आतापर्यंत मानवाने अंतराळात खूप दूरवर मुसंडी मारली आहे. आज तो अवकाश स्थानकात महिनोन् महिने राहतोय, त्याने चंद्र केव्हाच पादाक्रांत केलाय, उल्का, अशनी, धूमकेतू, निरनिराळे ग्रह आणि त्यांचे उपग्रह, सूर्य, अवकाशातील आकाशगंगा, निरनिराळे तारे, त्यांच्या भोवती फिरणारे ग्रह याबाबत त्याला बरीच माहिती झाली आहे, तो अवकाशाच्या पोकळीत कित्येक प्रकाशवर्षे दूपर्यंत पाहू शकतो. आज तो मंगळावर जाऊन तेथे वसती करण्याचे स्वप्न पाहातोय, पण ज्या पृथ्वीवर तो राहातोय त्या पृथ्वीच्या अंतरंगाबाबत त्याला फार कमी माहिती आहे.
याचे कारण उघड आहे. अवकाशातील संशोधन करण्यासाठी त्याच्यासमोर आकाश उघडे आहे. तर पृथ्वीचे कठीण कवच, मॅग्माचे उकळते व अतिशय घनता असलेले  मँटल तर अतिशय घन, अती तप्त आणि घट्ट असलेले कोअर हे अडथळे त्याच्यासमोर आहेत. या भागाचे प्रत्यक्ष नमुने प्रयोगशाळेत तपासण्याकरता त्याच्याजवळ उपलब्ध नाहीत, म्हणून त्याला पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत फार कमी माहिती आहे. आणि सध्या त्याला जी माहिती आहे ती तर्क, अंदाज यावर आधारलेली आहे.
आजपर्यंत पृथ्वीच्या अंतरंगाचा मानवाचा जो अभ्यास झालेला आहे तो त्याच्यासमोर उघडे असलेले भूपृष्ठ, अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या उल्का व अशनी, चंद्रावरून आणलेले दगड, माती, भूकंप, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या मॅग्मा बरोबर भूपृष्ठावर फेकले जाणारे पेरिडोटाइट, पिकट्रीट सारखे दगड आणि भूकंप लहरी  यावर आधारलेला आहे.
वरीलपैकी भूकंप लहरीमुळे त्याला पृथ्वीच्या अंतरंगाबाबत बरेच अंदाज बांधणे शक्य झाले. भूकंप लहरीमध्ये प्राथमिक व दुय्यम लहरी अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्राथमिक लहरी या कोणत्याही माध्यमातून (घन, द्रव, वायू) वेगाने प्रवास करतात. या लहरींचे वेग पदार्थाची घनता, त्याचा लवचिकपणा, उष्णता व थंडपणा यावर अवलंबून असतो.
पृथ्वीचे कवच (क्रस्ट ) हे खडकांचे बनलेले असून त्याची सरासरी जाडी ६० कि.मी. आहे. हे भूकवच युरोपमधील कॅलिफोर्निया या शहराजवळ २० कि.मी. जाडीचे तर आपल्या हिमालय पर्वताखाली ते ७० कि.मी. जाडीचे आहे. क्रस्टच्या वरच्या थराला लिथोस्पियर   म्हणतात तर एवढय़ाच जाडीचा याच्याखाली असलेला अॅस्थेनोस्फिअर  चा थर आहे. या थरातील खडक मात्र अती तप्त, अर्धे घट्ट व काही प्रमाणात लवचिक असे आहेत.
मधला भाग आहे तो मँटलचा. याचेही असे अप्पर मँटल व लोअर मँटल असे दोन भाग पडतात. येथ ेमॅग्मा ओतीव स्वरूपात असून तो सारखा घुसळत असून दीर्घवर्तुळाकार फिरत असतो.
तिसरा थर हा कोअरचा आहे. पृथ्वी जेव्हा पूर्णपणे ओतीव मॅग्माच्या स्वरूपात होती तेव्हा सिलिकेट्स आणि ऑक्साईड्स स्वरूपातील पदार्थ वर राहिले व जड असे लोखंड, निकेल यांसारखे धातू केंद्रभागी गेले. त्यामुळे कोअर अतिशय तप्त, अति घनता असलेले झाले आहे. या कोअरचे देखील बाहेरचा व आतील असे दोन भाग पडतात. त्यापैकी बाहेरच्या भागाचे तापमान साधारणत: ७६०० फॅरनहीट तर आतील भागाचे चे तापमान १३००० फॅरनहीट असते.
आज मानवाला एवढे जरी माहीत झालेले असले तरी पर्वतांची निर्मिती कशी होते, पृथ्वीवरील भूखंड हे का सरकतात, पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र कशामुळे निर्माण झालेले आहे या आणि अशाच बाबतीत त्याला समाधानकारक कारणे सापडलेली नाहीत.
पण याचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले नाहीत किंवा होत नाहीत असे नाही. प्रयोगशाळेत तपासण्याकरता प्रत्यक्ष नमुने मिळविण्याचे प्रयत्न मात्र थांबलेले नाहीत. सगळ्यात अगोदर अमेरिकेने प्रोजेक्ट मोहोल हा प्रकल्प तज्ज्ञ भूगर्भशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विसाव्या शतकातील ७० च्या दशकात हाती घेतला. त्या काळी उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ग्वा डाल्युप  या बेटावर बोअरहोल घेण्याचे काम सुरू केले. उद्देश असा की भूगर्भातील खडकांचे प्रत्यक्ष नमुने तपासून पृथ्वीचे अंतरंग कसे आहे ते तपासावे. पण काही मीटपर्यंत ते बोअर होल घेऊ शकले. विविध अडचणीमुळे १९६६ साली त्यांनी तो प्रकल्प  रद्द केला.
त्यानंतर मात्र १९८० साली रशियाने कोला पेनिनसुला च्या भूभागावर बोअर होल घेण्याचे ठरवले. रशियन प्रयत्न मात्र खूप खोलवर जाऊ शकले. त्यांनी तब्बल १२ कि.मी. खोल बोअरहोल घेतला. हाही एक विश्वविक्रमच आहे. त्यानंतर तो प्रयत्नही सोडून देण्यात आला.
पुन्हा २०११ मध्ये रशियाने एक्सॉन जायंट प्रकल्पा अंतर्गत बोअरहोल घेण्याचा प्रयत्न केला. येथेही ते १२ कि.मी. पर्यंतच जाऊ शकले.
२००५ साली मात्र जपान विशेष तयारीनिशी बोअर होल खोदण्याच्या मोहिमेमध्ये उतरला. त्यासाठी जपान सरकारने एक अब्ज डॉलरची तरतूद या मोहिमेसाठी केली आहे. आणि संपूर्ण जगातील तज्ज्ञ भूगर्भशास्त्रज्ञांची टीम या मोहिमेसाठी नियुक्त केली आहे.
या कामी जपानने उत्कृष्ट अशा ड्रिलिंग मशिनरीची योजना केली आहे. आतापर्यंत बोअरहोल घेण्याचे प्रयत्न जमिनीवर करण्यात आले. जमिनीवर बोअरहोल घ्यायचे म्हटले तर कमीत कमी २० ते २५ कि.मी. खोल गेल्यानंतर  अप्पर मँटल पर्यंत पोहोचता येणे शक्य आहे हे स्पष्ट होते. पण खोल समुद्रतळापासून मँटल पर्यंतची जाडी सरासरी १० कि.मी. भरते. म्हणजे खोल समुद्रात ड्रिलिंग  करणे सोयीचे होईल. त्यातही प्रशांत महासागरामध्ये जेथे मिड ओशन रीज आहे तेथे मँटल पर्यंतची जाडी फक्त ६ कि.मी. भरते.मिड रीज ओशन  ही पृथ्वीतलावरील अशी भेग किंवा चर आहे जो उत्तरध्रुवापासून ते दक्षिण ध्रुव प्रदेशापर्यंत गेलेला आहे. ही भेग पूर्णपणे समुद्रतळातून गेलेली असून ती फक्त आइसलँड  या देशात जमिनीवरून गेलेली आहे. आजही ही भेग आइसलँड  येथील जमिनीवर स्पष्ट दिसते. ही भेग म्हणजे दोन  टेक्टॉनिक प्लेटस्च्या सीमारेषा आहेत. या प्लेटस् एकमेकींपासून सरकल्या की जमिनीअंतर्गत असलेला मॅग्मावर येऊन समुद्राच्या थंड पाण्याशी त्याचा संबंध येतो व त्याचे रूपांतर खडकात होते. या प्रदेशामध्ये भूपृष्ठाची जाडी मात्र ६ कि.मी. भरते. म्हणजे फक्त ६ कि.मी. पर्यंत बोअर होल घेतले म्हणजे टंल्ल३’ी पर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. याचा विचार करून २००५ पासून येथे बोअर होल घेणे सुरू झाले आहे.
अर्थात यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. १० कि.मी. खोलीपर्यंत जाता येईल असे उच्च क्षमता असलेले पाईप तयार आहेत.ड्रीलिंग बीटचा व्यास ३० से.मी. ठेवण्यात आला असून त्यासाठी उच्च प्रतीच्या पोलादाचा व मिश्र धातूचा वापर करण्यात आला आहे. पॅसिफिक समुद्रात अतिशय खोल पाण्यात ही खोदाई सुरू झाली असून त्यासाठी जपानच्या अती खोल समुद्रात खोदाई करणाऱ्या जहाजाचा वापर करण्यात येत आहे. जपानी भाषेत या जहाजाला चिक्यू हे नाव असून आतापर्यंत २.२ कि.मी. पर्यंत बोअरहोल घेऊन झाले आहे. हाही समुद्रांतर्गत बोअरहोल घेण्याचा विक्रमच आहे. या खोदाईत महत्त्वाची अडचण आहे ती खडक फोडण्याची. भूपृष्ठात जसजसे खोल जावे तसतसे हे खडक अतिशय कठीण होत जातात. मॅग्मा जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर भूपृष्ठावर येऊन पसरतो तेव्हा तो वेगाने थंड होतो. त्यामुळे बाह्य़भागी असणारे खडक कमी कठीण असतात. तर भूअंतर्गत जेव्हा  मॅग्माथंड होतो तेव्हा थंड होण्याच्या या क्रियेला काही महिन्यांपासून तर काही वर्षांपर्यंत कालावधी लागतो. त्यामुळे भूअंतर्गत असणारे खडक हे अतिशय कठीण असतात.ग्रॅनाइट हा भूअंतर्गत थंड होणाऱ्या खडकाचाच प्रकार आहे.)त्यामुळे एक बीट फक्त ५० ते ६० तासच काम करू शकते. याचा विचार केला तर मँटल पर्यंत जायला बरीच वर्षे लागतील हे स्पष्ट आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हायला २०२० हे वर्ष उजाडेल असा अंदाज आहे.
पण जेव्हा प्रत्यक्ष नमुने माणसाच्या हातात येतील व प्रयोगशाळेत त्यांचे परीक्षण होईल तेव्हा पृथ्वीच्या अंतरंगाचे एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहील.    
dharmraj_mahulkar@yahoo.in

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर