-डॉ. सुलभा कुलकर्णी

डॉ. रोहिणी गोडबोले केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांत गणना होणाऱ्याा भौतिकशास्त्रज्ञ होत्या. त्यांची कीर्ती केवळ त्यांच्या मूलकणांवरील संशोधनापुरती मर्यादित नव्हती, तर स्त्री शिक्षणासाठी कळकळीने काम करण्यातही त्या आघाडीवर होत्या. रोहिणी गोडबोले यांचं पुण्याच्या हुजूरपागा शाळेत मराठी माध्यामातून शिक्षण झालं. गोडबोले कुटुंब शिक्षणप्रेमी. लहानपणी आईने त्यांना संस्कृतचे धडे दिले. त्यावेळी त्यांना संस्कृत पंडिता व्हावंसं वाटू लागलं. परंतु पुढे ‘सृष्टिज्ञान’ सारख्या नियतकालिकाची ओळख झाल्यावर त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यातच त्यांनी यशाचा मोठा पल्ला गाठला.

Redevelopment of government leased building with express intention of catering to builder lobby by MLA
मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
established political parties have continued with the agenda of ousting Ambedkarist politicians from electoral politics
आंबेडकरवादी राजकारणाला प्रस्थापितांचा ‘खो’!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
ulta chashma manoj jarange patil
उलटा चष्मा: २४ तासांत ८००!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

रोहिणीताईंची शैक्षणिक कारकीर्दही उल्लेखनीय अशीच होती. एस. एस. सी. बोर्डाच्या परीक्षेत त्या अव्वल आल्या होत्या. मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी नॅशनल सायन्स टॅलण्टची परीक्षा दिली आणि त्यात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून बी. एस्सी. झाल्यावर आय. आय. टी. मुंबईमधून एम.एस्सी. केल्यावर त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पी. एचडी. करण्याचा निश्चय केला. त्यांनी स्टोनी ब्रूक येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे प्रवेश घेतला. तिथे त्यांना सैद्धान्तिक कण भौतिकी या आवडत्या विषयात संशोधन करण्याची सुवर्ण संधी मिळाल्यावर त्यांच्या प्रतिभेला एक वेगळीच झळाळी आली. लहानपणच्या इच्छेप्रमाणे त्या संस्कृत पंडिता झाल्या नाहीत तरी रोहिणी गोडबोले नावाची विदुषी शास्त्रज्ञ झाली!

आणखी वाचा-मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…

रोहिणी गोडबोले या काही काळ मुंबईच्या टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या इन्स्टिटयूटशी जोडल्या गेल्या, मात्र या संस्थेशी त्यांची नाळ कायमची जोडली गेली. पुढे मुंबई विद्यापीठात १९८२ ते १९९५ च्या दरम्यान त्यांची लेक्चरर आणि नंतर रीडर या पदांवर नियुक्ती झाली. त्या उत्तम वक्त्या होत्याच; पण त्या उत्तम शिक्षिकाही होत्या. मुंबई विद्यापीठातील नोकरीच्या दरम्यान त्यांनी यूरोपमधील सर्न (CERN ) येथे लार्ज हॅड्रॉन कोलाईडरला भेट दिली आणि तिथेच त्यांच्या संशोधनाचा नवा अध्याय सुरू झाला. तेथील संशोधनात त्यांनी मोलाची भर घातली आणि जागतिक स्तरावर त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची प्रशंसा झाली.

१९९५ साली रोहिणीताई बंगलोर येथील ख्यातमान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील सेंटर फॉर हाय एनर्जी, फिजिक्स विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून दाखल झाल्या. पुढे प्रोफेसर आणि विभाग प्रमुखही झाल्या. नंतर देशातील प्रतिष्ठीत अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही त्यांनी मोलाचं काम केलं.

मुलभूत कणांवरील संशोधनास केवळ मान्यताच नव्हे तर त्यांचे संशोधन सर्न येथील काही प्रयोगांस मार्गदर्शक ठरले. यामुळेच त्यांची २०१५ मध्ये सर्न-इंडियाच्या सल्लागार मंडळावर निवड झाली. त्यांच्या कामामुळेच त्या भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार मंडळाच्याही सभासद झाल्या होत्या.

आणखी वाचा-प्राधान्य हवे महिला-मुलांच्या सुरक्षिततेला…

त्यांच्या अनेक भाषणांमध्ये महत्त्वाचा मुद्दा असे तो विज्ञान क्षेत्रातील महिलांचा सहभाग व त्यांना समानतेची वागणूक मिळणे. कारण त्यांच्या मार्गातही त्यांनी अनेक अडथळ्यांची शर्यत पार केली होती. तेच अन्य महिला शास्त्रज्ञांच्या वाट्याला येऊ नये असे त्यांना वाटे. इंटरनेट आणि मोबाइल यांसारख्या सुविधा नसतानाच्या काळात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना एकट्या स्त्रीने विविध देशांत जाणे सोपे काम नव्हेत. अशाकाळात साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहिणीताईंनी कुठेही कसलीही सबब न सांगता पुरुषांच्या बरोबरीने किंवा अधिक चोखपणे आपली भूमिका बजावली. महिला शास्त्रज्ञांवरील पुस्तक असो किंवा त्यासंबंधीचा अहवाल असो अथवा चचासत्र असो रोहिणी गोडबोले यांचे नेतृत्व अपरिहार्य असच होते. त्या स्त्री शास्त्रज्ञांचा आवाज होत्या. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सी. एस. आय. आर. आणि इतर महत्त्वाच्या संस्थांत त्यांनी महिलांसाठी विशेष योजना आखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘विमेन सायंटिस्ट्स’ या योजनेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत.

आज वीस वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली ही योजना (आता त्याचे नाव ‘किरण’ असे आहे ) पीएच. डी. साठी आणि पीएच. डी. झाल्यावरही महिला शास्त्रज्ञांना शिष्यवृत्ती देते. अनेकदा नोकऱ्यांमध्येही महिला शास्त्रज्ञांना पात्रता असूनही डावलले जाते, तसे होऊ नये यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. स्त्रियांनाही याविषयी जागरूक करणे आणि उच्च पदावरील अधिकाऱ्यांना स्त्रियांच्या हक्काविषयी विचार करण्यास भाग पाडणे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

रोहिणी गोडबोले यांनी या विषयाला वाचा फोडली तेव्हा फार मोठा बदल घडून आला. आपल्या देशात अगदी १९८० – ९० पर्यंत महिला शास्त्रज्ञांचे प्रमाण अत्यल्प होते. विद्यापीठांत किंवा राष्ट्रीय प्रयोगशाळांत महिला फारशा दिसायच्या नाहीत. साध्या प्रसाधनगृहाच्या सुविधाही उपलब्ध नसल्याने त्या नोकरी करण्यास इच्छुक नसत. रोहिणी गोडबोले यांनी या विषयावर आणि अन्य अडचणींच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. आणि या परिस्थितीत बदल घडला.

आणखी वाचा-महाराष्ट्रातील बेकारी आणि रोजगार व्हाउचर

२००८ साली प्रो. राम रामस्वामी यांच्या समवेत ‘लिलावतीज डॉटर्स’ नावचे पुस्तक संपादित केले. इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्स, बंगलोरने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सुमारे ८० महिला शास्त्रज्ञांनी त्या ‘शास्त्रज्ञ का आणि कशा झाल्या’ यावर अतिशय दिलखुलासपणे लिहिले आहे. त्याची २००८ साली तिसरी आवृत्तीही रोहिणी गोडबोले आणि राम रामस्वामी यांच्या अथक प्रयत्नामुळे साकार झाली. यात आता सुमारे १०० महिला शास्त्रज्ञांच्या विज्ञान वाटचालीचे दर्शन घडते. देशात आणि परदेशांतही या पुस्तकाचे स्वागत झाले. ‘लिलावतीज डॉटर्स’ आणि ‘गर्ल’स गाईड टू लाईफ इन सायन्स’ ही पुस्तके शालेय आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत आहेत.

रोहिणी गोडबोले पाहता पाहता भारतातील तीनही सायन्स अकॅडमीच्या फेलो झाल्या. तसेच थर्ड वर्ल्ड अकॅडेमी (TWAS ) च्याही फेलो झाल्या. त्यांच्या कामाची दखल घेऊन २०१९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री या उच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून फ्रेंच सरकारने त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ ने सन्मानित करण्यात आले.

त्या शेवटपर्यंत मूलभूतकाणांवरील संशोधन, महिला शास्त्रज्ञांसंबांधित पुस्तक प्रकाशनाच्या कामात व्यग्र राहिल्या! ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ हे रोहिणीताईंच्या बाबतीत अगदी सत्य आहे.

skknano@gmail.com

Story img Loader