अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

‘सत्संगती याखेरीज शिक्षणाची दुसरी व्याख्या मला माहीत नाही.’ – विनोबा, विचार पोथी.

scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

आयुष्याच्या विशीमध्ये विनोबा व्युत्पन्न बनले होते. गीता, ज्ञानेश्वरी, शंकराचार्याचे भाष्य ग्रंथ पाहून झाले होते. जोडीला आधुनिक विद्याही आत्मसात करून झाली. हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची हे नक्की झाले होते. अशा स्थितीत त्यांनी गांधीजींचे विचार ऐकले. हिमालय आणि बंगाल, शांती आणि क्रांती, पर्वत आणि सागर या सर्वाचे दर्शन त्यांना गांधीजींमध्ये झाले. कशाचाही मोह न राखता विनोबा बापूंकडे आले.

गुरू या शिष्याच्या स्वागताला सज्ज होता. साधनेच्या बाबतीत हा तरुण आपल्या पुढे आहे याची गांधीजींना जाणीव होती. त्यांचा चटकन जाणवणारा विशेष म्हणजे गुणग्राहकता. विनोबांच्या बाबतीत गांधीजींचा हा गुण विनोबांच्या बाबतीत विशेषत्वाने दिसला. विनोबांची साधना त्यांनी जोखली. ती एखाद्या संताच्या तोडीची आहे हे ओळखून त्यांना त्या मालिकेत पाहिले.

या साधनेला शरीरपरिश्रम, आणि रचनात्मक कार्य यांची जोड मिळेल याची दक्षता घेतली. या मार्गावर विनोबांनी अशी वाटचाल केली की पुढे गांधीजींच्या नंतर ते स्थान त्यांना मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. विनोबांनी तो मोह बाजूला सारला ही गोष्ट निराळी.

हे एवढे तपशीलवार सांगितले कारण ‘गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे’ असे विनोबा म्हणत तेव्हा गांधीजींच्या रूपाने त्यांनी गीतेतील निष्काम कर्मयोग पाहिला. विनोबांच्या दोन्ही भावंडांनी गीतेची सेवा केली. तिच्यावर विनोबांच्या एवढाच, किंबहुना थोडा अधिक, गांधीजींचाही प्रभाव होता. या तिन्ही भावंडांना प्रत्यक्ष आचरणातून गांधीजींनी गीता शिकवली. विनोबा गीता आणि भूदान. बाळकोबा निसर्गोपचार आणि ब्रह्मसूत्रासह गीता आणि शिवबा म्हणजे टकळीवर सूतकताई आणि गीताई.

शिवाजीराव भावे लिखित विनोबा चरित्रात, गांधीजींच्या कर्मयोग प्रधान शिकवणीचे नेमके वर्णन आले आहे.

‘.. काशीहून आल्याबरोबर कोचरबच्या आश्रमामध्यें कर्माच्या कसोटीवर ह्या ब्रह्ममार्गी पुरुषाचें ज्ञान परिक्षिलें गेलें. येथें त्याची कसोटी लागली. घरीं अभ्यासादि परिश्रम तर अखंड चाले पण कधीं च कोणते हि काम करण्याची संवय नाहीं. येथें यच्चयावत् आश्रमाची कामें अंगावर पडलीं. स्वयंपाक करणें, दळणें, पाणी ओढणें, झाडणें, भांडी घांसणें, निवडणें, खणणें, पायखानें साफ करणें, विणणें – अशीं कामें कोणकोणती सांगणार? पांच पंचवीस माणसांच्या आश्रमांतली तीं अनेक तऱ्हेचीं कामें असत. तशांत डोळें बिघडलेले. चष्मा हि नाहीं. काशीच्या वाईट हवेमुळें, कष्टामुळें, आधीं च क्षीण असलेलें शरीर अधिक च क्षीण होत चालले. परंतु आश्रमांत दाखल झाल्यापासून अव्याहत अव्यंग कर्मयोगाला सुरुवात करून दिली. विश्रांति, प्रमाद, आळस यांचा मागमूस हि नाही. त्या पहिल्या सहा महिन्यांत हातांत पुस्तक धरलें नाहीं. अथवा वर्तमानपत्र हि वाचलें नाहीं. सदोदित एक च गोष्ट. कर्म—कर्म आणि कर्म!’(लेखन मुळाबरहुकूम आणि जुन्या नियमांनुसार ) भारतीय संदर्भात, शरीरपरिश्रमांमुळे समाजाशी समत्वाचे नाते निर्माण होते. साम्ययोग दर्शनाला आचाराचे अधिष्ठान लाभते. गांधी-विनोबांच्या नात्यांमध्ये हा कर्मयोगाचा दुवा फार महत्त्वाचा होता. तथापि गांधीजींचे मार्गदर्शन याच्याही पल्याड होते. सत्संगाच्या रूपात विनोबांना ते मिळाले.