देवेंद्र फडणवीस

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने आपला राजकीय अवकाश अधोरेखित केला आहे. एके काळी दोन खासदार ते आज केंद्रात आणि १८ राज्यांमध्ये सत्ता असा प्रवास करणाऱ्या भाजपचा आज स्थापना दिन. त्यानिमित्त पक्षाने पूर्ण केलेल्या अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी या वर्तुळाचा आणि पक्षाच्या ४२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा.

BJP candidate Vishwadeep Singh
भाजपा उमेदवाराचे वय १० वर्षात १५ वर्षांनी वाढले?; समाजवादी पार्टीचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

२१ ऑक्टोबर १९५१ : जनसंघाच्या स्थापनेचा दिवस. संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सर्वधर्मीयांना सदस्य करून घेण्यासाठी पुढाकार घेत जनसंघाची स्थापना केली. एक व्यापक आणि सर्वसमावेशी दृष्टिकोन ठेवत पाऊल उचलले. जनसंघाने आपला पहिलाच ठराव केला तो संयुक्त राष्ट्रसंघातून काश्मीर हा विषय वगळण्याच्या मागणीचा. कारण, काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे. ‘एक देश में दो प्रधान, दो निशान और दो संविधान नही चलेंगे’ हा नारा त्यांनी दिला. प्रखर राष्ट्रवाद हा त्यांचा बाणा होता.

२४ जून १९९१ : कल्याणसिंग हे भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशातील पहिले मुख्यमंत्री बनले. वंचितांचा विकास आणि राम मंदिरासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

६ ऑगस्ट २०१९ : काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निरस्त केले.

५ ऑगस्ट २०२० : अयोध्येत श्रीराम मंदिराचे  पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झाले.

ही काही बोलकी उदाहरणे आहेत. हा संपूर्ण प्रवास प्रदीर्घ असला तरी निर्णायक आणि निर्धारयुक्त आहे. धोरणात्मक आणि विचारपूर्वक आहे. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. अटलबिहारीजी वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष झाले. पक्षाची दिशा स्पष्ट करताना ते म्हणाले, समता हे भाजपचे सूत्र असेल आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला देश, सकारात्मक पंथनिरपेक्षता या मार्गावर आम्ही वाटचाल करू. आज जेव्हा आपण मागे वळून हा ४२ वर्षांचा प्रवास पाहतो तेव्हा, प्रत्येक बाबतीत काय लक्षात येते, तर तो निर्धार आणि निर्णायकता. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी माझ्या पक्षाचे सिंहावलोकन करतो, तेव्हा काही बाबींचा ऊहापोह केलाच पाहिजे. या संपूर्ण प्रवासात वंचितांचे, समाजातील अंतिम माणसाचे मातृत्व स्वीकारल्याचा भाव आहे, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्त्व सिद्ध केल्याचे प्रमाण आहे, अन्य पक्षांसारखी घराणेशाही किंवा मालकीयुक्त संस्थाने नव्हे, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीपासून ते पं. दीनदयालजी उपाध्याय, नानाजी देशमुख, श्रद्धेय अटलजी, लालकृष्ण अडवाणीजी, डॉ. मुरली मनोहर जोशीजी ते अगदी आता नरेंद्र मोदीजी अशी नेतृत्वाची भक्कम मांदियाळी आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीद कायम हाती घेऊन चालणाऱ्या पक्षाची सर्वोच्च भाव-भावना कोणती असेल तर ती राष्ट्रीयत्वाची. म्हणूनच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या परंपरेचा पाईक म्हणून मला कायमच या पक्षात काम करायला मिळाल्याचा अभिमान आहे.

एकात्म मानवदर्शन असेल किंवा अंत्योदय किंवा अगदी आताच्या काळातील गरीब कल्याणाचा अजेंडा, कायम शेवटच्या माणसाचा विचार भाजपने केला. ९० च्या दशकात भांडवलशाहीचा विरोध करीत अर्थसंकल्प हा मानवतेच्या अंगानेच मांडला गेला पाहिजे, यासाठी आग्रही असलेला भाजपच होता. त्या काळात स्वदेशीचा आग्रह होता, आज आत्मनिर्भरतेचा प्रवास आहे. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करताना, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देतानाच देशांतर्गत उद्योग शक्तिशाली कसा होईल, याचा आग्रह धरणारा भाजपच.

आज करोनाकाळात ज्या पद्धतीने मोदीजींनी धुरा सांभाळली, देशाला नेतृत्व दिले, ते तर अवर्णनीय आहे. हे एक असे संकट होते, ज्यात भाजपच्या मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि राष्ट्रीयत्व या चारही मूलभूत गुणांचा एकत्रित परिचय झाला. लसीकरणात भारताने इतिहास रचला. आताच्या मुखपट्टी मुक्तीपर्यंतच्या प्रवासाचे रहस्य सांगायचे झाले तर ते भक्कमपणे झालेल्या लसीकरणात आहे. आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून या काळात लघू आणि सूक्ष्म उद्योगांपासून ते सामान्य कामगारापर्यंत, महिला कल्याणापासून ते घराघरातील पोटापाण्याचे प्रश्न सोडविण्यापर्यंत ज्या आत्मनिर्भर/ गरीब कल्याण योजनेने महत्त्वाची भूमिका वठविली, त्याचे सारे श्रेय नरेंद्र मोदीजींचे आहे. या संपूर्ण प्रवासातील निर्णयप्रक्रियेचा निकष एकच, तो म्हणजे राष्ट्रीयत्व. एकदा का राष्ट्रीय बाणा, राष्ट्रवाद हे सर्वोच्च ध्येय मानले की मग देशाचा प्रवास किती गतिमान होऊ शकतो, याचा परिचायक गेल्या सात वर्षांतील देशाचा प्रवास आहे.

२०१४ च्या आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका असोत की अगदी अलीकडे झालेल्या गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील निवडणुका, महिलांचा भाजपकडे वाढलेला मतदानाचा टक्का भाजपवर आणि देशातील नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा नूर स्पष्ट करणारा आहे. कधी काळी दोन खासदारांचा असलेला पक्ष आज केवळ देशातील नाही, तर अनेक राज्यांतील जनमताच्या केंद्रस्थानी असणे यामागे धोरणातील सातत्य आहे, निर्धार आहे, निर्णायकता आहे. असे असले तरी भाजपच्या राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही रणनीतीकारांनी अजूनही संकुचित ठेवला आहे, याचे वैषम्य वाटते.

भाजपच्या आजवरच्या प्रवासाचे, ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेचे साकल्याने आकलन करणाराच भाजपची योग्य चिकित्सा करू शकतो. केवळ राजकीय कारणांमुळे किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहणाऱ्या अनेकांची धारणा हळूहळू बदलते आहे. काळ लोटेल आणि धारणा स्पष्ट होतील, तशी इतरांची सुद्धा येणाऱ्या काळात धारणा बदलेल. हा एक दीर्घ प्रवास आहे. मतपेरणी कुणी काहीही करीत असो, पण एके काळी अस्पृश्यता सहन कराव्या लागणाऱ्या भाजपच्या आजच्या उत्थानाची विधाता ही या देशातील जनता आहे आणि पुढेही तेच जनताजनार्दन कायम असेल. या देशातील जनतेने भाजपचे दोन पंतप्रधान आणि सुमारे ५० मुख्यमंत्री निवडले आहेत. मालकी हक्क आणि घराणेशाहीपासून दूर, कायम जनतेत राहणारा पक्षच जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुमान मिळविण्याचा हा टप्पा गाठू शकतो. भाजप आणि जनतेची ही नाळ इतकी घट्ट आहे की, सत्ता असो वा नसो, सेवा हा विषय आला की पहिल्यांदा डोळय़ासमोर कोणता पक्ष येत असेल तर तो भाजप आहे. करोनाच्या काळात तर महाराष्ट्राने, देशाने याचा मोठाच अनुभव घेतला. आज भाजपचे स्वरूप हे इतके भव्यदिव्य असले तरी सर्वात मोठी कमाई ही जनसेवेची आहे, तीच खरी ओळख आहे, तेच यश आहे..

लेखक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून, विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत.