माहिती तंत्रज्ञान दिवस
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात पहिल्यांदा संगणक क्रांती ऐंशीच्या दशकात घडवून आणली. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची वाटचाल जोमाने झाली, त्यामुळेच आज भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिन माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
ज्ञान, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रात जर आपल्याला गती असेल तरच आज आपण या स्पध्रेच्या युगात मोकळा श्वास घेऊ शकतो. संगणकाने आपले माहिती तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरविले आहे असे प्रत्येकाच्या तोंडून ऐकावयास मिळते. परंतु प्रत्यक्षातही सामान्य माणूस त्याचा अनुभव घेत आहे. सगंणक सर्व कामे अचूक व कमी वेळात कसे काय करतात? असा प्रश्न उभा राहतो पण तेच त्याचे वैशिष्टय़ आहे.
माहिती तंत्रज्ञानात सर्वात महत्वाचे जाळे इंटरनेटचे आहे. आज त्याचा विस्तार फार मोठा आहे, त्यामुळे जग आपल्या मुठीत आल्यासारखे भासते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण इंटरनेटव्दारे जगातील कुठलीही माहिती व ज्ञान क्षणार्धात एक कळ दाबून मिळवू शकतो. आज शासकीय कामकाज देखील माहिती तंत्रज्ञानांवर आधारित आहे. शासन स्तरावरील सर्व सेवांचा लाभ जनतेला अतिशय चांगल्या प्रकारे देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आधार कार्ड-जनसामान्यांचा अधिकार, सेतू-सुविधा केंद्रे, इ-गव्हर्नन्स, इ- पंचायत, ग्राम सेवा केंद्र यासारखे माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प राबवले. आपल्या रोजच्या जीवनातील कामे अगदी सहज व सोप्या पध्दतीने करण्यास माहिती तंत्रज्ञान मदत करीत आहे.आज शैक्षणिक क्षेत्रात तर शिक्षकांना संपूर्ण अध्यापन संगणकाच्या व इंटरनेटच्या मदतीने अगदी सहज व प्रभावी स्वरूपात करता येते. थोडक्यात ते डिजिटल शिक्षणच आहे. विदयार्थ्यांनी देखील अशा डिजिटल शिक्षणाचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे
आज सर्वच प्रकारची माहिती इंटरनेटवरील गुगल, याहू  अशा विविध प्रकारच्या संकेतस्थळांमुळे सहज व अगदी काही मिनिटात मिळणे शक्य झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे आजच्या युगात एवढे घट्ट विणले गेले आहे की आता आपण सर्वस्वी त्यात गुरफटून गेलो आहोत. थोडक्यात आज संगणकाचे ज्ञान ज्यांना आहे त्यांनाच  साक्षर म्हणावे लागेल. माहिती तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. जेव्हापासून संगणकाने मत्रीचा हात दिला व आनंदाने आपण तो स्वीकारला तेव्हापासून या शतकात आपण ज्ञानविज्ञानात गरूडझेप घेतली आहे.
माहिती तंत्रज्ञान हे आधुनिक काळातील शस्त्र आहे परंतु आजही काही मंडळी वयोमानुसार संगणक शिकण्यास व माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यास घाबरतात त्यांना ते आपल्याला जमेल की नाही अशी भीती वाटते. काही चुकले तर काय होईल यासह अनेक प्रश्नात ते गुरफटले जातात. वास्तविक पाहता अशा प्रश्नांची उत्तरे देत देतच नवीन शिकण्याची जिद्द व चिकाटीनेच सामोरे जावे लागते.  यातून संगणकाचे व माहिती तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक स्वरूपातील ज्ञान जाणून घेणे अवघड नाही. अतिशय साध्या व सोप्या पध्दतीने आजही आपण संगणक हाताळण्याचे ज्ञान मिळवतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या गंमती जमती शिकू शकतो फक्त त्यासाठी इच्छाशक्ती हवी व आवडही हवी! खरंच तुम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या जाळयामध्ये एवढे रमून जाता, कि संपूर्ण जगच आपल्या सभोवती  सामावलेले आहे,याचा तुम्हांस अनुभव येतो. कोणत्याही प्रकारची कामे आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर ऑनलाईन पध्दतीने करू शकतो, मग ते रेल्वे, बस आरक्षण, नोकरीचे अर्ज, परिक्षा अर्ज, बँंकांचे रोखीचे व्यवहार, गॅस सिलेंडरची माहिती मिळवू शकतो.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन देवदर्शनासाठीदेखील माहिती तंत्रज्ञानातील बदल जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
सरकारनेही आता शाळा, महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठी अतिशय अल्पदरात मिनी लॅपटॉप दिले आहेत. ‘आकाश’ हा टॅबलेट देखील नवीन  तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होत आहे. अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा समावेश शिक्षण मंडळे व विद्यापीठांनी केलेला दिसत आहे. सोशल नेटवर्किंगचा संपूर्ण समाजात बोलबाला आहे. फेसबुक, ट्विटर, व इतर संवाद साधनाच्या संकेतस्थळांमुळे एक नवे आभासी जग तयार झाले आहे त्याचे नीतीनियमही वेगळे आहेत. राजकारण, समाजकारण यावर ते प्रभाव पाडत आहेत. स्मार्टफोनमुळे तर इंटरनेटचा वापर खूपच वाढला आहे त्याचा परिणाम म्हणून सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापरही वेगाने वाढतो आहे, त्यामुळे काळाबरोबर आपण राहिलो नाही तर त्याचा थोडाबहुत परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. मागच्या पिढीतील काहींना अजूनही या वेगाशी जुळवून घेणे जड जात असले तरी भारतातील नवीन पिढीने मात्र  या सगळ्याशी वेगाने जुळवून घेतले असे नव्हे तर त्यात कौशल्ये प्राप्त केली आहेत. त्यातून एक नवीन माहिती तंत्रज्ञान संस्कृती विकसित झाली आहे.
प्रा. गुरूप्रसाद चौसटे

PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी