|| राजीव साने

ट्रस्टीशिप, भूदान वगैरे संदर्भामुळे जो समज होतो तो सोडून, सर्वोदयवाद ही ‘राजकीय-आर्थिक विचारसरणी’ काटेकोरपणे पाहू या.

AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!
samajwadi party
समजावादी पक्ष आणि अपना दलमध्ये जागावाटपावरून मतभेद; इंडिया आघाडीवर परिणाम होणार?

‘तूच स्वतला उद्धारी। खचू देऊ नको ‘स्व’ला। तूच तुझा सखा एक। वैरीही तूच एकला॥’ गीताई (६.५). स्वतचा उद्धार करण्याची जबाबदारी प्रामुख्याने स्वतवरच असते हा खरोखरच मोलाचा उपदेश आहे. उद्धाराचा अर्थ फक्त मोक्षसाधनेपुरता न लावता, भौतिक प्रगती आणि नतिक उन्नती यांत अधिक सुस्थित व अधिक कर्तृत्ववान बनणे असा घेतला पाहिजे. यालाच उत्कर्ष साधत राहणे असेही म्हणता येईल. बऱ्याच राजकीय विचारसरणी, ‘लोकांसाठी’ काय केले पाहिजे यावर असतात. प्रत्येकाने किंवा प्रत्येकीने स्वत: काय केले पाहिजे यावर भर नसतो. स्वत:च्या उत्कर्षांची स्वाभाविक प्रेरणा प्रत्येकात असतेही. परंतु तिला आवाहन करण्याऐवजी, आम्ही तुमचे हित करून देऊ असे सांगणे, लोकप्रियतेसाठी आवश्यक मानले जाते. याउलट, तुम्हाला वाव मिळेल याची काळजी आम्ही घेऊ, निदान तुमच्या स्वोत्कर्षांच्या धडपडीवर बंधने घालणार नाही व कोणी घालत असेल तर त्याला तसे करण्यापासून रोखू, असे अभिवचन राज्यसंस्थेने दिले पाहिजे. सर्वोदय-विचारात मुळात स्व-उदयशीलता गृहीत धरलेली व महत्त्वाची मानलेली आहे.

प्रत्येक व्यक्ती व तिची परिस्थिती (सर्कमस्टन्सेस) अनन्य असते. इतकेच नव्हे तर त्या त्या वेळची प्रसंगस्थिती (सिच्युएशन) अनन्य असते. या प्रसंगी, स्वतच्या निर्णयांमुळे, इतरांच्या निर्णयामुळे आणि भाग्यवशात, व्यक्ती, अगोदरच्या मानाने, जास्त सुस्थित / सक्षम बनेल? की दुस्थित / अक्षम बनेल? हे ठरत असते. तिचे पाऊल उन्नयनाच्या दिशेने पडावे व अवनतीच्या दिशेने पडू नये यासाठी तिने काय केले पाहिजे हेही अत्यंत विशिष्ट असते. यात येणारा ‘अगोदरच्या मानाने’ हा मुद्दा कळीचा आहे. जो जसा जिथे असेल किंवा जी जशी जिथे असेल तिथून त्याचा / तिचा ‘उदय’ आणि असे सर्वासाठी! हा सर्वोदय या संज्ञेचा अर्थ आहे. यात समतावाद आणि समूहवाद हे दोन्ही नाकारले जातात व तसे आवश्यकही आहे.

समूहवादामुळे घाऊकतावाद पसरतो. उदाहरणाच्या अनन्यतेकडे न पाहता (विदाउट गोइंग इन्टु मेरिट्स ऑफ द केस) सरसकट सामान्य विधाने करून निर्णय घेतले जातात. माझ्या समूहाचा उदय हा मी माझाच उदय मानायचा व धन्य वाटून घ्यायचे! हे समूहवादात असते. समूहवादी राज्यांचे कर्तव्यही (म्हणे) समूहांचे ‘भले’ करायचे असते, व्यक्तींचे नव्हे!

समतावादामुळे सपाटीकरणवाद पसरतो. म्हणजेच प्रत्येकाचे उन्नयन न करता अगोदर सर्वाना एकसमयावच्छेदेकरून एका पातळीवर आणायचा आग्रह धरला जातो. निम्नस्थितीतल्यांचे उन्नयन दुर्लक्षित ठेवून उच्चस्थितीतल्यांचे अवनयन करण्यावर भर दिला जातो. समतावादानुसार व्यक्तीचे ब्रीद काय असते? ‘‘इतर जोपर्यंत माझ्या इतके वर येत नाहीत तोपर्यंत मी माझे उन्नयन थांबवले पाहिजे!’’  राज्यानेही व्यक्तींना तसे थांबायला भाग पाडायचे असते किंवा खाली खेचायचे असते.

सर्वोदयवादाची नीतिसूत्रे

सर्वोदयवादानुसार स्वैरतेला अनुमती दिली असेल आणि ‘आपोआप होईल तो’ सर्वोदय मानला जात असेल, ही गरसमजूत आहे. सर्वोदयवादानुसारही नागरिकावर आणि राज्यसंस्थेवर नतिक बंधने येतात. सर्वोदयवादाच्या कसोटय़ा कोणत्या? यावर आधुनिकतावादी मांडणी पुरेशी झालेली नाही.

एकुणात शून्य बेरजेचा डाव नसून धन बेरजेचा डाव आहे. उभयलाभकारी उत्तरे असू शकतात. जिथे म्हणून धन-पूरकता सापडेल तिथे ती प्रोत्साहित करायची! हे सामान्य तत्त्व आहे. कोणत्या प्रसंगी कोणाची कोणती गरज अन्य कोणाला पूरक ठरू शकेल? हे शोधता येणे, संपर्कक्रांतीने अधिकाधिक फाइन टय़ुिनगनिशी शक्य होईल असा विश्वास, सर्वोदयवादाचा आधार आहे.

सर्वोदयवादानुसार मला काय वैध (एनजॉइिनग नॉर्म), निषिद्ध (प्रोहिबिटिव्ह नॉर्म) किंवा अनुमतीदत्त(परमिसिव्ह नॉर्म) असेल? याची निश्चित व्याख्या करता येते.

(१) वैध : माझ्या उन्नयनाची परिणती इतरांचेही उन्नयनच होण्यात झाली पाहिजे. निदान कोणाचे अवनयन होता कामा नये. पण ही उन्नयने, मात्रेने कमी-अधिक असली तरी चालतील.

(२) अनुमतीदत्त : माझ्या उन्नयनाची परिणती जर धन-ऋण असेल तर तिच्यात इतरांच्या उन्नयनांचा धन घटक, अवनयनांच्या ऋण घटकापेक्षा पुरेसा जास्त असला पाहिजे

(३) निषिद्ध : माझ्या उन्नयनाच्या मानाने, इतरांच्या परिणामस्वरूप अवनयनांची बेरीज जास्त असेल तर, असे उन्नयन मी रोखले पाहिजे.

कोणाचे उन्नयन कशात आहे? हे ओळखणे महत्त्वाचे ठरते. माणसाच्या गरजांना एक श्रेणी असते. निम्नतर गरज भागली जाण्याला अग्रक्रम असला तरी तिच्यात अडकून राहणे अनिष्ट असते. स्वाभाविकपणेदेखील, निम्नतर गरज भागण्याने, उच्चतर गरज जागृत होत असते. पण मानसिक आळसामुळे आणि योग्य आकलन न झाल्याने, उच्चतर गरजेकडे मोहरा वळविण्याऐवजी, माणूस निम्नतर गरजेमधीलच गोष्टी अधिकाधिक मिळवत रहातो. लोभ किंवा हव्यास या दोषांमागे उच्चतर गरजेची गोडी न लागणे हे फार महत्त्वाचे कारण आहे. ही गोडी लावता आली नाही, तर हव्यास वा लोभ सोडा, असे नुसतेच उच्चरवाने सांगून उपयोग होत नाही.

गरजांची श्रेणी लावणे, जिच्यात अलीकडची गरज जास्त ‘निकडी’ची असेल, पण पलीकडची गरज जास्त ‘सार्थका’ची असेल, हे महत्त्वाचे बौद्धिक कार्य ठरते. मॅस्लो या व्यवस्थापनतज्ज्ञाची श्रेणी आणि इकीगाई नावाची जपानी आकृती या गोष्टींची पुनरुक्ती मी करणार नाही. (त्या तुम्हाला गुगलवर सहजगत्या मिळतील.) त्यांचे सिंथेसिस व इतर काही विचार करून, गरजांची जी श्रेणी मला पटते, तीच येथे देत आहे.

ज्यांत माणूस परावलंबी किंवा समाजावलंबी असतो, पण ज्या अलीकडे असतात, त्या गरजा म्हणजे उपजीविका आणि यश होत. ज्यात माणूस समाजनिरपेक्षपणे रमू शकतो व ज्या पलीकडच्या म्हणजेच जास्त सार्थकाच्या असतात त्या म्हणजे छंद आणि ध्यास होत. उपजीविकेत मी पोषण, संरक्षण, पुनरुत्पादन, सुविधा व कष्टबचत हे सगळेच धरतो. यश हे तौलनिक असल्याने ते किती मिळवावे याला तुमचे नपुण्य आणि तुमचे भाग्य याच मर्यादा असतात. यशाच्या मागे लागणे थांबवता येते हे निश्चित. पण त्यासाठी छंद व ध्यास यांची गोडी कळावी लागते. छंदात स्वान्त:सुख आहे पण त्याला जगाच्या कल्याणाचा व्यापक संदर्भ नाही. ध्यासात कष्टही आहेत, पण त्यात जगाच्या कल्याणाचे प्रयोजन घेतल्याने सार्थकता जास्त आहे. सेवन (कन्झम्प्शन) ही मुळात उपजीविकेतली गोष्ट; पण यशाचे चिन्ह म्हणून सेवनाकडे पाहण्याने कुप्रसिद्ध ‘चंगळवाद’ उद्भवतो. छंदात नपुण्य मिळवणेही असते, पण ते यशासाठीचे नव्हे याचे भान ठेवावे लागते. ध्यासात जर यशाची भेसळ झाली तर महत्त्वाकांक्षा आणि तिचे उदात्तीकरण हे सापळे लागतात. त्यामुळे वैरवादासारख्या दुष्प्रवृत्तीकडेही प्रवास होतो.

इथे खास मुद्दा असा आहे की, जेव्हा मी माझ्या उन्नतीत उपजीविका, यश, छंद, ध्यास हा क्रम खरोखरच पुढे पुढे जाणारा ठेवतो, तेव्हा मी इतरांच्या उन्नतीला पूरक ठरणार असतो. उलट अडखळलेल्या टप्प्यामध्ये जास्त जास्तचा हव्यास धरतो तेव्हा इतरांच्या उन्नतीला मारक ठरणार असतो. म्हणजेच ब्रीद म्हणून स्वत:ची उन्नती रोखायची नसून ती सम्यक बनवायची असते.

आत्मघातकी दुर्गुण सर्वाच्यात असतात

कोण उन्नतीच्या कोणत्या पातळीवर आहे यानुसार त्या त्या व्यक्तीचे कोणते दुर्गुण आत्मघातकी ठरतील हे वेगवेगळे असते. उपजीविकेत मागे पडलेल्यांनी उपजीविकेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे व नंतर यशावर. यशस्वी लोकांनी छंद आणि ध्यास यांच्याकडे वळले तरच त्यांना खरे समाधान मिळणार असते. आत्मघातकी दुर्गुण हे स्वतबरोबर इतरांनाही खाली खेचतात. चांगले कर्मचारी नाही मिळाले तर उद्योजक कसा यशस्वी होईल? कर्मचाऱ्यांना क्षमता व वृती सुधारून देणे ही जबाबदारी उद्योजकाला घ्यावीच लागते.

दोनपेक्षा जास्त मुले होऊ देणे किंवा प्रथेला बळी पडून अनाठायी खर्च करणे व कर्जबाजारी होणे, हे त्या कुटुंबाला घातक असतेच, पण अख्ख्या देशालाही घातक असते.

दुरवस्थेतील लोकांना मदत करणे आवश्यक आहे. पण ही मदत, त्यांच्यातले आत्मघातकी दुर्गुण तसेच चालू ठेवण्यासाठी कामी येत असेल, तर ती उन्नतीकारक मदतच नव्हे. मदत करणाऱ्याची राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा वैचारिक दुराग्रह जर प्रभावी ठरत असतील, तर मदत करणारा ध्यासाचे ढोंग करत असतो आणि अवनतीकारकच हस्तक्षेप करत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणाच्याही दुरवस्थेवर उपाय करणाऱ्यांनी सरधोपट उपाय न करता, अवस्था पाहून व्यवस्था केली पाहिजे. ताबडतोबीचे काय हे पाहताना दूरगामी काय हे विसरून चालणार नाही. कोणत्याही कारणाने असो, पण लोकांतील स्वोत्कर्षांची प्रेरणाच मारून टाकणे आणि त्यांना आश्रित राहण्याची सवय लावणे, हे दुष्कर्म तरी टाळावे.

rajeevsane@gmail.com