07 December 2019

News Flash

सत्पात्री दान : दानाचा अखंड यज्ञ

षध कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे आपल्या वडिलांची, गोिवद कारे यांची आठवण सांगत होते.

स्वकर्तृत्वानं औद्योगिक जगतात आपला ठसा उमटवणारे ‘इंडोको रेमेडीज’ या औषध कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे यांच्यावर समाजाचे ऋण फेडण्याचे संस्कार बालवयातच झाले. १९९७ पासून सुरेश कारे आपल्या ‘कारे फाऊंडेशनच्या’, माध्यमातून कोटय़वधी रुपयांचे दान देत आहेत. यासाठी त्यांनी निवडलेली दोन प्रमुख क्षेत्रं म्हणजे शिक्षण व आरोग्य.
ल्ल संपदा वागळे

‘लहान असताना मला कधी एकदा शाळा सुटतेय आणि मी वडिलांच्या औषधांच्या दुकानात जाऊन त्यांना मदत करतोय, असं होऊन जाई. एकदा असंच दुकानात काही-बाही करत असताना वडील बाहेरून आले, तेव्हा त्यांना संपूर्ण काळ्या कपडय़ातील एक ख्रिश्चन गृहस्थ तिथं बसलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरूनच त्यांच्या लक्षात आलं कीतो घरातल्या कुणा दगावलेल्या रुग्णाची औषधं परत करायला आला असणार. दुकानातली नोकर-माणसं त्याच्याकडे लक्ष देत नव्हती, हे पाहून त्यांनी एकाला ओरडूनच सांगितलं, ‘आधी त्याचे पसे परत दे. मग इतर कामे कर.’ नडलेल्या माणसाची दखल घेणारा वडिलांच्या स्वभावाचा हा पलू माझ्या मनावर कायमचा कोरला गेला..’
स्वकर्तृत्वानं औद्योगिक जगतात आपला ठसा उमटवणारे ‘इंडोको रेमेडीज’ या औषध कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे आपल्या वडिलांची, गोिवद कारे यांची आठवण सांगत होते. ते म्हणाले, ‘कुणी रात्री-अपरात्री जरी औषधासाठी आलं तरी ते दुकान उघडून त्यांना हवं ते देत. समाजाचं ऋण फेडण्याचे संस्कार असे माझ्यावर बालवयातच झाले. त्यामुळेच या उद्योगात उतरण्याचा निर्णय मी घेतला तेव्हाच ठरवलं की, लोकांच्या जीवन-मृत्यूशी जवळचा संबंध असलेल्या या व्यवसायाचं पावित्र्य जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि हीच जाणीव आता आमच्या संपूर्ण ‘इंडोको’ परिवारातही रुजलीय याचा मला अभिमान वाटतो.

एकूण नफ्यातील दोन टक्के वाटा समाजकार्यासाठी द्यायचा हा कायदा अलीकडे म्हणजे दोन वर्षांपूर्वी आला. पण त्या आधीच म्हणजे १९९७ पासून सुरेश कारे आपल्या ‘कारे फाऊंडेशन’च्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचे दान देत आहेत. यासाठी त्यांनी निवडलेली दोन प्रमुख क्षेत्रं म्हणजे शिक्षण व आरोग्य.

११ जुल २००६ या दिवशी मुंबईच्या लोकलगाडय़ांतून जे बॉम्बस्फोट झाले त्यात २०० जणांना आपले जीव गमवावे लागले. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या स्फोटात मरण पावलेल्यांच्या मुलांचं शिक्षण अपूर्ण राहू नये या हेतूने फाऊंडेशनने एक योजना तयार केली. त्यानुसार अशा प्रत्येक मुलाला शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. त्यामुळे सुमारे पन्नास मुलांना स्वाभिमानानं आपल्या पायांवर उभं राहता आलं. कारे कुटुंबीय मूळचे गोवेकर असल्याने सुरेश कारे यांना आपल्या मायभूमीबद्दल विलक्षण प्रेम आहे. तिथल्या विविध संस्थांशी ते या ना त्या रूपाने जोडले गेले आहेत. ‘गोमंत विद्यानिकेतन’ ही त्यापकीच एक. या संस्थेचं सुसज्ज वातानुकूलित सभागृह बांधण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिलीय.

‘स्नेहमंदिर’ हा गोव्यामधील फोंडा तालुक्यातील बांदोडा परिसरात हिरवाईने नटलेला वृद्धाश्रम. सुरेश कारे या स्नेहमंदिरचे सक्रिय अध्यक्ष आहेत. १९८२ मध्ये जेव्हा स्नेहमंदिराची संकल्पना निश्चित झाली तेव्हांपासून ते या उपक्रमाशी निगडित आहेत. पायाभरणीच्या कार्यक्रमाला कुसुमाग्रज, पु.लं. अशा दिग्गजांचे आशीर्वाद लाभले. त्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. इथल्या आखीव-रेखीव टुमदार वास्तू बांधण्यासाठी त्यांनी भरीव दान दिलंय. शिवाय इथं राहणाऱ्या ज्येष्ठांना हे घर आपलंसं वाटावं यासाठी त्यांनी ‘दि गोवा िहदू असोसिएशनच्या’ रामकृष्ण नायक यांच्यासह अनेक उपक्रम राबवलेत.

आस्थापूर्वक केलेल्या या परिश्रमांमुळे सुरुवातीला या संकल्पनेला नाकं मुरडणारे टीकाकार आता स्नेहमंदिरचे गोडवे गाऊ लागलेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या मडगांव शहराचा जो कायापालट सुरू आहे त्यासाठीही फाऊंडेशनने निधी दिलाय. कारे यांना लहान मुलांची विलक्षण आवड. त्यातही निराधार मुलांकडे त्यांचा विशेष ओढा. त्यामुळे अनाथाश्रमांना मदत करण्यासाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. फक्त पशांचीच मदत नव्हे तर या मुलांसाठी ते आपला वेळही देतात. त्यांच्याशी बोलतात, खेळतात. कारे फाऊंडेशनने दिलेल्या भरभक्कम आधारामुळेच सायली राणे ही मुंबईची राष्ट्रीय पातळीवरची मध्यमवर्गीय बॅडिमटनपटू आज जागतिक नामांकन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देशात खेळू शकतेय.
कारे यांची जीवनमूल्यं ‘इंडोको’ परिवारानेही आपलीशी केलीयेत. याचा दृश्य परिणाम म्हणजे हिमाचल प्रदेशातील बद्दी गावांत जिथे त्यांचा कारखाना आहे तिथल्या कर्मचाऱ्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमांतून तिकडच्या सरकारी प्राथमिक शाळेचं रूप पार बदलून टाकलंय. नवीन वर्ग, शाळेभोवती कुंपण बांधून दिलंय. कोल्हापूरच्या ‘चेतना अपंगमती विकास संस्था’ या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला त्यांच्या शाळेसाठी एक स्कूल बस देणगी म्हणून दिलीय. मुलांची उपस्थिती तर वाढलीच आणि साहजिकच प्रगतीही. केवळ हिमाचल प्रदेशातच नव्हे तर गोवा, औरंगाबाद, मुंबई..जिथे जिथे इंडोकोचे कारखाने आहेत त्या भागातील शाळांना असाच मदतीचा हात देण्यात आलाय.

१०-१२ वर्षांपूर्वीची गोष्ट, औरंगाबादमध्ये ५ सेवाभावी तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन एका ध्येयाने डॉ. हेडगेवार यांच्या नावाने गोरगरिबांना अल्प मोबदल्यात वैद्यकीय सेवा देण्याचं ठरवलं. तेव्हा सुरेश कारे त्यांना भेटून तात्काळ ५ लाख रुपयांचा चेक देऊन आले. त्यानंतरही त्यांच्या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसाठी ५० लाख रुपयांची मदत दिली. ज्याचा लाभ असंख्य गोरगरीब रुग्ण घेत आहेत. समाजाचं ऋण मानणारे कारे आपल्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे जपतात. म्हणूनच तर विविध ठिकाणी साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत असूनही गेल्या ५० वर्षांत कोठेही कधीही कसलाही संप वा संघर्ष झालेला नाही.

शिक्षण व आरोग्य यांच्याबरोबर सामाजिक योगदान या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या संस्थांवरही कारे यांची मेहरनजर असते. ‘आम्ही गोयंकार’ ही संस्था तर त्यांच्या विशेष जिव्हाळ्याची. अलौकिक प्रतिभेचे चित्रकार कै. दीनानाथ दलाल हे सुरेश कारे यांचे सासरे. ते स्वर्गवासी झाल्यानंतर म्हणजे १९७१ पासून ‘दीपावली’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाची जबाबदारी सुरेश कारे यांनी मेहुणी प्रतिमा हिच्या मदतीने अंगावर घेतली. जयवंत दळवी यांचा भरभक्कम आधार होताच. पुढे पाच वर्षांनंतर ‘इंडोको’चा व्याप वाढल्यामुळे हे काम त्यांनी मॅजेस्टिक प्रकाशनाकडे दिलं. पण दीपावली निमित्ताने त्यांचा साहित्यिक जगताशी निकटचा संपर्क आला. अनेक लेखक, कवींशी मत्री झाली. कुसुमाग्रजांना भेटायला तर ते नाशिकला अनेकदा जात. कधी रात्रीचाही मुक्काम होई. रामकृष्ण नायक, मोहनदास सुखटणकर, अवधूत गुडे आणि सुरेश कारे अशा दर्दी चौकडीसमोर कविवर्यानाही स्फुरण चढे. रात्र मंतरलेली होऊन जाई. ‘दि गोवा िहदू असोसिएशनच्या’ नव्या नाटकांच्या वाचनाचा कार्यक्रमही अनेकदा कारे यांच्या घरी होत असे.

‘सायक्लोपाम’. ‘फेब्रेक्स प्लस’ या सारखी असंख्य औषधं ५५ देशांत निर्यात करणारी व तब्बल एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली ही कंपनी जेव्हा सुरेश कारे यांनी वडिलांच्या आग्रहाखातर हातात घेतली तेव्हा तिचा टर्नओव्हर होता फक्त तीन लाख रुपये. तेव्हा, म्हणजे १९६३ मध्ये. त्यांचं वय होतं २३-२४ वर्षांचं. परंतु १२-१३ व्या वर्षांपासून घरचं औषधांचं दुकान व्यवस्थित सांभाळणाऱ्या या मुलावर वडिलांचा प्रचंड विश्वास होता. म्हणूनच त्यांनी स्वत: स्थापन केलेली ही कंपनी मुलाच्या ताब्यात दिली आणि आपल्या गुणांवर त्यांनी कंपनीला यशोशिखरावर नेलं.
सुरेश कारे यांच्या या जीवनप्रवासात पत्नी अरुणा यांनी प्रत्येक पावलावर साथ दिली. आदिती आणि मधुरा या त्यांच्या दोन मुली. आदिती बी.फार्मनंतर अमेरिकेत मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन ‘इंडोको’ समूहात दाखल झाली तर मधुराने सी.ए. केलं.
आदिती कंपनीत यायला लागली तेव्हा वडिलांनी म्हणजे कारे यांनी तिला बजावलं, ‘तू माझी मुलगी असलीस तरी तुझं स्थान तुला कमवावं लागेल’. तिनेही हे आव्हान स्वीकारलं आणि विविध विभागांत अनुभव घेत ती २००४ मध्ये स्वकर्तृत्वावर कंपनीची संचालक बनली. आता सुरेश कारे यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडल्याने ‘इंडोको’ची धुरा मुख्यत्वे आदितीवर आहे. सुरेश कारे यांनी वडिलांकडून मिळालेला उद्योगाचा वारसा तर जपलाच, शिवाय दानाचा वसाही पुढे नेला. एकदा एक िपटो नावाचे एक गृहस्थ त्यांना भेटायला आले. म्हणाले, ‘मी मूळचा गोव्याचा. तुमचा जुना शेजारी. आता पोर्तुगालला असतो. आज मी जो काही आहे तो तुमच्या वडिलांमुळे. त्यांनी मदत केली नसती तर इंजिनीअिरगचे शिक्षण मला घेताच आलं नसतं.’
अगदी अस्साच प्रसंग काही वर्षांपूर्वी आदिती यांच्यासमोरही घडला. त्यांना भेटायला आलेल्या मुलीचं नाव शर्मिली सावंत. ‘कारे फाऊंडेशन’ स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची आस बाळगणाऱ्या या मुलीला तिकिटासाठी ५५-६० हजार रुपयांची मदत दिली होती. पुढे तिने तिथे डॉक्टरेट तर मिळवलीच शिवाय एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदाची जागाही. ती कृतज्ञतापूर्वक म्हणाली, ‘मला कारे सरांसाठी काही तरी करायचंय. त्यांचे उपकार मी कसे फेडू?’ यांवर दानाचा वारसा पुढे नेणाऱ्या काऱ्यांच्या तिसऱ्या पिढीचे शब्द होते, ‘आज ज्यांचं शिक्षण पशाअभावी थांबलंय त्यांना तुझा मदतीचा हात दे, जेणेकरून ही साखळी अशीच सुरू राहू दे..यानेच तू उतराई होशील आणि आम्ही समाधानी’.
वेबसाइट : www.indoco.com
wagle.sampada@gmail.com

First Published on October 24, 2015 1:01 am

Web Title: chairman managing director of indoco remedies limited suresh kare
Just Now!
X