प्रा.डॉ.अजय देशपांडे

ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात शिमग्याच्या बोंबा सुरू आहेत. दसरा मेळाव्याच्या मैदानाचा वाद असो की अंधेरीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या महानगरपालिकेतील नोकरीच्या राजीनाम्याचा प्रश्न असो दोन्ही प्रकरणांत राज्यातील सरकारला न्यायालयाने फटकारले. ऐनवेळी उमेदवारी मागे घेऊन ‘बूंद से गयी वो… ’ सावरण्याचा प्रयत्न केला गेला पण राजकारणात वेळ आणि संधी यांचा योग्य वापर केला तरच प्रतिष्ठा आणि लोकमान्यता कायम राहते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यात जमा होणे आणि गरिबांना दिवाळीच्या तोंडावर अत्यल्प दरात आनंद शिधा मिळणे हे निर्णय जरा दिलासा देणारे होते पण शेवटी अंमलबजावणी अत्यंत निरपेक्षपणे काटेकोरपणे करणेही आवश्यक असते. अंमलबजाणीतील त्रुटीने हे निर्णय टीकांच्या भोवऱ्यात सापडले.जनतेच्या अपेक्षा वाढवणारी आश्वासने आणि निर्णय नेहमीच काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजनाअभावी जनतेचा अपेक्षाभंग करणारे ठरतात.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

नुकत्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले हे खरे आहे. सुमारे चाळीस आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेल्या राजकीय गटाला म्हणावे तसे यश काबीज करता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.उलट सर्व राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा विरोधात असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोटावर मोजता येतील इतक्या आमदार खासदारांसह या निवडणुकीत लक्षणीय यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवून पुन्हा एकदा राज्यात आपला प्रभाव कायम आहे हे दाखवून दिले आहे. तर काँग्रेसने देखील आपले अस्तित्व अजूनही कायम आहे आणि सत्तेची समिकरणे जुळवून घेण्यासाठी अथवा बिघडवण्यासाठी काँग्रेसचा हात सोडून चालणार नाही हे व्यवस्थितपणे दाखवून दिले आहे.एकूणच काय तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या चाळीस आमदारांच्या राजकीय लोकप्रियतेचा प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीत जेमतेम दिसला. पण या निकालाने महाविकास आघाडीचा पर्याय देखील सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांची लक्षणीय संख्या सर्वच राजकीय पक्षांच्या नजरेत भरणारी आहे. अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने दोन शकले झाली नसती तर शिवसेनेने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले असते असेही एक मत आता व्यक्त केले जात आहे. राजकारणामध्ये वेळ आणि संधी यांचा उपयोग करून घेतला तरच यश मिळत असते.पण योग्य वेळ, उत्तम संधी आणि सत्ता असतानाही अनेकांना संधीचे सोने करता येत नाही. दसरा मेळाव्याच्या मैदानाचा वाद आणि प्रत्यक्ष मेळाव्यातील भाषणे , अंधेरीच्या निवडणुकीतील उमेदवारीचे तथ्यहीन नाट्य आणि ग्रामपंचायत निवडणुक निकाल या तीन मुख्य घटनांचा वेध घेतला असता वजाबाकीच्या दिशेने जाणाऱ्या राजकारण्यांची ओळख न होण्याएवढी खुळी जनता महाराष्ट्रात नाही हे राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे. लोकमान्यता घोषणाबाजीने नव्हे कृतिशीलतेने मिळत असते.

हेही वाचा… चीनच्याच नजरेतून चीनकडे पाहिले तर काय दिसेल?

आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे पावसाने हाहाकार माजवल्यानंतर पुरते मोडले. राज्य आणि केंद्र सरकार मदतीचा हात पुढे करते पण विस्कटलेली घडी सावरण्याआधीच अस्मानी संकट पुन्हा उभे राहते.मागच्या सरकारवर वाट्टेल तशी टीका करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता जनकल्याणाची तळमळ कृतीतून दाखवून देण्याची गरज आहे. वातानुकूलित गाड्यांमध्ये, खासगी विमानांमध्ये फिरणाऱ्या आणि अत्यंत महागड्या हॉटेलांमध्ये राहणाऱ्या , रेटून खोटे बोलणाऱ्या राजकारण्यांच्या बेगडी तत्त्वांच्या, नीतिमत्तेच्या बोलघेवडेपणाला महागाईने त्रस्त झालेला सामान्य माणूस कंटाळणारच. नागरिक म्हणून सन्मानाने वागणूक , मूलभूत सुविधांसह हाताला काम , पोटाला रोटी आणि लोकशाहीतील निर्भयपणे जगणे एवढीच अपेक्षा असणारा सामान्य माणसाला आता तथ्यहीन राजकारणाचा उबग आला आहे. बासष्ट वर्षांच्या या राज्यात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, रस्ते ,पूल नाहीत, अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागते, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही जीवघेणी कसरत करावी लागते , दवाखाने नसल्याने रुग्णांना घेऊन बरीच पायपीट करावी लागते या आणि अशा अनेक समस्या आजही आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आश्वासनांची आतषबाजी न करता तात्काळ कृतीची गरज आहे.

हेही वाचा… संसाधने आहेत, तरीही..

हे राज्य यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदर्शी लोकप्रतिनिधींचे आहे. सभागृहात आणि जाहीर सभासंमेलनांमध्येही विरोधी पक्षनेत्यासह विरोधकांचा सन्मान करण्याची परंपरा या राज्यात आहे. विरोधासाठी विरोध करत जनतेच्या समस्यांचेही तथ्यहीन राजकारण करण्याचा रडीचा डाव महाराष्ट्राला मंजूर नाही. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते , ‘सामाजिक कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा आपला सर्वोच्च आदर्श आहे.’ या आदर्शापासून बासष्ट वर्षांच्या या राज्याचे राजकारण आज बरेच दूर गेले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… ऋषी सुनक आशेचा किरण ठरतील?

दुःखाचा अंधार केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यांनी दूर होत नसतो.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना, दमनकारी यंत्रणांच्या दहशतीच्या छायेखाली जगताना , समाजमाध्यमांवर तद्दन खोट्या माहितीचा हाहाकार माजला असताना , विकासापेक्षा कुरघोड्या आणि कोलांट्याउड्याना राजकारणात जास्त प्रतिष्ठा मिळत असताना पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शब्द कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.पंडित नेहरू म्हणाले होते , “जगातील साऱ्या जनसमूहांना जीवनाचा अधिकार, आपली प्रगती साधण्याचा अधिकार आणि आपले भवितव्य घडविण्याचा अधिकार आहे. शांततेचा आणि सुरक्षिततेचाही त्यांना अधिकार आहे. आपल्या ह्या अधिकारांचे रक्षण, आपले प्रश्न शांततामय मार्गांनी सोडवून आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदूनच ते आता पूर्ण करू शकतात. तत्त्वे, श्रद्धा आणि विचारप्रणाली यांच्या बाबतीत त्यांच्यात भिन्नता आहे. एकमेकांना ते जबरदस्तीने किंवा भीती दाखवून आपल्या बाजूला वळवू शकत नाहीत. तसे त्यांनी केल्यास मोठाच अनर्थ कोसळेल. शांततामय सहअस्तित्वाचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे, मतभिन्नता असूनही एकत्र राहणे आणि विद्वेष व हिंसाचाराचे धोरण टाकून देणे.”

आजच्या राजकारण्यांसह सर्वांनीच पंडित नेहरूंचे हे शब्द समजून घेतले पाहिजेत. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून जनतेचे अश्रू पुसण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांनी पुढे येण्याची गरज आहे.पण सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशी वैचारिक प्रगल्भता दाखविणे शक्य आहे असे वाटत नाही.

लेखक समीक्षक, संपादक व राजकीय विश्लेषक आहेत.

deshpandeajay15@gmail.com