डॉ. जयदेव पंचवाघ

संप्रेरकांच्या स्रावात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या ग्रंथीच्या कार्यात बाधा येत असल्याची जाणीव रुग्णाला फार उशिरा होते..

How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

शरीरातील विविध ग्रंथींमधून रक्तप्रवाहात स्रवणारी आणि रक्ताभिसरणाबरोबर शरीरभर पसरून विविध अवयवांच्या कार्यावर प्रभाव टाकणारी अतिविशिष्ट रसायनं म्हणजेच संप्रेरकं किंवा हॉर्मोन्स. शरीरातील निरनिराळे अवयव आयुष्यात विशिष्ट वेळेला कार्य करण्यास उद्दीपित होतात किंवा थंड पडतात. हे कार्य नेमकं कधी सुरू व्हावं, कधी विशेष जोरानं चालावं, कधी धिम्या गतीने पुढे जावं आणि कधी बंद व्हावं हे अचूकपणे नियंत्रित करणारी व्यवस्था असणं गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नको. उदाहरणार्थ, वाढत्या वयात विशिष्ट कालखंडात निश्चित वेगानं व्यक्तीची उंची वाढते. त्यासाठीचं उद्दीपन हाडांना, स्नायूंना व इतर अवयवांना विशिष्ट वयातच मिळायला हवं आणि विशिष्ट उंची गाठल्यावर कुलूप लावल्यासारखी ही प्रक्रिया थांबायलाही हवी. ‘ग्रोथ हार्मोन’ नावाचं संप्रेरक विशिष्ट वयात ही वाढीची सूचना शरीराला देतं आणि विशिष्ट कालखंडानंतर या संप्रेरकाचं प्रमाण कमी होऊन वाढ थांबते. मेंदूच्या तळाला वसलेल्या पियुषिका ग्रंथीमधून हे संप्रेरक तयार होऊन रक्ताभिसरणात मिसळतं आणि पुढचं कार्य पार पाडतं.

योग्य वेळी हे संप्रेरक तयार होणं सुरू झालं नाही तर व्यक्तीची उंची वाढणारच नाही. शारीरिक वाढ खुंटेल. याउलट हेच संप्रेरक अतिरिक्त प्रमाणात आणि झपाटय़ाने तयार झाल्यास उंची वाढतच जाईल आणि अगदी दहा किंवा जास्त फुटांपर्यंतसुद्धा पोहोचेल. (याला जायजँटिझम –  Gigantism म्हणतात.) आता, शरीराची वाढ पूर्ण झाल्यावर काही वर्षांनी हे संप्रेरक अतिरिक्त स्रवायला लागलं तर काय होईल? व्यक्तीची उंची तर वाढणार नाही कारण हाडं आधीच जुळली आहेत. मग हाडाची जाडी वाढू लागेल, विविध अवयवांची जाडी वाढू लागेल. जीभ, नाक, त्वचा, ओठ, स्वरयंत्र इत्यादी अवयव जाड व थोराड होऊ लागतील. व्यक्ती उभी वाढू शकली नाही तरी आडवी वाढेल. म्हणजे स्थूल होईल असं नाही तर थोराड होईल. हाडं आणि त्वचा जाड होत जाईल. ( याला अ‍ॅक्रोमेगॅली-  Acromegaly म्हणतात.)

ग्रोथ हॉर्मोनविषयी एवढं खोलात जाऊन लिहिण्याचं कारण म्हणजे याच्या अतिरिक्त स्रवण्याने होणाऱ्या आजारांचा शोध लावण्याच्या आणि त्याची कारणमीमांसा करण्याच्या जिज्ञासेतून संप्रेरकांचा शोध लागण्यास सुरुवात झाली.

पिटय़ुटरी ग्रंथींच्या गाठींमध्ये दिसणारी लक्षणं विशिष्ट प्रकारची असतात. या लक्षणांबाबत फक्त सामान्य जनतेमध्येच नाही तर जनरल प्रॅक्टिशनर्समध्येसुद्धा जागृती होणं गरजेचं आहे. लक्षणांचा अयोग्य अर्थ लावल्यामुळे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या गाठींचं निदान उशिरा झाल्याचं अनेकदा दिसतं.

मेंदूच्या तळाशी, मनोव्यापारांच्या मुळाशी

मेंदूच्या तळाला जे हाड असतं (ज्या हाडांवर मेंदू विसावलेला असतो) त्या हाडांच्या रचनेला ‘स्कल बेस’ किंवा ‘बेस ऑफ द स्कल’ असं संबोधलं जातं. या भागाच्या मधोमध असलेल्या स्फीनॉइड नावाच्या हाडामध्ये एक, उखळाला असतो तसा, खळगा असतो. हा हाडातला खळगा बाजूनं बघताना घोडय़ावर घालण्यात येणाऱ्या खोगिरासारखा दिसतो म्हणून त्या भागाला ‘सेला टर्सिका’ असं नाव आहे. या खळग्यामध्ये पिटय़ुटरी ग्रंथी स्थित असते. मेंदूच्या तळाला हायपोथॅलॅमस म्हणून जो भाग असतो त्या भागापासून एक लहान काडीसारखा भाग पिटय़ुटरी ग्रंथीपर्यंत पोहोचतो. किंबहुना, मेंदू व ग्रंथीला एकमेकांशी जोडतो. या लांबट काडीसारख्या भागाच्या सभोवताली अनेक रक्तवाहिन्या एखाद्या झाडाच्या खोडावर अनेक वेली चढाव्यात तशा दाटीवाटीने लपेटलेल्या असतात. या रक्तवाहिन्या मेंदूच्या तळापासून पिटय़ुटरी ग्रंथीपर्यंत पसरलेल्या असतात. मेंदूच्या तळाशी असलेल्या हायपोथॅलॅमस या भागातील पेशी जी रासायनिक द्रव्ये तयार करतात ती या रक्तवाहिन्यांमधून पिटय़ुटरी ग्रंथीपर्यंत वाहात येतात आणि ग्रंथीमध्ये तयार झालेले अनेक द्रव मेंदूपर्यंत नेले जातात. या रसायनांच्या व्यवस्थेच्या आधारे मेंदू व पिटय़ुटरी ग्रंथी एकमेकांवर नियंत्रण ठेवतात.

मानवी भावना, स्मृती, विचार या मेंदूत घडणाऱ्या प्रक्रियांचे परिणाम शरीरातील हॉर्मोन कमीजास्त होण्यावर का होतात, हे यावरून आपल्या लक्षात येईल. किंबहुना चेतासंस्था, संप्रेरकं, रोगप्रतिकारक शक्ती यांचं एकमेकांवर घनिष्ठ नियंत्रण आणि बारीक संपर्क असतो. मेंदूत घडणाऱ्या विविध प्रक्रिया आणि मनोव्यापारांचा संप्रेरकांच्या (हॉर्मोनच्या) पातळय़ांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. या परिणामामार्फत व स्वतंत्ररीत्यासुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमीजास्त होत असते. गेल्या काही वर्षांत ही शाखा म्हणजेच ‘न्यूरो ुमोरो इम्युनॉलॉजी’ अभ्यासली जात आहे. मानसिक ताणतणावामुळे स्त्रियांमध्ये पाळी अनियमित येणे किंवा गर्भधारणा न होणे किंवा अशा ताणतणावामुळे पुरुषामध्ये नपुंसकत्व येणं हे प्रकार होतात ते मानसिक आजारांचा हॉर्मोनवर अनिष्ट परिणाम झाल्यामुळेच. तसंच रोग प्रतिकारक शक्तीवर मनोव्यथांचा परिणाम होऊन वारंवार जंतुसंसर्ग होणे किंवा अस्थमा, सोरायसिस यांसारखे रोग बळावणे अशा गोष्टीसुद्धा पिच्युटरी ग्रंथी व हॉर्मोन्समार्फत घडू शकतात.

लक्षणांचे चार प्रकार

पिटय़ुटरी ग्रंथींच्या गाठींमध्ये प्रामुख्याने चार प्रकारची लक्षणं दिसतात. पहिलं लक्षण म्हणजे डोकेदुखी. ही ग्रंथी ज्या खोबणीत (सेला टर्सिका) बसलेली असते त्यातील दाब या गाठीमुळे वाढल्यामुळे हे सुरू होतं. कपाळाचा पुढचा आणि बाजूचा भाग दुखणे, डोक्याचा मागचा भाग दुखणे असं हे लक्षण दिसू शकतं.

दुसरं लक्षण हे दृष्टीसंबंधित आहे. दृष्टीच्या दोनही नसा पिटय़ुटरी ग्रंथीच्या खळग्याच्या वरून जातात. ग्रंथीची गाठ जशी वर वाढत जाईल तशा या नसा दाबल्या जाऊ शकतात आणि विशेषत: दृष्टीच्या ‘स्क्रीन’वरचा दोनही बाजूंचा भाग दिसेनासा होतो. चालताना दाराची कड न दिसणं, गाडी चालवताना अगदी डाव्या व उजव्या बाजूची वाहने न दिसणं असे प्रकार सुरू होतात. आपल्याला हा त्रास होत असल्याची बहुतांश रुग्णांना कल्पनाच नसते. आणखी काही काळाने मात्र एका वा दोन्ही डोळय़ांची दृष्टी अत्यंत कमजोर होते. पिटय़ुटरी टय़ूमरच्या अनेक रुग्णांत हे लक्षण बराच काळ दुर्लक्षित राहतं असा माझा अनुभव आहे.

तिसरं लक्षण महत्त्वाचं आहे आणि हे एक लक्षण नाही तर लक्षणांचा समूह आहे. पिटय़ुटरी ग्रंथीच्या गाठीमुळे विशिष्ट संप्रेरकं कमी अथवा जास्त प्रमाणात स्रवल्याने दिसणारी ही लक्षणं आहेत. काही गाठी या विशिष्ट संप्रेरकं अधिक निर्माण करतात आणि इतर संप्रेरकं तयार करणाऱ्या पेशी दाबल्या गेल्यामुळे ती कमी प्रमाणात तयार होतात. काही गाठी या कोणतेच कार्यक्षम संप्रेरक तयार करत नाहीत. या गाठी फक्त त्यांच्या वाढत्या आकारामुळे लक्षणं निर्माण करतात (डोकेदुखी, दृष्टी कमी होणं वगैरे).

संप्रेरकांशी संबंधित लक्षणं ही त्या-त्या संप्रेरकाप्रमाणे बदलतात. उदाहरणार्थ ग्रोथ हॉर्मोन अधिक स्रवल्यानं बोटांची जाडी वाढणं, त्यात पूर्वी बसणारी अंगठी न बसणं, नाक व जबडा रुंद, बेढब होणं, पायाची रुंदी वाढून पूर्वी बसणाऱ्या चपला न बसणं, स्वरयंत्राची जाडी वाढून आवाज घोगरा होणं, जीभ जाड होणं यांसारखी लक्षणं दिसतात. उंचीची वाढ पूर्ण होण्याआधी ग्रोथ हॉर्मोन वाढल्यास उंची अमर्यादित पद्धतीनं वाढत जाते अगदी ११-१२ फुटांपर्यंतसुद्धा ती पोहोचू शकते.

प्रोलॅक्टिन हे संप्रेरक तयार होणाऱ्या पेशींपासून गाठ तयार झाल्यास स्तनांतून दुधासारखा पदार्थ बाहेर येणं, पुरुषांमध्ये नपुंसकत्व येणं, स्त्रियांमध्ये पाळी बंद होणं, वंध्यत्व येणं यांसारखी लक्षणे दिसू शकतात. कॉर्टिसॉल हे संप्रेरक वाढल्यास वजन वाढत जाणं, चेहरा गोल होणं, पोटाचा घेर वाढणं, चेहऱ्यावर व अंगावर मुरूम, पुटकुळय़ा येणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं अशी लक्षणं दिसतात.

ोरऌ व  छऌ ही संप्रेरकं कमी-जास्त झाल्यास लैंगिक व प्रजोत्पादनाच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. नपुंसकत्व आणि वंध्यत्व येण्याची अशा वेळी शक्यता असते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन कमी होऊन त्याचे मानसिक व शारीरिक परिणामसुद्धा दिसू शकतात.

पिटय़ुटरी ग्रंथीच्या गाठींमध्ये दिसणारं चौथ्या प्रकारचं लक्षण म्हणजे पिटय़ुटरी अ‍ॅपोप्लेक्सी. यात अचानक डोकं दुखायला लागून खूप ग्लानी येणं, पूर्ण अंधत्व येणं, शुद्ध हरपणं, रक्तदाब खूप कमी होणं आणि वेळीच उपचार न केल्यास जिवावर बेतणं असे गंभीर प्रकार घडू शकतात. पिटय़ुटरी ग्रंथीच्या मोठय़ा गाठीमध्ये अचानक रक्तस्राव झाल्यास अशा घटना घडतात. म्हणूनच गाठींचं निदान झाल्यावर वेळ घालवणं योग्य नाही. सुदैवाने हे लक्षण फार सामायिक नाही.

मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे डॉ. हार्वे कुशिंगने इ.स. १९०० ते १९३० या काळात या ग्रंथीवर मोलाचं संशोधन केलं. विशेषत: ग्रोथ हॉर्मोन आणि कॉर्टिसॉल या संप्रेरकांच्या अतिरिक्त स्रवण्याने होणाऱ्या आजारांवर त्यानं खूपच प्रकाश पडला. त्याविषयी पुढच्या वेळी.

पिटय़ुटरी ग्रंथीची गाठ दाखणारा एमआरआय

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com