक वाटते. आजून एकीचे भविष्य या खेळामध्ये घडणार नसतेच. ती पुढे जाऊन एक बरी नटी होणार असते. तर आर्टिमिस ही मुष्टियुद्धांतील जखमांमुळे साठाव्या वर्षी चहाचा कपही नीट धरू शकणार नसते, अशाप्रकारे खेळाडूंच्या भविष्याचाही तुकडा कादंबरीच्या निवेदनात आणलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मुष्टियुद्धाबरोबरच जीवनातल्या त्यांच्या झगड्याचे वर्णन इथे येताना दिसते. वाचक पात्रांच्या या लढाईत इतका बुडून जातो की कादंबरी संपल्यावर जिंकले कोण याला महत्त्व उरत नाही.

कादंबरीत विजेतीला मिळणारा करंडक सोनेरी मुलामा दिलेला, पण प्लास्टिकचा असतो. सामन्याची सुरुवात करायला रिंगमध्ये जात असताना स्पर्धकाच्या लक्षात येते- त्या करंडकाला जिथे जोड दिलेला आहे त्या ठिकाणी एक चीर पडलेली आहे. त्यामुळे त्यात पाणीदेखील भरून ठेवता येणार नाही. एवढा संघर्ष करून हाती जे लागणार ते इतके कचकड्याचे, तकलादू असणार. कादंबरीत प्लास्टिकचा उल्लेख जागोजागी येतो. स्पर्धक उतरलेल्या मोटेलमधला ब्रेड प्लास्टिकसारखा दिसतो, एका बाळाचा प्लास्टिकच्या तुकड्यामुळे गुदमरून मृत्यू होतो.

रिटा बुलविंकल स्वत: वॉटर पोलो, बास्केट बॉल या खेळांत पारंगत. स्पर्धेचे मैदान हे एखाद्या प्रेशर कूकरच्या आतील वातावरणासारखे तप्त, तणावाखाली अनुभवलेली स्पर्धक. केवळ एक कथासंग्रह नावावर. पण कादंबरीत बॉक्सिंगची लय आणि तालबद्धता तिने चपखल पकडून दाखविली. भविष्यात जेव्हा मानव नवीन ग्रहावर वस्ती करेल, तेव्हा तेथेही नवीन संघर्ष करू शकेल, असे भाकीत करीत कादंबरी संपत असली तरी ती वाचकाच्या मनात, डोक्यात बराच काळ रेंगाळत राहू शकेल.

‘हेडशॉट’ : रिटा बुलविंकल

प्रकाशक : व्हायकिंग प्रेस

पृष्ठे २०७, किंमत :,५०७

डॉ.अंजली पटवर्धन कुलकर्णी

anjali.ptwrdhn@gmail.com

Story img Loader