भेदभावावरच सत्ता टिकून  आहे.. पैसेवाल्यांचा या सत्तेला पाठिंबाच, तरीही देशातील वंचितांचा समूह या सत्तेविरुद्ध, तिच्यामागच्या भेदभावाविरुद्ध सातत्याने आवाज उठवतो आहे.. अशा वेळी  अभावग्रस्त, वंचित समूहाकडे पाहायचे की सत्ताच टिकवायची? – हा कठीण प्रश्न समोर उभा असताना, १९९० पासूनच सत्ता पणाला लावून दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विल्यम डी क्लर्क यांनी कृष्णवर्णीयांचे नेते नेल्सन मंडेला यांची कैदेतून मुक्तता केली. याच मंडेलांसह डी. क्लर्क यांनी ‘वर्णभेदमुक्त दक्षिण आफ्रिका’ साकारण्याचा समझोता केला.. हा अवघड, त्यागमय आणि मानवकल्याणाकडे नेणारा निर्णय घेतल्याबद्दल त्यांना १९९३ सालचे ‘नोबेल शांतता पारितोषिक’देखील मिळाले होते.

तरीही, परवाच्या ११ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर काही जणांनी भररस्त्यात आनंद साजरा केला.. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी राष्ट्राध्यक्षांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने होऊच नये, अशी मागणी टिपेला पोहोचली. अखेर, येत्या २१ रोजी आम्ही घरगुती पद्धतीनेच दफनविधी करू, असा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. मनामनांत घट्ट बसलेल्या भेदभावाची दहशत कशी असते, याचा हा आणखी एक नमुना! पण त्याआधीच- जिवंतपणी- या भेदभावाच्या दहशतीचे शिकार डी क्लर्क अनेकदा झाले होते. त्यामुळेही असेल; पण ‘वर्णभेदकारक राजवटीचा मी भाग होतो, याविषयी मी जनतेची माफी मागतो,’ असे नि:संदिग्ध उद्गार त्यांनी काढल्याचे ध्वनिचित्रमुद्रण त्यांच्या मरणानंतरच प्रकाशित करण्यात आले.

Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

स्थितिशील वातावरणात एखादे मोठे पाऊल उचलणे हे धाडसच, पण वातावरण इतके स्थितिशील असते की, ते बदलण्यासाठी पुढले सारे प्रयत्नही या पहिले पाऊलवाल्यांनीच करावेत, असे समाजाला वाटते. ही पुढली अपेक्षा पूर्ण करणे मंडेलाकाळात उपाध्यक्ष, पुढे विरोधी पक्षनेता अशी पदे धारण करणऱ्या डी. क्लर्क यांना जमले नाही.

फ्रेडरिक विल्यम (जन्म १९३६) यांचे वडील जान डी क्लर्क हेही दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. कुटुंब सधन. वकिलीच्या शिक्षणानंतर घरचेच उद्योग सांभाळून, वडिलांच्या उतारवयात आणि स्वत:च्या चाळिशीनंतर तेही राजकारणात आले. लगेच (१९७८ पासून) विविध मंत्रिपदे त्यांना मिळत गेली. वर्णद्वेषी राष्ट्राध्यक्ष पी. डब्ल्यू. बोथा यांचे ते सहकारी ठरले. मात्र १९९० मध्ये स्वत: राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. ‘गोऱ्या समाजालाही त्यांनी पुरेसे बदलायला हवे’ – अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होत राहिली, त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर आदरांजली वाहण्यासही जग कचरले.