कंगना रणौत यांचा उल्लेख आता एकेरीत करून चालणार नाही. त्या हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार झाल्या आहेत. अभिनेते-राजकारणी दोन प्रकारचे असतात. एक प्रकार म्हणजे केवळ वाठवलेल्या भूमिकांमुळे निर्माण झालेल्या प्रतिमेच्या जोरावर निवडून आलेले वा नामनिर्देशित म्हणून सभागृहाची शोभा वाढवणारे. आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकांच्या रणांगणात उतरून कर्तृत्त्व गाजवलेले, आपल्या पक्षाचं, राज्याचं समर्थपणे नेतृत्व करणारे. रणौत मॅडम यातल्या कोणत्या वर्गात बसतील हे यथावकाश स्पष्ट होईलच. पण सध्या तरी त्यांचे पाळण्यातले पाय फारसे आश्वासक दिसत नाहीत. अन्यथा राजकीय कारकिर्दीला अवघे तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या वक्त्याव्यांची जबाबदारी झटकण्याची वेळ त्यांनी त्यांच्या पक्षावर आणली नसती.

या मॅडमचा बॉक्स ऑफिसवर गाजलेला, लोकप्रिय ठरलेला शेवटचा चित्रपट कोणता? २०१३च्या क्वीननंतरचा एकतरी मोठा चित्रपट आठवतो का? त्यानंतर त्या केवळ ‘काँट्रोव्हर्सी क्वीन’च ठरताना दिसल्या. सदैव ‘स्वयंघोषित क्रांतिकारक’ या भूमिकेत रमू लागल्या. सुरुवातीला बॉलिवुडमधल्या परिवारवादाविरोधात ठाम भूमिका घेणारी धाडसी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणौतबाई हळूहळू अहंकारी आणि वाचाळ म्हणून ट्रोल होई लागल्या. तपासी पन्नूला स्वतःची सस्ती कॉपी तर स्वरा भास्करला बी ग्रेड ॲक्ट्रेस म्हणून हिणवू लागल्या. दीपिका पदुकोणच्या मानसिक आजाराची खिल्ली उडविली. त्यांनी सनी लिओनीला ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला पण २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाल्या. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशंतच्या कुटुंबियांपेक्षा कंगनाच अधिक आरोपांच्या फैरी झाडत होत्या. त्या कोणत्या दिशेने जात आहेत हे हळूहळू स्पष्ट होऊ लागलं होतं.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Loksatta anvyarth The petition filed by Karnataka Chief Minister Siddaramaiah was dismissed by the Karnataka High Court
अन्वयार्थ: भूखंड घोटाळ्याची तऱ्हा
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Haryana BJP President Mohan Lal Badoli and Mandi MP Kangana Ranaut
Kangana Ranuat : “कंगना रणौत बरळत असतात, पक्षाची भूमिका…”, कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपा नेत्यांनीच टोचले कान!
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Bhushan Gagranis order to the officials to make no mistakes in the work of the upcoming assembly elections
आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामात कसूर नको, भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

आणखी वाचा-सरकारवर टीका म्हणजे नक्षलवाद नव्हे!

पुढे कोविडकाळत हिमाचल प्रदेशात असताना त्यांनी ट्विट केलं की, ‘आता मला मूव्ही मफियांपेक्षाही महाराष्ट्र पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे मला हिमाचल सरकारने किंवा केंद्राने झेड दर्जाचं संरक्षण द्यावं.’ त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं, ‘त्यांना एवढी भीती वाटते तर त्यांनी मुंबईत येऊच नये.’ त्यामुळे चिडलेल्या रणौत मॅडम मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करून मोळक्या झाल्या. लगोलग त्यांना झेड संरक्षण देण्यात आलं. मागेपुढे सुरक्षारक्षक आणि मधोमध ऐटीत चालणाऱ्या मॅडम अशी दृश्य त्या काळात वारंवार टीव्ही व समाजमाध्यमांवर दिसत. त्यांनी हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.

२०२१ मध्ये तर त्यांनी कहरच केला. पश्चिम बंगालच्या बिरभूममध्ये झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देत त्यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी, ‘गुंडगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुपर गुंडगिरीची गरज आहे. मोदीजी तुमचं २००० सालच विराट रूप पुन्हा दाखवा,’ असं ट्विट केलं. २००० साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथे काय घडलं होतं हे देश विसरलेला नाही. हे ट्विट हिंसाचाराचं खुलं आवाहन होतं. त्यावर टीकेची झोड उठली आणि कंगना मॅडमचं ट्विटर खातं तब्बल दोन वर्ष सस्पेंड करण्यात आलं.

कंगना रणौत यांच्या अशा महान विचारांची दाखल घेत मोदी सरकारने २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. त्यानंतर काही दिवसांतच या मॅडमनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्या म्हणाल्या की, ‘भारताला १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ती केवळ भीक होती. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच मिळालं.’ यावर विरोधक आणि सामान्य नागरिकांतही संतापाची लाट उठली. कंगना यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी होऊ लागली. मात्र त्यावरही कंगना यांनी १९४७ ला कुठे कोणतं युद्ध झालं होतं, असा सवाल केला. ज्या शांततापूर्ण लढ्याचा संपूर्ण जगात दाखला दिला जातो त्याचं महत्त्व या मॅडमनी शून्यावर आणलं.

आणखी वाचा-अमेरिकेतील निवडणूक कोण जिंकणार?

२४ मार्च २०२४ रोजी कंगना यांचं नाव मंडी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. कंगना यांच्या तोवरच्या दमदार कामगिरीकडे पाहूनच पक्षाने हा निर्णय घेतला असणार. कोणा ऐऱ्यागैऱ्या व्यक्तीला तिकीट देऊन टाकलं असं तर त्या पक्षात होत नाही. बरीच सर्वेक्षणं वगैरे होतात म्हणे. कंगना यांच्या बाबतीतसुद्धा ती झाली असतीलच. तिकीट मिळाल्यापासून तर मॅडमचं वैचारिक वैभव अधिकच अधोरेखित होऊ लागलं.

७ एप्रिलल टाइम्स नऊच्या मुलाखतीत कंगना म्हणाल्या की देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे पाहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे होते? त्यांना कुठे गायब केलं होतं? समजमध्यामांना पुन्हा एक निमित्त मिळालं. अख्खा देश या उमेदवार मॅडमची खिल्ली उडवत असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा कंगना यांच्या पाठीशी उभे राहिले. सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी मात्र कंगना यांना ‘आपल्या स्वर्थसाठी इतिहासाचा खेळ करू नका,’ असा इशारा दिला. समजमध्यामावरच्या या पोस्टमध्ये त्यांनी मोदी, शहा, नड्डा यांनाही टॅग केलं होतं. तरीही भाजपच्या बड्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या या उमेदवाराला वेसण घालण्याचे प्रयत्न केले नाहीत. पक्षाला आपल्याकडून हीच अपेक्षा आहे असं कंगना मॅडमना वाटलं असेल तर त्यांची काय चूक आहे?

मॅडमचा प्रचार जोरात सुरू होता. आणि त्यादरम्यान ४ मे २०२४ रोजी त्यांनी समाजमाध्यमांना आणखी एक खुराक मिळवून दिला. एका प्रचारसभेत रानौत नेहमीप्रमाणे विरोधकांवर तोंडसुख घेत होत्या आणि त्या भरात त्यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्याबरोबर आपल्याच पक्षाचे बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनाही लक्ष्य केलं. ते कसे गुंडगिरी करतात, मासे खातात वगैरे म्हणत त्यांचा चांगला समाचार घेतला. त्यांचं हे विधान ऐकून भाजप नेत्यांवर नक्कीच कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली असणार. खरंतर यात मॅडमची फार काही चूक नव्हती. बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर मोदींनी काही दिवसांपूर्वीच श्रावणात मासे खाण्यावरून टीका केली होती. रणौत मॅडमनी केवळ त्यांची री ओढली. नामसाधर्म्य असल्यामुळे ‘थोडासा घोळ’ झाला एवढंच. पण गंमत अशी की याच मॅडमनी मे २०१९मध्ये ‘बीफ म्हणजेच गोमांस खाण्याचा धर्माशी काही संबंध नाही. मी आठ वर्षांपूर्वी शाकाहाराचा स्वीकार केला पण माझे भाऊ आजही मांस खातात. मांस खाल्ले म्हणून ते माझ्यापेक्षा दुय्यम दर्जाचे हिंदू होत नाहीत.’ असं ट्विट केलं होतं.

आणखी वाचा-‘खूप खर्च, खूप लोक, खूप आनंद…’ हे उत्सवी समीकरण चुकतंय…

कंगना मंडीतून निवडून आल्या आणि लगेचच ६ जून रोजी चंदीगड विमानतळावर बीएसएफच्या एका महिला जवानाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. त्या महिलेच्या रोषाला कारणीभूत ठरलं होतं रानौत मॅडमचं २०२० मधलं एक ट्विट. तेव्हा शेतकरी आंदोलन ऐन भरात होतं आणि या मॅडमने ट्विट केलं की शेतकरी आंदोलनातल्या महिला १०० रुपये देऊन आणल्या गेल्या आहेत. त्या महिला जवान कॅमेरासमोर सांगताना दिसतात की, ‘या होत्या का तिथे? माझी आई त्यावेळी आंदोलन करत होती.’ हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. पण त्यावेळी रणौत यांनी पूर्वी जिला बी ग्रेड स्टार म्हटलं होतं त्या स्वरा भास्करने, कंगना यांनी समजमध्यामी पोस्टमधून हिंसाचाराचं आवाहन केल्याची आणि देशात झुंडबळी घेतले जात असल्याची आठवण करून दिली होती.

अनेक भाजप नेत्यांप्रमाणे कंगना मॅडमनाही राहुल गांधी अतिशय प्रिय आहेत. त्यांच्याविषयी कंगना म्हणाल्या होत्या की ते एका महत्त्वाकांक्षी आईचे बळी आहेत. राहुल आणि प्रियंका कदाचित राजकारणा व्यतिरिक्त अन्य एखाद्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकले असते, पण त्यांच्या आईच्या हट्टामुळे त्यांना वेगळं काही करता आलं नाही. राहुल यांचं लग्नही होऊ शकलं नाही, त्यांना कोणत्याच क्षेत्रात यश मिळालं नाही वगैरे…

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचं नाव न घेता, पण त्यांनाच उद्देशून असल्याचं पुरेसं स्पष्ट होईल अशा रीतीने म्हटलं की, यांना जात न विचारता जतीआधरित जनगणना करायची आहे. त्यानंतर काही दिवसांनी कंगना यांनी राहुल गांधींचा एक एडिट केलेला फोटो ट्विट केला. त्यात त्यांच्या डोक्यावर मुस्लीम समुदाय वापरतो तो टोपी, कपाळी तिलक आणि गळ्यात क्रॉस दाखवण्यात आला होता. राहुल संसदेत काहीही बोलत असतात. ते अंमली पदार्थाचं सेवन करून येतात की मद्यपान करून येतात हे तपासलं जावं, वगैरे मागण्याही मॅडमनी केल्या.

आणखी वाचा-गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?

आता हरियाणा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच मॅडमने शेतकरी आंदोलनामुळे भारतात बंगलादेशसदृश स्थिती निर्माण होऊ शकली असती. तिथे बलात्कार आणि खून होत होते, वगैरे ट्विट करून भाजपविषयी आधीच असंतुष्ट असलेल्या तिथल्या शेतकऱ्यांच्या रोषात आणखी भर घातली. त्यांच्या वक्तव्याशी पक्षाच्या ध्येय धोरणांचा काहीही संबंध नाही. पक्ष शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी कंगना या अधिकृत व्यक्ती नाहीत, अशी सारवासारव करण्याची वेळ आता भाजपवर आली आहे.

खासदारकीला तीन महिने पूर्ण होण्याआधीच रणौत मॅडम पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागल्याचं यातून स्पष्ट दिसतं. प्रत्येक पक्षाला असे वाचाळवीर बाळगावे लागतात. पक्ष अधिकृतरित्या जी भूमिका घेऊ शकत नाही, ती आडमार्गाने मांडण्यासाठी त्यांची गरज भासते. पण हे सारं आगीशी खेळण्यासारखं असतं. एरवी मनोरंजक वाटणारी, प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी ती आग कधी आपलाच तंबू भस्मसात करेल हे सांगता येत नाही. भाजपने असे अनेक चटके सहन केले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत संविधनविषयक एका वक्तव्याने विरोधकांना किती भक्कम मुद्दा मिळवून दिला हे सर्वांनी अनुभवलं आहे. आता यापुढे पक्ष कंगनाचा वाचाळपणा कसा हाताळतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

vijaya.jangle@expressindia.com