डॉ. आनंद वाडदेकर
मी माझ्या फोनमधील अॅप्स अपडेट करीत होतो आणि मला त्यामधून फोन आणि ‘करिअर’ यांच्यामधील समानता दिसू लागली. मला नेमके काय उमगले, हे मी ‘विचारमंच’च्या माध्यमातून सांगू इच्छितो…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजकाल सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहेत. पण हा विचार कधी आपल्या मनाला शिवला आहे का, की वायरलेस फोनमध्ये ‘स्मार्ट फोन’ अशी वेगळी श्रेणी का आहे? माझ्या विचारानुसार ‘स्मार्ट’ म्हणजे तयार आणि सध्याच्या तसेच भविष्यासाठी बनविलेला; ‘स्मार्ट’ म्हणजे नवीन धाटणी आणि तंत्रज्ञानाचा; ‘स्मार्ट’ म्हणजे केवळ पूर्वी सारखा केवळ कॉल करणे आणि टेक्स्ट मेसेज पाठविण्यासाठी नसलेला- त्याऐवजी कित्येक अन्य कामेही करणारा.
मी या लेखाद्वारे रोजच्या जीवनात तुमच्या स्मार्ट फोनमध्ये काय काय होते त्याचा आणि करिअरचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला आहे.
फोनमधील ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे मूलभूत शैक्षणिक पात्रतेसारखीच आहे :
अँड्रॉईड, विंडोज, सिम्बियन इत्यादी. विविध ऑपरेटिंग सिस्टिम्सवर आजकालचे स्मार्ट फोन चालतात. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिम गती, प्रक्रिया इत्यादीच्या बाबतीत इतर ऑपरेटिंग सिस्टिम्सपेक्षा वेगळी आहे. ऑपरेटिंग
सिस्टिमशिवाय, कोणताही स्मार्ट फोन काम करू शकणार नाही.
हेही वाचा: रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
थोडक्यात असे मानूया की, फोनमधील ऑपरेटिंग सिस्टिमचे साधर्म्य, उमेदवाराच्या मूलभूत शैक्षणिक अर्हतेशी आहे. योग्य शैक्षणिक पात्रतेच्या पायाशिवाय उमेदवार त्याच्या/तिच्या मूलभूत कौशल्यांचा वापर करू शकत नाही. योग्य शिक्षणाशिवाय, तो/ती एखाद्या विशिष्ट कार्यासाठी ‘कुशल’ किंवा ‘पात्र’ ठरू शकत नाही.
म्हणजेच, जसे फोनसाठी सुयोग्य आणि भक्कम ऑपरेटिंग सिस्टिम निवडणे आवश्यक असते तसेच यशस्वी करिअरसाठी योग्य शैक्षणिक पात्रता मिळवणे आवश्यक असते.
या ऑपरेटिंग सिस्टिमच्या आधारे विविध अॅप डाऊनलोड करणे हे शैक्षणिक पात्रतेनंतर माहिती, ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासारखे आहे.
स्मार्ट फोन हा सर्वोत्कृष्ट स्मार्ट फोन तेव्हाच ठरतो जेव्हा त्यात आवश्यक आणि उपयोगी अॅप्स लोड केलेली असतात. अॅप्स नसतील तर स्मार्ट फोन हा जुन्या फोनप्रमाणे केवळ कॉल करणे आणि टेक्स्ट मेसेज पाठविणे इतकेच काम करू शकतो.
आपल्याला महत्त्वाची वाटणारी, रोजच्या कामासाठी आणि काही मनोरंजनासाठी अशी अॅप्स आपण डाऊनलोड करण्यात वेळ खर्च करतो. बाजारामध्ये हजारो ॲप्स उपलब्ध आहेत, त्यातून आपण आपल्यासाठी काही निवडतो, ती सगळी आपल्या उपयोगाची नसतात किंवा आवश्यकही नसतात. पण मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे नक्की घडले आहे की, काही दिवसांनंतर किंवा आठवड्यांनंतर किंवा महिन्यांनंतर आपल्याला असे वाटते की डाऊनलोड केलेल्या अॅप्स् पैकी काही अॅप्स् ही तशीच पडून आहेत, आपल्या फोनच्या मेमरीची जागा अडवून बसली आहेत, ती आपण ‘अनइन्स्टॉल’ करतो.
उमेदवाराकडे असलेली माहिती, ज्ञान आणि कौशल्य याचा संदर्भ आपण डाऊनलोड केलेल्या अॅपशी जोडूया. अॅप्सनी सुसज्ज असलेला स्मार्ट फोन हा एक चांगला स्मार्ट फोन ठरतो कारण तो आपल्या अपेक्षेप्रमाणे उपयोगी पडतो. हे डाऊनलोड करणे अतिशय महत्त्वाचे ठरते कारण त्यामुळे आपल्या स्मार्ट फोनची उपयुक्तता वाढते.
हेही वाचा: विदर्भाची सांस्कृतिक मुद्रा
आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा आपण माहिती, ज्ञान आणि कौशल्य डाऊनलोड करीत असतो. या डाऊनलोडमुळे आपला लेखी आणि प्रात्यक्षिक शिक्षणाचा पाया भक्कम होत असतो आणि आपले करिअर सुधारत जाते.
कौशल्ये शिकणे – शिकलेले विसरणे हे अॅप्स अॅड / डिलीट करण्यासारखे आहे.
मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा भरपूर अॅप्स डाऊनलोड केली असतील आणि हळूहळू त्यातील काही, नेहमी वापरली जात नाहीत, आवश्यक नाहीत, यापेक्षा चांगली अॅप्स उपलब्ध झाली आहेत, काही अॅप्स फोनचा वेग कमी करतात अशा विविध कारणांसाठी नंतर डिलीट केली असतील.
आपण शिक्षण घेत प्रगती करतो तेव्हा अशा एका टप्प्यावर पोहोचतो की आपण विशिष्ट क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्याचे ठरवितो, तेव्हा लक्षात येते की आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातील काही शिक्षणाचा आपल्याला पुढील शिक्षणासाठी उपयोग नाही, मग ती माहिती, ज्ञान आणि कौशल्य अनइन्स्टॉल कराण्याची गरज आपल्याला वाटू लागते जे आता उपयोगी पडणार नाहीये… यालाच शिकलेले विसरणे म्हणतात जे अॅप्स डिलीट करण्यासारखेच आहे. असे देखील होते की आजपर्यंत आपण जे शिकलो नाही ते शिकण्याची गरज निर्माण होऊ शकते यालाच शिकणे म्हणजे अॅप्स अॅड करणे म्हणू. हे अॅप्स अॅड करणे आणि डिलीट करणे सतत चालूच असते आणि यामुळेच फोन ‘स्मार्ट’ राहातो.
ज्यांना स्मार्ट राहाण्यासाठी, शिकायचे कधी आणि शिकलेले विसरायचे कधी हे समजते तेच करिअरमध्ये यशस्वी होतात. डाउनलोड केलेल्या सर्वच गोष्टी कायमच्या उपयोगी असत नाहीत.
स्मार्टफोनमध्ये अनावश्यक अॅप्स डाऊनलोड केलेली असतील तर स्मार्टफोन मंद गतीने काम करतो अथवा काही वेळा प्रतिसाद देत नाही (हँग) होतो, किंवा मंद गतीने काम करू लागल्याने त्याची स्मार्टफोन ही पत कमी होते कारण पूर्वी कमी अॅप असताना तो ज्या वेगाने काम करीत असे ते आता करू शकत नाही, असाही अनुभव येतो.
मी असे म्हणेन की विद्यार्थ्यांनी / उमेदवारांनी अनावश्यक शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य मिळविल्यास त्यांचे स्मार्ट कमी होते. अनावश्यक उच्च शिक्षण आणि अनावश्यक कौशल्यसंपन्न विद्यार्थी आणि उमेदवार हे नाकारले जातात.
हेही वाचा: कौतुक कमला हॅरिसचं आणि..
फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमला अनुकूल अशीच अॅप असणे महत्त्वाचे आहे.
कौशल्य सुधारणे हे अॅप्स अपडेट करीत राहाण्यासारखे आहे. मी म्हणेन की, अॅपच्या जुन्या आवृत्त्यांवर काम करणारा फोन हा स्मार्टफोन राहात नाही. अॅप्स अपडेट केल्याने काम कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत होऊ शकते.
तुम्ही जर एखाद्या विशिष्ट अॅपसाठी असलेल्या अपडेटचे विवरण वाचलेत तर असे लक्षात येईल की, त्रूटी दूर करणे, कामगिरी उंचावणे आणि नवीन वैशिष्ट्ये तसेच साहाय्य प्रदान करणे यासाठीच ते अपडेट असतात.
मी म्हणेन की तुमची माहिती, ज्ञान आणि कौशल्य सुधारणे, वाढवणे हे स्मार्टफोनचे अॅप अपडेट करण्यासारखे आहे. काही वर्षांनंतर व्यवसायाची गती आणि पर्यावरण बदलते, माहिती आणि कौशल्य ही काही वर्षानंतर अप्रचलित होतात त्यामुळे त्यामध्ये सतत सुधारणा करणे, अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. ही कधीही न संपणारी आणि सतत चालू राहाणारी प्रक्रिया आहे.
सध्याच्या गतिमान जगामध्ये संबंधित माहिती, ज्ञान आणि कौशल्ये सतत वाढवित राहाणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तसे केले नाहीत तर, उद्योग तुम्हाला नाकारतो आणि तुम्ही निरुपयोगी ठरता.
हेही वाचा: संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
आजकाल, विद्यार्थी आणि उमेदवारांना त्यांच्या कौशल्याबद्दल आणि ज्ञानाबद्दल फार सावध असण्याची आवश्यकता आहे आणि ते उद्योगाशी पुरक आहे याची खात्री करणे गरजेचे आहे. जर तसे असेल तर ते चांगले आणि स्मार्ट पध्दतीने काम करू शकतात.
मी म्हणेन की कोणताही उमेदवार / विद्यार्थी हा सेल फोनप्रमाणे आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेची ऑपरेटिंग सिस्टिम आहे आणि माहिती, कौशल्ये आणि ज्ञानाच्या स्वरूपात उपयुक्त आणि पूरक अॅप्सने तो चांगला सुसज्ज आहे आणि स्वतःला ‘स्मार्ट’ राहण्यासाठी तो / ती नेहमीच अद्ययावत ठेवतो / ठेवते.
लेखक पुणेस्थित ई लर्निंग व शिक्षणतज्ज्ञ आहेत.
anandwadadekar@gmail.com