स्थळ – एका वृत्तवाहिनीचा स्टुडिओ. त्याच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर व्यवस्थापनातर्फे एक निवेदन ठळक अक्षरांत लावलेले. ते वाचण्यासाठी वृत्तनिवेदकांसकट साऱ्यांची झुंबड उडालेली. काहींनी त्या निवेदनाच्या शीर्षकस्थानी असलेला ‘व्यसनाचार संहिता’ हा शब्द बघूनच काढता पाय घेतलेला तर काही गांभीर्याने वाचनात गढलेले. त्यातला मजकूर खालीलप्रमाणे होता.

१) निवेदक भक्त असला तर आनंदच आहे, पण भक्तीच्या नावावर गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

२) रसनिष्पत्ती केवळ शाब्दिक बळावर निर्माण करावी, पाहिजे तर ‘चायबिस्कूट’चा आस्वाद घेता येईल. यावरून तुम्हाला कुणीही चिडवणार नाही याची हमी व्यवस्थापन घेत आहे.

३) अँर्कंरग करताना अथवा डिबेट शो करताना प्रचंड ऊर्जा लागते. ही आंतरिक ऊर्जा व्यसनातून निर्माण केलेली नसावी. ऊर्जेसाठी अन्य स्रोताकडे आशेने बघितले तरी चालेल.

४) तंबाखू, पान, खर्रा, मावा असे पदार्थ निवेदन करताना वज्र्य समजले जातील.

५) राष्ट्राच्या संदर्भात घडलेली एखादी छोटी घटना हिमालयाएवढी मोठी करून दाखवताना तुमचा उत्साह व्यसनातून आलेला आहे असा संशय कदापि येता कामा नये.

६) डिबेट सुरू असताना एखादा सहभागी वक्ता राष्ट्रवादी विचाराच्या विरोधात बोलत असेल तर तुम्ही अँकर आहात हे विसरून त्याच्यावर ओरडताना, तुम्ही पूर्णपणे ‘शुद्धीत’ आहात असेच प्रेक्षकांना दिसायला हवे. व्यसनाधीनाचा आरडाओरडा असा कुणाचाही समज होता कामा नये.

७) आनंद व दु:ख व्यक्त करण्याच्या सवयी हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्याचा भाग आहे. त्याच्याशी व्यवस्थापनाला काही घेणेदेणे नाही. मात्र गेल्या आठवड्यातल्या प्रसंगानंतर या सवयीची माहिती वरिष्ठांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे काटेकोर पालन होईल अशी अपेक्षा आहे.

८) अडखळत बोलणे, जड स्वरात शब्दोच्चार करणे, महनीय व्यक्तींची नावे घेण्यात चूक करणे असे आढळून आल्यास ‘तुम्ही शुद्धीत नाही’ असाच त्याचा अर्थ काढला जाईल व नंतर ‘ऑफ कॅमेरा’ तीच चुकीची वाक्ये वा शब्द दुरुस्तीसह शंभर वेळा उच्चारण्याची शिक्षा दिली जाईल.

९) ‘ऑन कॅमेरा’ येण्याची वेळ व तुमची ‘घेण्याची’ सवय यात किमान ४८ तासांचे अंतर असावे याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक.

१०)  एखाद्याच्या चेहऱ्यावर ‘हँगओव्हर’ दिसत असल्यास कॅमेऱ्यापुढे येऊ  नये

११) भक्त आहोत म्हणून प्रत्येक महत्त्वाच्या घटनेत आपणच पडद्यावर दिसले पाहिजे असा आग्रह धरू नये. यापुढे असले प्रकार ‘बेशिस्त’ समजून कारवाई केली जाईल.

१२) राष्ट्रवादी विचाराची वाहिनी असल्यामुळे संस्कृतिरक्षणाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्याचे भान भक्तनिवेदकांनी तरी बाळगणे आता गरजेचे झाले आहे.

कर्मचाऱ्यांचा घोळका हे वाचत असतानाच वाहिनीचा एक लोकप्रिय पण नुकताच निलंबित झालेला निवेदक बाहेर पडला. त्याने सर्वांकडे तुच्छतेने बघत बाहेरचा रस्ता धरला. त्याने संहिता वाचण्याचे कष्टही घेतले नाहीत.