News Flash

जगातील एकमेव अलबिनो गोरिलाचे रहस्य उलगडले!

जगातील एकमेव अलबिनो गोरीलाचे अनेक वर्षांपासूनचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, यामागे प्रजोत्पदनावेळी नेहमीपेक्षा वेगळ्या पांढ-या रंगाचा परिणाम असल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.

| June 19, 2013 11:13 am

जगातील एकमेव अलबिनो गोरीलाचे अनेक वर्षांपासूनचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, यामागे प्रजोत्पदनावेळी नेहमीपेक्षा वेगळ्या पांढ-या  रंगाचा परिणाम असल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.
जंगलात जन्मलेल्या स्नोफ्लेक नावाच्या नर वेस्टर्न लोलॅन्ड गोरिलाला १९६६ मध्ये इक्वाटोरीअल गुनिआमधील गावक-यांनी पकडले. जगातील एकमेव अलबिनो गोरिला असल्याने स्नोफ्लेक प्राणी संग्रहालयात खूप प्रसिद्ध होता. २००३ मध्ये त्वचेच्या कर्करोगाने त्याचे निधन झाले.
स्पॅनिश शास्त्रज्ञांनी गोरिलाच्या संपूर्ण जनुकांची  क्रमवारी लावून स्नोफ्लेक हा कदाचित काका आणि पुतणीच्या प्रजननातून जन्मलेला असल्याचा निष्कर्ष काढला. मानवात चार जनुक परिवर्तने अलबिनिझमसाठी कारणीभूत असतात.  वर्णरहीत त्वचा, डोळे आणि केस  ही त्याची लक्षणे आहेत. अलबिनिझम प्रकारातील व्यक्तींना रंगद्रव्याच्या अभावामुळे दृष्टिदोष आणि त्वचेच्या कर्करोगाचा खूप मोठा धोका असतो. स्नोफ्लेकच्या गोठवलेल्या रक्ताच्या नमुन्यावरून शास्त्रज्ञांनी त्याच्या संपूर्ण जनुकांची  क्रमवारी लावण्यात यश मिळवले.
लाईव्हसायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, या क्रमवारीची तुलना मानवाशी आणि नॉनअलबिनो गोरिलाशी करून शास्त्रज्ञ मार्कस्-बोनेट आणि त्यांच्या सहका-यांनी स्नोफ्लेकच्या अलबिनिझमचे सहस्य उलगडले.  एकच जनुकीय संरचना ज्याला शास्त्रीय भाषेत एसएलसी४५ए२असे म्हणतात हे त्याच्या अलबिनिझमचे कारण असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. स्नोफ्लेककडे ही जनुकीय संरचना त्याच्या मातापित्यांकडून आली असून, अशाच प्रकारची जनुकीय संरचना अलबिनिझम असलेल्या उंदरं, घोडा, कोंबडी आणि माशांच्या काही जातींमध्येसुद्धा या आधी आढळली आहे.
शास्त्रज्ञांनी स्नोफ्लेकच्या जनुकांचा अभ्यास केला असता, सगोत्र प्रजननामुळे आलेले अनेक एकसारखे डीएनए त्याच्यात अढळून आले. स्नोफ्लेकमध्ये असलेली त्याच्या माता आणि पित्याची १२ टक्के जनुके एकासारखी होती. ही आकडेवारी स्नोफ्लेकचा जन्म हा काका आणि पुतणीच्या प्रजननातून झाला असल्याचे सुचित करते. अन्य कोणत्याही वेस्टर्न लोलॅन्ड गोरिलामध्ये अशाप्रकारचे सगोत्र प्रजनन आढळल्याची माहिती नाही. गोरिलाच्या काही उपजती ज्यांची संख्या खूपच कमी आहे ते प्रजनानासाठी कुटुंबाकडे वळत असल्याची माहिती  मार्कस्-बोनेट यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 11:13 am

Web Title: mystery of the only known albino gorilla solved
टॅग : Dna
Next Stories
1 ‘विश्वाबद्दल बोलू काही..’
2 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वेगळी जीवसृष्टी
3 प्लास्टिकची दुसरी क्रांती
Just Now!
X