निकालांचे ‘उड्डाणपूल’, शिक्षणव्यवस्थेतील ‘बबल’!
दहावीच्या निकालाच्या झगमगाटात ‘त्यांची काळजी वाटते’ हा अग्रलेख (९ जून) धोक्याचा कंदील दाखवून अनेकांचा हिरमोड करेल; पण तरीही त्याची गरज होतीच. सर्वानाच भरमसाट गुण देऊन लावलेले दहावी / बारावीचे निकाल म्हणजे उच्च शिक्षणाची देशी / विदेशी बाजारपेठ फुलवण्याचे प्रयत्न वाटतात. त्यातून मग अभियांत्रिकीसारख्या विषयाकडे पदवीकरिता प्रचंड लोंढा येतो आणि शेकडो महाविद्यालयांना ‘कच्च्या मालाचा’ पुरवठा अव्याहतपणे चालू राहतो.
वास्तविक अभियांत्रिकी क्षेत्रात एका पदवीधारकामागे तीन पदविकाधारक आणि आठ-दहा तंत्रकुशल कामगार असावेत अशी अपेक्षा असते. अशा सर्वानाच ‘पदवीधारक’ म्हटले तरी औद्योगिक क्षेत्रातील कामाचे स्वरूप काही त्यामुळे बदलत नाही. हातात पदवी असली की खोटय़ा प्रतिष्ठेच्या संकल्पनाही येतात आणि ‘कामगार’ म्हणून कामाची तयारी नसते. त्यातून मग ‘सुशिक्षित’ बेकारीचा प्रश्न अधिक गंभीर होत जातो. किंवा मग त्याच कामाला गोंडस नावे देऊन होतकरूंना भुरळ घातली जाते आणि पुढे सत्य परिस्थिती उमगल्यावर नराश्य येते. एकीकडे अभियंत्यांचे तांडेच्या तांडे तयार (आणि बेकार) होतात, पण दुसरीकडे बांधकाम, सुतारकाम, प्लंिबग, वायिरग अशा कौशल्यावर आधारित कामांना चांगले प्रशिक्षित मनुष्यबळच मिळत नाही हेसुद्धा पदोपदी दिसून येते. हे असेच चालू राहिले तर देशाला ‘पॉप्युलेशन डिव्हिडंड’ (लोकसंख्येचा लाभांश) मिळण्याऐवजी ती एक भीषण समस्या बनेल.
र्सवकष शहर नियोजन न करता फक्त उड्डाणपूल बांधले की वाहतूककोंडी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेली जाते. दहावी / बारावीचे भरघोस निकाल हे असे उड्डाणपूल ठरत आहेत. अर्थव्यवस्थेच्या एखाद्या क्षेत्रात जेव्हा सगळीकडेच ‘आनंदी आनंद गडे’ असे चित्र सातत्याने दिसू लागते तेव्हा जाणकार लोक ‘बबल’ तयार होत आहे आणि तो कधीतरी फुटणार याची खूणगाठ बांधतात.. आपल्या शिक्षण व्यवस्थेतही असाच ‘बबल’ तयार होत आहे असे वाटते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे.

राज्यात विद्यार्थ्यांची ‘अवकाळी दिवाळी’
‘त्यांची काळजी वाटते!’ हा अग्रलेख (९ जून) दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत अनेकांच्या मनातील संभ्रम व्यक्त करणारा आहे. सर्वच विद्यार्थी सहजगत्या उत्तीर्ण होत असतील तर इतका खर्च करून परीक्षेची ही औपचारिकता पार पाडण्याची खरोखरच आवश्यकता आहे काय?
नव्याने उदयास आलेल्या, गलेलठ्ठ गुरुदक्षिणा मोजून घेणाऱ्या शिकवणीमाफियांना गुणवत्तेच्या या परिवर्तनाचे श्रेय द्यावे तर महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ातही असाच उज्ज्वल निकाल लागला आहे, जिथे या क्लाससम्राटांना प्रतिसाद अपेक्षित नसल्यामुळे त्यांनी त्या भागात अजून तरी फारसे पाय पसरलेले नाहीत.
आपल्या मुलांनी परीक्षेत लावलेल्या या दिव्यांमुळे घराघरांत दिवाळी साजरी होत असली तरी सामाजिक दर्जाच्या दृष्टिकोनातून ही अवस्था चिंताजनक आहे. निव्वळ पाठांतरक्षमता आणि स्मरणशक्तीचे मोजमाप करणाऱ्या या परीक्षापद्धतीत विधायक परिवर्तन करण्याची आत्यंतिक गरज आहे.
– प्रमोद तावडे, डोंबिवली

काळजी ठीक, भविष्य उज्ज्वलच!
‘त्यांची काळजी वाटते’ हे संपादकीय (लोकसत्ता, ९ जून) तितकेसे पटले नाही. ‘अतिशय मोठय़ा प्रमाणावर निकाल म्हणजे गुणवत्तेशी तडजोड’ हे समीकरण म्हणजे नाण्याची एक बाजू झाली. या समीकरणाचा व्यत्यास ‘पूर्वी जेव्हा निकाल कमी लागत, तेव्हा गुणवत्ता शाबूत असायची’ – असा होतो, तो कितपत खरा आहे? राज्यातील अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यांत गेल्या वीस वर्षांत बरेच बदल झाले आहेत. ते चांगले की वाईट, आणि त्यांच्या अंमलबजावणीची रीत, हा चच्रेचा एक वेगळाच विषय आहे. परंतु, हळूहळू का होईना, बदल होत आहेत आणि अंतिमत: त्याच्यातून चांगलेच निष्पन्न होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. गुणवत्ता यादी रद्द केल्यामुळे दहावीच्या परीक्षेला मिळणारे अवास्तव महत्त्व जसे गेल्या काही वर्षांत कमी झाले, त्याचप्रमाणे नव्वदीच्या वर टक्केवारी गाठणाऱ्या मुलांची संख्याही बेसुमार वाढल्याने त्या मार्काचीही नवलाई ओसरली आहे.
कदाचित, यापुढच्या संक्रमण टप्प्यात, चाकोरीबद्ध अभ्यासक्रमांमधील प्रवेश जिकिरीचे झाल्याने आजवर दुर्लक्षिलेल्या पठडीबाह्य़ विद्याशाखांकडे पाहण्याचा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शासन या सगळ्यांचाच दृष्टिकोन बदलायला हातभार लागेल. तेव्हा परिस्थिती आज जरी (प्रवेशाच्या रस्सीखेचीमुळे) काळजी करण्याजोगी वाटत असली, तरी भविष्य धूसर आहे, असा निराशावाद बाळगण्याची आवश्यकता नाही.
– परेश वसंत वैद्य, गिरगाव (मुंबई)

‘जीवन-कौशल्य’ कसे शिकणार?
‘त्यांची काळजी वाटते’ या अग्रलेखात (९ जून) म्हटल्याप्रमाणे शिक्षणाचा हेतू केवळ नागरिकांना साक्षर करणे असा नसून त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित करणे हे आहे. परंतु हे जीवनकौशल्य फक्त पसे कमावणे आणि ते वाढवणे आणि मग अशा पशांचा फक्त उपभोग घेणे इतकाच मर्यादित झालेला दिसतो आहे. चांगले नामांकित उच्चशिक्षित लोक चंगळवादाकडे वळलेले दिसून येतात. अगदी दारिद्रय़ातून, कष्टातून शिक्षण घेऊन शासनदरबारी उच्च पदावर काम करणारे अधिकारी जे दुर्गम भागातून आलेले आहेत, तेसुद्धा या जीवनकौशल्याचा उपयोग फक्त पसे कमावण्याकरिता करताना दिसून येतात. मग प्रश्न हा पडतो की जीवनकौशल्य म्हणजे फक्त पसेच कमावण्याची कला आहे का? १९९१ नंतर तर आपला समाज भौतिक सुखाने आकर्षलिा गेला आहे. अजरामर कलाकृती, अप्रतिम साहित्य निर्माण करण्याची धग या शिक्षणात का नाही? पदोपदी नराश्य आल्यावर आजची पिढी वाम मार्गाला का लागते? नराश्य पूर्वीसुद्धा होते; परंतु नतिक अध:पतन आजच्या एवढे होत नव्हते.
मदानी खेळ, निसर्गाच्या सान्निध्यातील सहली, चनीच्या साधनाचा तुटवडा, घरातील कामातील मुलांचा सहभाग, प्रसंगविशेषी आप्तांच्या भेटीगाठी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘वाचन’ या सगळ्या घडामोडी आज संपुष्टात आल्या आहेत. या सगळ्यांमुळे व्यक्तिमत्त्व विकास होत होता, आनंद, दु:ख इत्यादी भावना आपणास कळत होत्या!
– देवेंद्र जैन, अंबरनाथ.

वडापावातून ट्रायग्लिसराइड-संचय
‘आपण आहारसाक्षर आहात का?’ हा लेख (रविवार विशेष, ७ जून) वाचला. प्रश्न रास्तच आहे. तद्वतच आपण स्वयंशिस्त विसरत चाललो आहोत का, असा प्रश्न पडतो. ‘नूडल्स’ हे नवश्रीमंत मध्यमवर्गाचे खाणे म्हणावे तर तो प्रश्न कितीसा मोठा असावा? त्यापेक्षा आज सर्वसामान्यांचे खाणे अशी प्रसिद्धी लाभलेल्या वडापावकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले आहे. वडापाव विकणारा माणूस रस्त्याच्या कडेला कुठे गाडी लावतो, त्या ठिकाणी गटार बाजूने वाहते आहे का अथवा घाण आहे का हे सर्व स्वच्छ दिसत असताना आपल्याला वडापाव खायची इच्छा होतेच कशी? या वडापावच्या गाडय़ा म्हणजे आजारांची आगारे आहेत, असे म्हणणे वावगे ठरू नये. एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन:पुन्हा वापरल्याने शरीरात हानिकारक द्रव्ये (ट्रायग्लिसराइड्स) निर्माण होतात, असे डॉक्टर सांगत असूनदेखील आपले त्याकडे दुर्लक्ष का होते?
मात्र, भले आपल्या आरोग्याची हेळसांड झाली तरी वडापाव विकणाऱ्याच्या कुटुंबाला मदत केल्याचे ‘पुण्य पदरी पडते’ हेही नसे थोडके!
– प्रमोद मुणगेकर, मुंबई</p>

चाड असेल, तर..
‘सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा’ या मथळ्याची बातमी (लोकसत्ता, ८ जून) वाचली. एका संघटनेच्या प्रमुखांना करदात्यांच्या पैशांतून कोटय़वधी रुपयांचे संरक्षण कशासाठी? त्यांच्या जिवाची काळजी त्यांच्या संघटनेला वाटत असेल, तर संघटनेच्या पैशाने त्यांचे संरक्षण जरूर करावे. करदात्यांच्या कष्टाच्या पैशाचा केंद्र सरकारने असा दुरुपयोग करू नये. खुद्द भागवत यांना थोडी तरी चाड असेल, तर त्यांनी सरकारी संरक्षण नाकारून स्वत:च्या शूर शिपायांचे संरक्षण घ्यावे.
– प्रमोद सोलकर, भांडुप