भाजपने ‘४०० पार’चा दावा केला होता. प्रत्यक्षात एनडीएला ३०० आणि भाजपला २५० जागांपर्यंतही पोहोचता आले नाही. हा भाजपचा राजकीय आणि मोदींचा वैयक्तिक पराभव आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात कमी मुक्त तसेच निष्पक्ष अशी लोकसभा निवडणूक होती. या निवडणुकीत सगळेच वातावरण विरोधी पक्षांच्या विरोधात उभे होते. पैसा, प्रसारमाध्यमे, प्रशासकीय यंत्रणा हे सगळे हातात असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे पारडे विरोधी पक्षांच्या तुलनेत चांगलेच जड होते.

Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
centre gives more power to jammu and kashmir lieutenant governor opposition criticise centre s decision
नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ; जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांचा केंद्राच्या निर्णयाला विरोध
Loksatta editorial uk elections kier starmer rishi sunak labour conservative party
अग्रलेख: मजुरोदय!
uk general election 2024 results key factors behind rishi sunak defeat
ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे पराभव; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पराभवात आरोग्यसेवा, निर्वासितांचा प्रश्न प्रमुख कारणे
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: धडा शिकण्याऐवजी ते निर्ढावले!
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
The israeli supreme court s historic verdict on hardline jews military service is compulsory
विश्लेषण: इस्रायल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेतान्याहूंची कोंडी? कट्टर ज्यूंनाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय का गाजतोय?
Naveen Patnaik Biju Janata Dal history of BJD backing for Modi govt in 10 years
‘आता पाठिंबा नाही’ म्हणणाऱ्या बिजू जनता दलाने गेल्या दशकभरात कशाप्रकारे निभावली आहे भाजपाशी दोस्ती?

चला, एका प्राथमिक फरकाने सुरुवात करू या. निवडणुकीनंतर कुणाकडे संख्याबळ आहे आणि कुणाकडे जनादेश आहे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुणाकडे किती जागा आहेत, कुणाकडे बहुमत आहे आणि त्यानुसार कोण सरकार बनवणार हे एक साधे अंकगणित आहे. एखाद्या पक्षाने किंवा आघाडीने मिळवलेल्या जागांची बेरीज विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी जमेत धरता येते का, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्याला सरकार स्थापन करण्याचा कायदेशीर अधिकार असतो का, यावरून संख्याबळाबाबत तर्क करता येतात.

जनादेशाबाबत सांगायचे तर त्यात आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्याबाबतच्या गुंतागुंतीचे विश्लेषण अपेक्षित असते. निवडणुकीत लोकांनी कोणाकडे कल दाखवला आहे, सरकारला जनादेश दिला आहे का या प्रश्नात त्याचे उत्तर मिळते. जागा आणि जनादेश या दोन्हींमध्ये असलेल्या फरकातून २०२४ च्या निकालांचे स्पष्टीकरण मिळते. ते असे की भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ आहे, पण त्यांच्याकडे जनादेश नाही.आजवरची उदाहरणे पाहता, राष्ट्रपतींनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायला हवे. एनडीएला नवीन लोकसभेत विश्वासमत जिंकून (खरेतर ती आता एक औपचारिकताच उरलेली आहे) पुढचे सरकार बनवण्यासाठी कोणताही घटनात्मक किंवा कायदेशीर अडथळा नाही.

जनादेशाचे तीन मापदंड

जनादेशाचा राजकीय अर्थ आपल्याला एका वेगळ्या निष्कर्षापर्यंत घेऊन जातो. जनादेशाचा अर्थ लावण्यासाठी एका अवघड प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. तो प्रश्न म्हणजे तिसऱ्यांदा भाजप सरकारचे नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला ६० कोटींहून अधिक मतदारांनी मान्यता दिली आहे का? या निवडणुकीत भाजपला जनादेश मिळाला की नाही हे मोजण्यासाठी येथे तीन सोपे मापदंड आहेत. एक म्हणजे, २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्या दोन निवडणुकांमधील कामगिरीच्या तुलनेत भाजपची या वेळची कामगिरी कशी झाली? दोन, भाजपने स्वत:च केलेले दावे आणि त्याच्या स्वत:च्या मोठमोठ्या अपेक्षा यांच्या आरशात भाजप स्वत: कसा दिसतो? तीन, एकूणच राजकीय संदर्भात या निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी दिसते?

नैतिक, राजकीय, वैयक्तिक पराभव

पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला जनादेश मिळाला आहे, हा जनादेशाचा दावा पुरेसा स्पष्ट नाही. मतदानाच्या शेवटच्या दिवशी याच वर्तमानपत्रामध्ये मी भाजपच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी खालील तीन निकष सुचवले होते: भाजपला ३०३ हून जास्त जागा मिळाल्या तर तर तो त्यांचा निर्विवाद विजय असला असता. ३०० पेक्षा एकही जागा कमी झाली असती तर तो त्यांचा नैतिक पराभव ठरला असता; २७२ पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर तो भाजपचा राजकीय पराभव ठरला असता आणि २५० च्या खाली जागा मिळणे हा मोदींचा वैयक्तिक पराभव ठरला असता. त्या सूचनेत काही योग्यता असेल तर, ज्यांच्या नावावर निवडणूक लढवली गेली, त्यांचा हा नैतिक, राजकीय आणि वैयक्तिक पराभव आहे. या निवडणुकीत भाजपने ६३ जागा गमावल्या आणि बहुमताच्या आकड्यापासून ते ३२ जागांनी मागे राहिले. त्यांच्या मतांच्या टक्केवारीतील घट मात्र अगदी नगण्य आहे. भाजपची मते ३७.४ टक्क्यांवरून ३६.६ टक्क्यांवर आली आहेत. परंतु भाजपच्या देशभर मिळालेल्या एकूण जागा आणि मते यांचे आकडे एकत्र केले की चित्र अधिक स्पष्ट होते. भाजपच्या देशभरातील जागा आणि मतांमध्ये घट झाली (अनुक्रमे ८३ जागा ३.६ टक्के मते) असली तरी केरळपासून ओडिशापर्यंतच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीच्या पट्ट्यात भाजपच्या जागा आणि मतांच्या टक्केवारीचे प्रमाण (२० जागा आणि ९.३ टक्के मते) वाढल्यामुळे ही घट थोडी तरी सुसह्य झाली आहे. पण म्हणून भाजप किंवा एनडीएचे समर्थन करणे हे १९८९ मधील अपमानास्पद पराभवानंतर काँग्रेसने जसा पराभव झाला असला तरी आपणच सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असल्याचा दावा केला होता, तसेच होईल.

भाजपने या निवडणुकीत ‘४०० पार’चा दावा केला होता. भाजपने स्वत:नेच केलेल्या या दाव्याच्या संदर्भात पाहिले तर सत्य अधिक कठोर दिसते. भाजपने स्वत:बद्दल केलेली ही भविष्यवाणीच त्या पक्षाची निवडणूक मोहीम तसेच भाजपधार्जिण्या वृत्तपत्रांचे मथळे, भाजपचे निष्ठावंत टीव्ही अँकर आणि एक्झिट पोलमध्ये भाजपला जादूई ४०१ जागा देणारे ओपिनियन पोल यांचा केंद्रबिंदू होती. मोदींच्या प्रचारामुळे भाजपच्या मतांमध्ये किती वाढ झाली (राष्ट्रीय पातळीवर किमान दोन ते तीन टक्के असा माझा अंदाज आहे) हे आपल्याला कधीच कळणार नाही. पण आपल्याला हे माहीत आहे की असे असूनही एनडीए ३०० पार करू शकला नाही. त्यामुळे भाजपने मागितलेला आणि त्यांना अपेक्षित असलेला जनादेश त्यांना मिळाला नाही, असे म्हणणे रास्त आहे.

विरोधकांसाठी प्रतिकूल वातावरण

हे दोन निकष असे गृहीत धरतात की २०२४ ही एक नेहमीसारखीच निवडणूक होती. तिथे दोन वेळा सत्ताधारी असलेला पक्ष तिसऱ्यांदा आपल्यालाच सत्ता मिळावी यासाठी सगळे नियम पाळून, विरोधकांना बरोबरीचे मानत, तशी वागणूक देत तिसऱ्या वेळेसाठी आपले नशीब अजमावत होता. पण सगळ्यांनाच माहीत आहे की तशी परिस्थिती नव्हती.

या निवडणुकीत वातावरण विरोधी पक्षांना जराही अनुकूल नव्हते. निवडणूक आयोग उघड उघड पक्षपाती होता. आणि तरीही जनतेने सत्ताधाऱ्यांना जोरदार दणका दिला. हे १९७७ या वर्षाची आठवण करून देणारे आहे. तेव्हा काँग्रेसविरुद्ध जनादेश असला तरी इंदिरा गांधींनी दक्षिणेत विजय मिळवला होता. माझ्या एका मित्राने या लढतीला गोलियथ आणि डेव्हिड या लोककथेची उपमा दिली आहे. तो म्हणतो की ‘ही तगडा गोलियथ विरुद्ध दुबळा डेव्हिड अशी स्पर्धा होती आणि डेव्हिडने गोलियथच्या नाकी नऊ आणले’. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे, असा दावा करणे मूर्खपणाचे असले तरी, भाजप आणि मोदींचा पराभव झाला हे नाकारणे शहामृगासारखे ठरेल. त्यांच्याकडे संसदेत संख्याबळ आहे, परंतु त्यांना हवा असलेला जनादेश नाही.

त्याबाबत कोणताही संभ्रम नको. या निवडणुकीतून सर्वोच्च नेत्याला प्रजासत्ताकाची एक एक वीट काढत ते खिळखिळे करण्यासाठी आणि देशाच्या घटनात्मक लोकशाहीच्या प्रस्तावित विकृतीकरणाला मान्यता हवी होती. भारतीय जनतेने त्यांना हा अधिकार देण्यास नकार दिला. स्पर्धा अधिक न्याय्य असती तर खरे तर त्यांना विरोधी पक्षातच बसावे लागले असते. शेवटी त्यांना हवी होती ती खुर्ची त्यांनी मिळवलीच, पण जनतेने त्यांना हवा असलेला नैतिक अधिकार, प्रतिष्ठा, वैधता नाकारली आहे.

‘भारत जोडो अभियान’चे राष्ट्रीय निमंत्रक

@ _YogendraYadav