शशी थरूर हे विद्वान गृहस्थ आहेतच, पण ते तसे आहेत, याबाबत तमाम भारतीय माणसांचं एकमत आहे ते त्यांच्या भारीभक्कम इंग्रजीमुळे. कुणाचं इंग्रजी कळत नसलं की त्याला विद्वान असल्याचं प्रमाणपत्र ताबडतोब देऊन टाकायचं हे राष्ट्रीय गुपीत त्यामागे आहे. कुणाला फारसे माहीत नसलेले, अगदी वेगळे असे इंग्रजी शब्द वापरण्यात शशी थरूर यांचा हात कुणालाच धरता येत नसल्यामुळे ते ‘लोकमान्य’ विद्वान आहेत आणि राजमान्य विद्वान तर ते आहेतच. आता लॅलोचेझिया (lalochezia)  म्हणजे एखाद्याला शिव्या दिल्यानंतर मिळणारा भावनिक आनंद हे कुणाला माहीत होतं? पण ते थरूर यांना माहीत होतं. किंवा हिप्पोपोटोसोन्स्ट्रोसेस्वीपेडेलीओफोबिया (Hippopotomonstrosesquipedaliophobia) म्हणजे मोठमोठय़ा शब्दांची भीती हेदेखील थरूर यांनीच आपल्याला त्यांच्या ट्विटरवरून दिलेलं ज्ञान. आपण एखादा कटाक्ष टाकून किंवा ‘फालतू’ या तीन अक्षरांमध्ये जे सांगतो ते सांगायला हे गृहस्थ फ्लोसीनॉसीनीहीलीपीलीफिकेशन (Floccinaucinihilipilification) एवढी अक्षरे घेतात. थोडक्यात ते सामान्यांना समजत नाही असं काहीतरी बोलतात, लिहितात, अधूनमधून काहीतरी वादळ निर्माण करतात, ट्विटरवरून लोक सतत त्यांच्याशी वाद घालत बसतात, असा सगळा थरूर आणि त्यांचे चाहते आणि विरोधक यांचा कार्यक्रम सुखेनैव सुरू असतो.

त्यामुळे देशभरात सगळीकडेच अधिकाधिक वादग्रस्त बोलायचा, लिहायचा, वागायचा रिअ‍ॅलिटी शो सुरू असताना शशी थरूर यांना त्याच्याशी देणं घेणं असायची काहीच गरज नसते. ते तसा कायमच आपला ‘एलाइट’ आब राखून करायचं ते करत असतात. पण झालं काय की या विद्वान माणसाने चुकून, अगदी चुकून कधीतरी एक सोपा इंग्रजी शब्द लिहायला घेतला आणि त्यांचा तो प्रयोग फक्त फसलाच नाही तर अंगाशीही आला!

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत

लोकसभेतल्या चार महिला खासदारांनी थरूर यांना आपल्या सेल्फीमध्ये घेतलं, सेल्फी काढला आणि वर ‘तो सोशल मीडियावर टाका’ असा प्रेमळ दमही भरला. असं सगळं झाल्यावर थरूर यांनी त्या सेल्फीसोबत ‘कोण म्हणतो लोकसभा ही काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही..’ असं वाक्य लिहिलं आणि दिलं ट्विटरवर भिरकावून.

खरं तर त्यांच्या या वाक्यात काय चुकीचं होतं? वास्तविक भक्त मंडळींनी (आजकालया शब्दाचा अर्थ बदलला असून तो पूर्वीप्रमाणे फक्त देवळात जाणाऱ्या लोकांसाठी वापरला जात नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे) लक्षात घ्यायला हवं होतं की एक विरोधी खासदारच सांगतो आहे की बघा लोकसभेत काम केलं जातं. दुसरं म्हणजे सतत गंभीरपणे वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये काही हसऱ्या, आनंदी आकर्षक, महिला सहकारीदेखील आहेत असं म्हणत थरूर विनोद करायला गेले पण तो भलताच गांभीर्याने घेतला गेला.

यात थरूर यांचं काय चुकलं माहिती आहे?

त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये ..स्पेलबाइंडिंग ..प्रीपोझेसिंग ..टेलेजेनिक ..टॅण्टलायझिंग ..पुलक्रिटिडय़ुनियस अशा ‘आकर्षक’ या शब्दाला समांतर असणाऱ्या शब्दांपेक्षाही भारीभक्कम, लोकांना  माहीत नसलेला शब्द वापरला नाही.  एखादा अवघड शब्द  वापरला असता तर बसले असते लोक डिक्शनऱ्या धुंडाळत आणि थरूर नेहमीप्रमाणे विद्वान म्हणवले गेले असते.

.. तेव्हा शशी थरूर, तुम्हारा थोडा चुक्याच!