अमेरिकेतील मॅनहटनमध्ये जन्म झालेल्या नेमेथ यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यासाठी त्यांनी ब्रेल लिपितील संगीताची पुस्तेक वाचून स्वत:ला पियानो वाजवण्यात पारंगत केले. पण संगीतापेक्षा त्यांचे मन गणितात जास्त रमले. पण नुसती गणिताची आवड असून भागत नव्हते. गणित म्हणजे चिन्हांचा महापूर! त्यात गद्य कमी तर संख्या आणि चिन्हांचा भडिमार अधिक. ब्रेल लिपीत मात्र जास्त करून भाषेचा विचार केला. त्यामुळे त्या लिपीत गणित शिकताना शिकणे कमी आणि गोंधळ अधिक अशा प्रकार होता. अशा परिस्थितीत व्यक्तीची शिकण्याची आवडच आटू लागायची! पण डॉ. नेमेथ यांना यातून काही मार्ग निघेल याचा विश्वास होता.
‘गरज ही शोधांची जननी असते’ ही म्हण संशोधन क्षेत्राला आधार मानायला हवी. माणसाची गरज जितकी निकडीची तितकीच त्याची संशोधनाची जिद्द पराकोटीची. उदाहरण द्यायचे झाले तर डोळस माणसांच्या तुलनेत दृष्टिहीन माणसांच्या गरजा खूपच अधिक. पण या कुचंबणेतूनच अंधांनी अंधांसाठी दीपस्तंभासारखे संशोधन पार पाडले आहे आणि ‘हम किसी से कम नही’ हे परावलंबित्व झुगारून दाखवून दिले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लुई ब्रेल या सोळा वर्षांच्या अंध तरुणाचे ब्रेल लिपी संशोधन करून जगभरच्या दृष्टिहीन व्यक्तींना ज्ञानाचा मार्ग खुला करून दिला तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अब्राहम नेमेथ या अमेरिकन अंध तरुणाने गणितासारख्या गहन विषयाच्या आत्यंतिक आवडीतून ‘नेमेथ कोड’ विकसित केले आणि अंध व्यक्ती आपली गणितातील प्रतिभा इतरांसारखीच विकसित करू शकते हे आपल्या उदाहरणाने दाखवून दिले. नेमेथ यांचे संशोधन वैशिष्टय़पूर्ण अशासाठी ठरते की एका बाजूने त्यांनी आपल्या वैयक्तिक अडचणींवर मात केली आणि दुसऱ्या बाजूने विज्ञानाच्या अद्ययावत पातळीवर जाऊन आपले प्रभुत्व सिद्ध केले. ते नुकतेच वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी मिशिगन इथे निधन पावले. डॉ. नेमेथ यांचे जीवन आणि त्यांनी प्रस्थापित केलेले संशोधन दोन्ही सर्वसामान्यांना प्रेरणा देणारे आहे.
अमेरिकेतील मॅनहटनमध्ये जन्म झालेल्या नेमेथ यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यासाठी त्यांनी ब्रेल लिपितील संगीताची पुस्तेक वाचून स्वत:ला पियानो वाजवण्यात पारंगत केले. पण संगीतापेक्षा त्यांचे मन गणितात जास्त रमले. पण नुसती गणिताची आवड असून भागत नव्हते. गणित म्हणजे चिन्हांचा महापूर! त्यात गद्य कमी तर संख्या आणि चिन्हांचा भडिमार अधिक. ब्रेल लिपीत मात्र जास्त करून भाषेचा विचार केला. त्यामुळे त्या लिपीत गणित शिकताना शिकणे कमी आणि गोंधळ अधिक अशा प्रकार होता. अशा परिस्थितीत व्यक्तीची शिकण्याची आवडच आटू लागायची! पण डॉ. नेमेथ यांना यातून काही मार्ग निघेल याचा विश्वास होता.
प्रथम त्यांनाही इतरांनी परावृत्त करायचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणजे त्यांनी १९४२ साली मानसशास्त्राची मास्टर्सची पदवी मिळवली! पदवीमुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. पण गणिताची ओढ काही सुटली नाही. गणिताची भाषा ब्रेल लिपीत सिद्ध करण्यासाठी त्यांनी ब्रेल लिपीच्या सहा ठिपक्यांच्या घरांची चिन्हानुरूप निरनिराळी जुळवाजुळव करायला सुरुवात केली. त्या प्रयत्नातून गणिताच्या चिन्हांची एक वेगळी भाषा बनवली. शिपिंग खात्यात नोकरी करता करता ती भाषा परिपूर्ण केली. चिन्हात बेरीज वजाबाकीच्या चिन्हांखेरीज भूमिती, त्रिकोणमिती, कॅलक्युलस इ. गणितांच्या शास्त्रात लागणाऱ्या चिन्हांचा त्यांनी समावेश केला. नेमेथ यांनी १९५२ मध्ये अधिकृतरीत्या सादर केलेले नेमेथ कोड नंबर १९५६, १९६५ आणि १९७२ मध्ये विस्तारत गेले. १९९२ मध्ये पूर्ण विकसित परिभाषा इंग्लिश ब्रेल भाषेचे एक अंग बनले.
त्यांनी सुरुवातीला आपल्या चिन्हांची भाषा मित्रांना वापरून पाहायला सांगितली आणि तिचा प्रचार वाढू लागला. १९५५ पर्यंत ती राष्ट्रीय स्तरावर आणि क्रमिक पुस्तकात समाविष्ट झाली. १९५५ मध्ये डेट्रॉइट विद्यापीठाने त्यांना गणिताची प्राध्यापकी दिली. त्यात त्यांचे काम होते डोळस विद्यार्थ्यांना फळ्यावर खडूने लिहून शिकवण्याचे! ते अंध असूनही प्रयत्नांनी सरळ ओळीत लिहायला शिकले. त्यांची तल्लख स्मरणशक्ती लिहिताना कामी यायची. आपल्या लिहिण्याच्या पहिल्या प्रयत्नाबद्दल लिहिताना ते मजेने सांगतात ‘की माझी पहिली ओळ माझ्या डोक्याच्या पातळीवर संपायची, दुसरी माझ्या डोळ्यांच्या पातळीवर, तिसरी हनुवटीच्या पातळीवर तर चौथी छातीच्या पातळीवर- पातळी अशी घसरतच जायची!’
गणितात पारंगत होऊन डॉ. नेमेथ यांना डेट्राइटच्या वायने स्टेट युनिव्हर्सिटीकडून गणितातील डॉक्टरेट पदवी मिळाली. १९६० पासून त्यांनी संगणकशास्त्र शिकायला सुरुवात केली आणि आपल्या अनुभवाच्या आधारावर विद्यापीठात संगणक शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. १९८५ साली ते सेवानिवृत्त झाले. नंतर दोन वर्ष ते मिशिगन राज्याच्या अंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.
आपल्या फावल्या वेळात ज्यू धर्माच्या पुस्तकांच्या ‘ब्रेल आवृत्त्या’ काढायचा व्यासंग त्यांनी चालूच ठेवला. छंद म्हणून ‘मॅथस्पिक’ ही गणित शिकवण्याची पद्धत शोधून काढली. इलिनॉथ युनिव्हर्सिटीतील अंधांचे  प्रोफेसर आणि नेमेथ यांचे अनुयायी असलेले डॉ. केरी सुपालो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात की, ‘नेमेथ यांनी अंधांसाठी गणिताचा पाया घातला नसता तर कदाचित मी विज्ञानाकडे आलोही नसतो.’ त्याचप्रमाणे अमेरिकेच्या ‘नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड’चे अध्यक्ष डॉ. मार्क मोरेर हेही नेमेथ यांना असंख्य अंध बांधवांच्या जीवाचा कायापालट केल्याचे श्रेय देतात. त्यांच्यामुळेच अनेक अंधांना विज्ञान, तंत्रज्ञान, स्थापत्य आणि गणितात भरीव कामगिरी करता आली हे नमूद करतात. त्यांच्या अशाच एक चाहत्या मिस रश यांच्या मते त्यांच्या तंत्राने अंधांसाठी निरनिराळी उपकरणे (अॅपस )तयार झाली. डॉलर्सच्या चलनी नोटा सहज मोजता येऊ लागल्या. एकंदरीतच अंधांना त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता आले.
डॉ. अब्राहम नेमेथ यांच्या कोड व्यतिरिक्त दुसऱ्या दोन गणितज्ञांनी अजून एक कोड विकसित केले. ओरेगॅन स्टेट युनिव्र्हसिटीच्या नॉर्बटरे सलिनास यांनी जॉन गार्डनर या सहकाऱ्याच्या मदतीने जीएस ८ या नावाने कोड १९६० मध्ये विकसित केले. या कोडमध्ये सहा डॉटच्या ब्रेल लिपीतील घरांऐवजी आठ डॉट्सचा वापर केला गेला. या बदलामुळे वर्णाक्षरांच्या संख्येत चौपटीने भर पडली. त्यांनी नवीन सुधारणा केल्या असल्या तरी नेमेथ कोडचा वापर बऱ्याच जणांच्या वळणी पडल्याने हे कोड पुढे येऊ शकले नाही.
अमेरिकेत सध्या जवळजवळ एक कोटी व्यक्ती अंध आहेत. अॅपल कंपनीच्या तंत्राने आधुनिक स्मार्टफोन, बोटांच्या स्क्रीनवरील हालचालीने वेगवेगळ्या आज्ञा व्यक्ती देऊ शकते. सपाट स्क्रीनचे हे फोन स्पर्श व ध्वनी यांच्या सहाय्याने अंधांचे चोवीस तासाचे साथी बनणार आहेत. आयफोनने ब्रेल लिपीतील चाळीस ब्ल्यू टूथ की-बोर्ड्स तयार केले आहेत. आगामी काळात शेकडो अॅप्स अंधांना उपलब्ध होणार आहेत. दृष्टिहीनतेची न्यूनता इतर जाणिवांनी बरीच भरून निघणार आहे. भविष्यात आजची अंध व्यक्ती तंत्रांच्या सहाय्याने केवळ गणितातच काय कुठल्याही क्षेत्रात डोळसांशी स्पर्धा करायला सज्ज होणार आहे.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
art
कलाकारण: इथं नव्हतं आरक्षण; तरी दिसलेच गुण!
Cheistha Kochhar Accident
लंडनमध्ये PHD करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनी चेइस्ता कोचर यांना ट्रकने चिरडलं, अपघातात मृत्यू