‘महात्मा’ ठरण्याआधी मोहनदास करमचंद गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वास्तव्यात झालेल्या तिघा पुत्रांपैकी सर्वात शेवटचे रामदास गांधी (१८९७-१९६९) यांना तीन अपत्ये झाली :  थोरली मुलगी सुमित्रा (आता कुलकर्णी), मुलगा कान्हा ऊर्फ कनु आणि मुलगी उषा (आता गोकाणी). यापैकी कान्हा गांधी म्हणजे कनु गांधी. त्यांचे निधन सोमवारी विकल आणि विपन्न अवस्थेत झाले, म्हणून त्यांच्याकडे लक्ष गेले. या निधनवार्तेनंतर ‘कनु गांधी’ या नावाभोवतीचे गूढ उकलणे आणि काही नव्या गूढ-प्रश्नांना सामोरे जाणे हे इतिहासकारांपुढचे आव्हान ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दांडीयात्रेच्या छायाचित्रात दिसले आणि पुढे स्वत:देखील छायाचित्रकार झाले, ते कनु गांधी हेदेखील गांधीजींच्या तिसऱ्या पिढीतलेच, परंतु चुलत नातू.. त्यांचा जन्म १९१७ आणि मृत्यू १९८६ सालात झाला व भारतच काय, साबरमती आणि राजकोटचे आश्रम सोडून ते कनु गांधी कोठेही वास्तव्यास नव्हते. या चुलत घराण्यातील कनु यांचे तपशील अनेकदा (विकिपीडियावरही) कान्हा ऊर्फ कनु गांधी यांच्याशी जोडले जातात. वास्तविक दोन्ही कनु गांधी वेगवेगळे आहेत, हे ‘महात्मा गांधींचे नातू’ म्हणून लाइक-शेअर- फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात फार कोणी लक्षात घेत नाही.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanu gandhi
First published on: 09-11-2016 at 04:27 IST