आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणाची, आपली काळजी घेतली जाण्याची गरज निश्चित असते. तेथे पैसा, मालमत्ता काहीही उपयोगी पडणार नाही याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवणे ही काळाची गरज बनलेली आहे. प्रत्यक्ष तिथे जाणे ही वेगळी गोष्ट, पण जाण्याची मानसिकता तयार करायला सुरुवात केली तर सर्व परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात होते हे नक्की.

नागरिकांच्या अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांना जेव्हा मी जाते तेव्हा आवर्जून प्रश्नोत्तरासाठी वेळ राखून ठेवते. कधी कधी तर पूर्ण वेळ प्रश्न आणि उत्तर या स्वरूपाचाही कार्यक्रम असतो. हा वेळ माझ्या दृष्टीने फार मोलाचा ठरतो. कारण त्यातून माणसे कळतात. त्यांचे मन जाणता येते. या सर्व कार्यक्रमामध्ये हमखास ‘वृद्धाश्रम’ याविषयी एखादा तरी प्रश्न येतोच. सर्वसामान्यत: वृद्धांच्या समस्यांचे उत्तर ‘वृद्धाश्रम’ आहे अशी भावना आढळते.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

त्याचबरोबर ‘वृद्धाश्रम’ म्हटले की ‘टाकले’ हा शब्द एकावर एक शब्द फ्री असावा इतक्या सहजपणे येतो. कधी प्रकट तर कधी मनातल्या मनात! खूप विचार केला तर याचे कारण फक्त एकच जाणवते की, पूर्वी केवळ निराधार किंवा आíथकदृष्टय़ा विपन्नावस्था हीच असा आसरा शोधण्याची कारणे असायची. त्यामुळे वृद्धांची कटकट मिटवण्याचा ‘वृद्धगृहे’ हा मार्ग असल्याने ‘टाकले’ म्हणजे पुन्हा संबंध नाही ही भावना त्यामागे होती. ती ‘वृद्धगृहे’ असत, वृद्धाश्रम नसत.

पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. वृद्धांच्या समस्यांचे स्वरूप आणि व्याप्ती बदलते आहे. अशा वेळी ‘वृद्धाश्रम’ – वृद्धांसाठी सुखावह ठरेल अशी निवास व्यवस्था याची नितांत गरज आहे, हे निश्चित आहे. ही गरज का निर्माण होते किंवा झाली आहे याचा विचार अगदी तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, अतिवृद्ध प्रत्येकानेच केला पाहिजे. विशेषत: अविवाहित आणि मुले नसणाऱ्या जोडप्याने तर हा विचार खूप आधीपासून केला पाहिजे. आयुष्यभर समाजासाठी किंवा स्वत:च्या कुटुंबासाठी अगदी तन- मन- धन अर्पण केलेल्या अविवाहित व्यक्तीने आपण ज्यांच्यासाठी केले ते आपल्यासाठी काही करतील या भ्रमात मुळीच राहू नये. वेळ आल्यावर समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल काही वाटायला ती नाती रक्ताची आणि म्हणून कायद्याने बंधनकारक असणारी कधीच नसतात, हे सत्य मी माझ्या प्रवासात भेटलेल्या अनेक सेवाभावी व्यक्तींच्या बाबतीत अगदी जळजळीतपणे समोर आलेले पाहिलेले आहे. अशा एकटय़ा अविवाहित व्यक्तीने धडधाकट असतानाच स्वत:चा निर्णय घेऊनच वृद्धाश्रमाचा विचार जरूर केला पाहिजे. ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च केले त्या व्यक्ती वाईट असतात असेही नव्हे, पण त्यांना त्यांच्या मर्यादा असतातच हे मात्र खरे.

मुले असणाऱ्यांनाही परिस्थितीनुसार वृद्धाश्रमाची गरज पटू शकते. मुले असली तरी ती प्रथम गावातून शहरांत आणि परदेशात जातात. मुलगी, सून दोघेही नोकरी-व्यवसाय करतात अशांचे प्रमाण मोठे आहे. पूर्वीप्रमाणे २-३ पिढय़ा एकत्र राहत नाहीत, पण पिढय़ा तर आहेतच ना? ६५ वर्षांच्यांना ८५-९० वर्षांच्या स्वत:च्या आईवडिलांची काळजी घेण्याबरोबरच आपल्या नातवंडांची, परदेशी गेलेल्या मुलांच्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. एकुलता एक मुलगा व मुलगी असेल तर त्याचे व तिचे आई-वडील शिवाय एखादा काका, आत्या, मावशी अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कधी कधी दोघांपैकी एकाने आई-वडिलांची; तर दुसऱ्या नातवंडांची जबाबदारी पार पाडत फाटाफूट करत राहावे लागते. मुलांचे विश्व आणि प्राधान्यक्रम वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत मुले आणि दोघेही तडजोड करून राहायच्या मनोवृत्तीत नाहीत, हे लक्षात येते. तरीही वृद्धाश्रमात आई-वडील असणे यामुळे मुलांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते.

ज्येष्ठांनाही एकत्र राहण्यामध्ये खूप मनस्ताप सहन करावा लागत असला तरी मुलांना लोक दूषणे देतील म्हणून ते वृद्धाश्रमाचा विचार करत नाहीत. परिणामी ‘समाज’ नावाच्या अदृश्य शक्तीच्या प्रभावामुळे दोघेही समस्येची सोडवणूक करायच्या दृष्टीने पावले उचलत नाहीत. यासाठी दोघांनीही मोकळ्या मनाने चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे.

स्वत:च्या घरात राहण्याइतके सुख कशात नाही हे अगदी खरे आहे, पण घर म्हणजे जागा, दगड, विटा, खोल्या, घरातल्या वस्तू या साऱ्याचा मालक असण्याची भावना की त्यापेक्षाही काही जास्त, काही वेगळे, काही मौल्यवान असे असते? माणसांनी घर बनते. घर भावनिक आधाराने बनते. घरात माणसे नसतील तर आपल्याला घरात राहताना एकटे नव्हे एकाकी वाटत असेल, आपल्याला काही झाले तर कोण येईल धावून? अशी चिंता लागून राहत असेल तर त्यात कोणत्या सुखाचा अनुभव येतो? याचा विचार केला पाहिजे.

आठ खोल्यांचा मोठा बंगला असलेल्या एका आजोबांना एका आजींनी आमच्या ‘सनवल्र्ड वृद्धाश्रमा’त ठेवले आणि त्या लगोलग परत गेल्या. आजोबा बरेच आजारी होते. त्यांना उठतापण येत नव्हते. त्या आजी नंतर ८-१० दिवस झाले तरी बघायलाही आल्या नाहीत. त्यांना शेवटी फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या, ‘अहो मला येणे शक्यच नाही!’ आम्ही एकदम विचारात पडलो, काही बरे वाटत नाहीये का? त्यांना विचारले. त्यांची काळजी वाटली. त्यावर त्या म्हणाल्या, ‘अहो, आमचा बंगला झोपडपट्टीच्या जवळ आहे. घरी कोणी नसले तर लोक येऊन नासधूस करतील. मला घर अगदी सोडता येत नाही हो!’ घराच्या मोहात पडून आयुष्य काटय़ाकुटय़ांचे बनवणाऱ्या किमान डझनभर व्यक्ती मला माहिती आहेत. अगदी खूप पै पै करून बांधलेल्या, घेतलेल्या घरातली भावनिक गुंतवणूक कळते, पण ते घर आपण राखतो त्यासाठी आपलं आयुष्यही धोक्यात घालतो, त्याचा फायदा कोणाला होणार आहे, तर ज्यांनी तुम्हाला एकटे सोडले आहे त्याला – हा विचार आपण कधी करणार?

आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणाची, आपली काळजी घेतली जाण्याची गरज निश्चित असते. तेथे पैसा, मालमत्ता काहीही उपयोगी पडणार नाही याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवणे ही काळाची गरज बनलेली आहे. प्रत्यक्ष तिथे जाणे ही वेगळी गोष्ट पण जाण्याची मानसिकता तयार करायला सुरुवात केली तर सर्व परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात होते हे नक्की.

अर्थात, जेथे जायचे त्याची ‘निवड’ केली पाहिजे, ती समंजसपणे केली गेली पाहिजे. अचानक रागावून प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे केलेली नसावी. केवळ स्वत:चा अहंभाव जपण्यासाठी करू नये. मुलांच्या मित्र-मैत्रिणींचाही विचार घ्यावा. निवड कशी करावी यासाठी काही गोष्टी विचारात घ्याव्यात. आपली प्रकृती, त्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सोयी, जेवणाचा प्रकार मांसाहारी/ शाकाहारी, वृद्धाश्रमातल्या सोयी, भरावे लागणारे शुल्क, अनामत रक्कम, वृद्धाश्रमचालक याचा विचार करून निर्णय घ्यावा. इतकेच नव्हे तर चार-दोन संस्थांमध्ये किमान ८ दिवस तरी राहून पाहावे. सामान्यत: जेथे गेल्यावर नजरेत भरण्याइतकी स्वच्छता, हवा, उजेड भरपूर असणारी इमारत आणि जेथे तुम्हाला राहणाऱ्या रहिवाशांशी एकटय़ाने बोलू दिले जाते ते वृद्धाश्रम निवडण्यास हरकत नाही.

सध्या अनेक व्यक्ती, छोटय़ा-मोठय़ा संस्था या क्षेत्रात उतरल्या आहेत, उतरू पाहत आहेत ही एका अर्थाने चांगली गोष्ट असली तरीही ते सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी लागत नाही, कोणत्याही ज्ञानाची पूर्वअट नाही, आकारले जाणारे दर आणि सोयी यावर कोणाचेही बंधन नाही, अशा परिस्थितीत वृद्धनिवासाची निवड सावधपणे करणे नक्की आवश्यक आहे. सामाजिक उत्तरदायित्व मानणाऱ्या संस्थांनी शासनाकडे वृद्धाश्रमासाठी नियमावली करण्याची, मागणी करण्याची गरज आहे हे मी अत्यंत आग्रहपूर्वक येथे नमूद करू इच्छिते.

वृद्धाश्रमात जाणे म्हणजे कुटुंब सोडणे किंवा तोडणे नसून कुटुंब विस्तारित करणे असते. तेथे गेले तरी नियम, पथ्ये आणि मर्यादा पाळणे आवश्यक असते. वृद्धांसाठी फक्त वृद्धाश्रम हाच पर्याय आहे असे नाही, पण हा एक प्रमुख पर्याय आहे. इतर पर्यायांबद्दल पुन्हा कधी तरी..

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com