२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे. योगाचा आंतरराष्ट्रीय प्रचार झाला. परदेशातील अनेक नागरिकांना त्यात रुचीही निर्माण झाली आहे. कोणाला काय रुचेल व पचेल हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र प्रांताच्या, देशाच्या सीमा ओलांडून एखादी प्रणाली, पद्धत दुसऱ्या प्रदेशात पदार्पण करते तेव्हा त्यामागे यशस्वी प्रचारतंत्र असते, ही बाब विसरून चालणार नाही. रुची निर्माण होण्यामागे अनेकदा निव्वळ कुतूहलही असते. त्या पद्धत वा प्रणालीच्या उपयुक्ततेचे ते प्रमाणपत्र नक्कीच नाही.
कोणत्याही समाजाचे सामाजिक अथवा आरोग्यविषयक आदी प्रश्न सोडवताना त्या समाजात निर्माण व काळानुरूप विकसित झालेले व तेथील तत्कालीन जीवनशैलीशी, समाजजीवनाशी, निसर्गाशी व पर्यावरणाशी सुसंगत असणारे तंत्र व मार्ग अधिक परिणामकारक असतात. त्यातून योगशास्त्र या देशात शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झाले आहे. त्या वेळची समाजरचना, जीवनशैली व आत्ताची याची तुलना होऊच शकत नाही. सामान्य माणसाच्या सर्वसाधारण आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक असतो. विद्यार्थिदशेत मदानी खेळातून तो सहज मिळतो. शालेय अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश करताना नक्की कशासाठी केला जाणार आहे? विद्यार्थ्यांचे म्हणजेच भावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी की प्राचीन भारतात शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेले एक तंत्र ज्याची भुरळ आज विकसित देशांतील परदेशी नागरिकांना पडत असल्याने आमच्या परंपरा, पद्धती कशा श्रेष्ठ अशा समजुतीत राहून कालबाहय़ तंत्रांना पुनरुत्थान देऊन कालौघात मागे पडलेल्या या प्रणालींचा अधिक अभ्यास वगरे करण्यासाठी, भावी संशोधक निर्माण करण्यासाठी हे अगोदर स्पष्ट व्हावे. यम, नियम, हठयोग, साधना सूत्रे हे सारे काही साधू, साधक, अभ्यासक यांच्यासाठी. सर्वसामान्य माणूस यापासून सहसा दूर असतो.
जगभर प्रयोगशाळांमध्ये  संशोधन करून शास्त्रज्ञ विविध प्रयोगांद्वारे, अभ्यासाद्वारे विविध तंत्र विकसित करत असतात. विश्वाची माहिती व मानवी आयुष्य सुखाचे जावे यासाठी हे योगदान असते. अशा संशोधनातील काही प्रयोग फसतात, तर काही वरदान ठरतात. मात्र शास्त्रज्ञ अद्याप संशोधन करत आहेत. त्या बाबी प्राथमिक अवस्थेत असताना शालेय अभ्यासक्रमात आणल्या जात नाहीत. तसेच विकसित देशांतील काही नागरिकांना रुची निर्माण झाली त्या अर्थी हे नक्कीच महान शास्त्र आहे अशा समजुतीत राहून त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यापूर्वी र्सवकष विचार व्हावा. आजच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शालेय अभ्यासक्रमाचे माध्यम वापरून कालचक्र मागे फिरवून त्याला बरेच जुने काही शिकविताना उपयुक्ततेला प्राधान्य द्यावे. अन्यथा नाही अपाय, नाही उपाय, होईल कालापव्यय त्याचे काय, अशी गत होईल.
रजनी अशोक देवधर, ठाणे

असे अनेक भुजबळ सापडतील
राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीचा सारा माहितीपट ‘लोकसत्ता’ने पहिल्याच पानावर (१७ जून)मांडला आहे .
मी भुजबळांना भेटलो होतो. चिंचपोकळी-लालबाग परिसरात टाटांच्या व्होल्टास कंपनीत मी कामाला असताना चिंचपोकळी गल्लीत रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याबद्दल,  ते मुंबईचे महापौर असताना त्यांना महापालिकेच्या कार्यालयात आम्ही भेटलो होतो. त्यांनी भेट दिली, एवढेच नव्हे तर त्यांच्या एका अधिकाऱ्याला आमच्याबरोबर पाठविले. त्या काळापासून ती गल्ली आजही स्वच्छ ठेवली जाते. त्यांची गरिबी तेव्हा दिसत होती. भायखळा परिसरात एका छोटय़ा खोलीत ते राहात असत.
आताची त्यांची मालमत्ता पाहून मला कार्ल मार्क्‍सच्या ‘अतिश्रीमंती ही आíथक शोषणाने येते’ या प्रतिपादनाची आठवण होते.
‘मी निर्दोष आहे,’ असे भुजबळ सांगत आहेत; पण प्रश्न उरतोच. तो असा, भाजी मार्केटमध्ये फिरणारा हा एवढा श्रीमंत होतोच कसा? ..अर्थात आतापर्यंत असे अनेक भुजबळ आपण पाहिले आहेत.
सरकारने पक्षपात न करता शोध घेतला तर असे अनेक भुजबळ आपल्या आजूबाजूला सापडतील. बारामतीचे पवारही गर्भश्रीमंत नव्हते, ते आज श्रीमंतांत गणले जातात. तेव्हा एक भुजबळ – भुजबळ म्हणून ओरडण्यात तसा काहीही अर्थ नाही. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आपण विसरू शकत नाही!
मार्कुस डाबरे, पापडी, वसई  

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

‘पॉवर’फुल साम्राज्येही भुईसपाट करा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्या धडक मोहिमा सुरू केल्या आहेत, त्यातील ‘मायेचे’ आकडे पाहता सामान्य नागरिकाचे डोळे विस्फारतील. भ्रष्टाचाराच्या बलशाली भुजा भरभक्कमपणे, बांधवांच्या भागीदारीने भाग्योदयाकडे भ्रमंती करताना त्यांना भुईसपाट करण्याचे काम सुरू झाले आहे. अर्थात या ‘बळ’वंत साम्राज्याचा  विकास/विस्तार एका रात्रीत आणि एकहाती होणे शक्य नाही हे सामान्य माणूस जाणतो.
अशी अनेक ‘पॉवर’फुल साम्राज्ये भुईसपाट करण्याचे धर्य सरकारने दाखवावे. या ‘सपाटीकरण’  मोहिमेला ब्रेक लागता कामा नयेत, तरच लाचप्रतिबंधक विभाग सक्षमपणे काम करेल.
या विषयाबाबत शोध पूर्तता, आरोपनिश्चिती, न्यायिक बाबींची पूर्तता यासाठी किती काळ लागेल हे कोणताच ‘इंद्र’ सांगू शकणार नाही. त्यामुळे ‘तू जन्माला येताना काय घेऊन आला होतास, जाताना काय घेऊन जाणार?’ हे लक्षात घेऊन एक माफीपत्र सादर करून आपली सर्व ज्ञात-अज्ञात मालमत्ता ‘लोकार्पण’ करावी. नाही तरी कराच्या पशातून उभे राहिलेले प्रकल्प लोकार्पण करण्याची आपली श्रेयवादाची परंपरा आहेच. नियतीच्या संकेतानुसार जर तुरुंगवास असेलच तर तेथे सर्व सुखसोयी असतातच.  तर  ‘आगे देखो क्या क्या होता है’ हे पाहायला प्रामाणिक, पापभिरू नागरिक व करदाते उत्सुक असणारच!
मधुकर घारपुरे, सावंतवाडी

क्वात्रोची, अँडरसन यांनाही ‘मदत’च!
सध्या ललित मोदी प्रकरणी राहुल गांधी  उच्च स्वरात ढोल पिटत आहेत.
१९९४ मध्ये बोफोर्स प्रकरणामधील प्रमुख आरोपी क्वात्रोची हा दिल्लीमधे होता व त्याला भारताबाहेर पलायन करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कॉँग्रेसचे तत्कालीन नरसिंह राव सरकार सक्षम होते. तरीही त्याला पळून जाण्याकरिता मदत करण्याचे आदेश राव सरकारला दिल्लीतील कोणत्या बंगल्यामधून दिले गेले? तसेच भोपाळ वायुगळतीला जबाबदार असणाऱ्या युनियन कार्बाईडचा प्रमुख अ‍ॅण्डरसनला रातोरात भारताबाहेर पळून जाण्याला कॉँग्रेसच्या मध्य प्रदेश सरकारने दिल्लीतील कोणाच्या आदेशावरून मदत केली?  याची उत्तरे राहुलबाबांनी जरूर तपासून पाहावीत.
-डॉ. अविनाश चांदे, शीव (मुंबई)

ही परीक्षा तरी निर्विघ्नपणे पार पडावी
‘परीक्षाग्रस्त’ हा अग्रलेख (१७ जून) वाचला. वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली  केंद्रीय प्रवेशपूर्व परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रवेशपरीक्षेबाबत संशय निर्माण झाल्याचे म्हणत रद्द ठरवली. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे उघडकीस आले. हरयाणा पोलिसांनी असे ४४ विद्यार्थी शोधून काढले. मात्र सव्वासहा लाख विद्यार्थ्यांच्या तुलनेत एवढेच विद्यार्थी गरप्रकारात सापडणे हे खरेच पटत नाही.  तसेच या प्रकरणामागे नक्कीच मोठे रॅकेट असावे. मात्र नाहक मन:स्ताप सोसावा लागत आहे. चार आठवडय़ातच फेरपरीक्षा घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले, तरी एवढय़ा कमी वेळात कॉपीविरोधी यंत्रणा उभी करता येईल का, ही शंकाच आहे. ही परीक्षा तरी निर्वघ्निपणे पार पडावी हीच अपेक्षा.
–  दीपक काशिराम गुंडये, वरळी (मुंबई)