पॅट्रिक मोदियानो. जन्म - ३० जुलै १९४५, रोजी पॅरिसमध्ये. प्रकाशित कादंबऱ्या - ‘La Place de l'étoile' (१९६८, प्ले ऑन वर्डस), ‘La Ronde de nuit' (१९६९, नाइट राउंडस), ‘मिसिंग पर्सन’ (१९८०), ‘आऊट ऑफ द डार्क’ (१९९८), ‘डोरा बड्रर’ (१९९९), ‘रिंग रोड’ (१९७४), ‘अ ट्रेस ऑफ मॅलिस’ (१९८८), ‘हनिमून’ (१९९२) इत्यादी. या याशिवाय त्यांनी गाणी, पटकथा लेखनही केले आहे आणि मुलांसाठीही पुस्तके लिहिली आहेत. नुकतीच त्यांची ‘सो दॅट यू डोंट गेट लॉस्ट इन द नेबरहुड’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी फ्रेंचमध्ये प्रकाशित झाली आहे.काही प्रतिक्रिया‘आपल्या काळातला मार्सेल प्रुस्त.’ - स्वीडिश अकादमी‘त्यांच्या १३०-१५० पानांच्या छोटय़ा कादंबऱ्यांमध्ये आठवणी, नुकसान, ओळख, शोध यांचा वेगवेगळ्या अंगांनी शोध घेतलेला असतो. आपल्या मागील काळात जाणं आणि त्यात आपल्या ओळखीचा शोध, याकडे पाहण्याचा त्यांचा अभिनव मार्ग आहे.’ - पीटर इंग्लुंड, नोबेल समितीचे कायम सदस्य‘‘मोदियानो यांनी आयुष्यभर गुंतागुंतीच्या भुतकाळाच्या खोलात जाण्यासाठी आणि आपली ओळख शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले.. तेही सतत लपून राहणाऱ्या आणि उदास पण चौकसखोर असलेल्या खाजगी गुप्तहेरासारखे.’’- एन्रीक विला मातास, स्पॅनिश कादंबरीकार‘‘इतिहासाची सरमिसळ, फ्लॅशबॅक, छुपं अस्तित्व, तडजोड, विश्वासघात, संशय यांच्याशी मोदियानो खूपच जोडलेले आहेत.’’- रॉबीन बुस, टाइम्स लिटररी सप्लिमेंटचे समीक्षक.‘‘डोरा बड्रर (मोदियानो यांची कादंबरी) छळवणुकीच्या आठवणी नाही की ऐतिहासिक कादंबरी नाही, पण जीवनाची अशी कौशल्यपूर्वक पुनर्रचना आहे ज्यात या दोन्ही प्रकारांचा मिलाफ होतो.’’ - किरकुस रिव्ह्य़ू डॉट कॉमवरून‘‘ते (मोदियानो) १९६०च्या दशकातील पॅरिसमधील उच्चवर्गातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुण मुलाला मध्यवर्ती ठेवतात.. मोदियानोचा नायक तरुणपणातील अर्धवट आठवणींकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, जाड काचेतून मागे पाहत असल्याप्रमाणे.’’- हेन्री अॅस्टर, बीबीसी न्यूज‘‘गुप्तहेर-रहस्यमय कादंबरी, चित्रपटशैली या सर्व लेखनप्रकारांची मोदियानो सरमिसळ करतात, पण माणसांच्या आयुष्यातील अंतरावर त्यांचा जास्त भर आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे काढून टाकता येतात किंवा दाबता येतात, पण त्यांची मोजणी करता येत नाही.’’ - रुपर्ट थॉम्सन, द गार्डियन