सूर्यमालेचे आयुर्मान आणि तिची रचना, पृथ्वी आणि चंद्राचा भूशास्त्रीय इतिहास या अभ्यासविषयाच्या अनुषंगानेही उल्कापाषाणांची मदत घेतली जाते. मोठय़ा उल्कापातांमुळे पृथ्वी आणि चंद्र यांचे पृष्ठभाग बदलले आहेत. काही शास्त्रज्ञ तर असेही मानतात की चंद्राची उत्पत्तीही अशा प्रकारच्या आघातातून झाली आहे, तर काहींना असे वाटते की पृथ्वीवरील सजीवांच्या निर्मितीसही उल्कापाषाणांमधून आलेले रासायनिक पदार्थ कारणीभूत असावेत.

आम्हाला लहानपणी उन्हाळ्यात रात्री गच्चीत झोपायला मजा यायची. आमचे घर जरी शहरात असलं तरी त्या वेळी आजच्यासारखा दिव्यांचा खूप झगमगाट नसायचा. त्यामुळे चांदणं अगदी छान दिसायचं. जे आकाशात चमकतंय ते ‘चांदणी’, थोडा मोठा दिसतोय तो ‘तारा’ आणि रोज कला बदलणारा खूप मोठा तो चंद्र इतपतच ज्ञान त्यावेळी होतं. एकदा पहाटे उठवून आईनं धुमकेतू दाखवल्याचंही आठवतंय. मध्येच एखादी उल्का आकाशातून खाली झेपायची. ती पडताना पहिल्यांदा कोणी पाहिली यात मुलांमध्ये चढाओढ लागायची आणि झोप लागेपर्यंत वेळ छान जायचा. अर्थात अशी एखादी चांदणी खाली येताना दिसणं वेगळं आणि एकाच वेळी अशा अनेक चांदण्या मोठा गडगडाट करत लंबवर्तुळाकारात खाली येताना दिसणं निराळं आणि विरळंही, ज्याला उल्कावर्षांव असं म्हणतात. काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती की भारतात अनेक ठिकाणांहून एका रात्री उल्कावर्षांव दिसणार आणि ते दृश्य विलोभनीय असेल. दिवस थंडीचे होते. आम्ही सगळेच गच्चीत बराच वेळ कुडकुडत बसलो पण तसं काही झालं नाही!
याची आठवण यायचं कारण म्हणजे गेल्या फेब्रुवारीत रशियात झालेला उल्कावर्षांव आणि त्या पाठोपाठ त्यावरील बातम्यांचा वर्षांव. शिवाय त्याच महिन्यात भारतीय भूशास्त्र मंडळाच्या मासिकात २२ मे २०१२ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे झालेल्या उल्कावर्षांवावर प्रसिध्द झालेला एक वैज्ञानिक लेखही वाचनात आला. अवकाशातून पृथ्वीवर येऊन कोसळणाऱ्या घन पदार्थाला उल्का (मिटिऑर) असं म्हणतात. तिचा कोसळण्याचा वेग घर्षण निर्माण करतो आणि तो घन पदार्थ चमकतो. बहुतेक उल्कापातांची नोंद अशा पडताना दिसण्यातून आणि लगेच जमिनीवर पडलेल्या गोळा करण्यातून होत असते. अशा प्रकारच्या नोंदींना ‘फॉल’ (ऋं’’) असं म्हणतात. उल्का कोसळल्यावर मात्र ती बरीचशी दगडासारखीच दिसते म्हणून तिला उल्कापाषाण किंवा अशनी असं संबोधलं जातं. असे उल्कापाषाण उल्कापातावेळी पडताना दिसले नाहीत पण ते नंतर जमिनीवर सापडले तर त्या उल्कापाताच्या नोंदीस ‘फाइंड’ (ऋ्रल्ल)ि असं म्हणतात.
उल्कावर्षांवाच्या विरळेपणामुळे यापूर्वी ते कुठे आणि कसे झाले याच्या नोंदी मनोरंजक ठरतात. नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या संकेतस्थळावरील उल्कापाताच्या नोंदींनुसार सर्वात जास्त उल्कापाषाण सापडणारा भूभाग म्हणजे अंटाíक्टका आणि या उतरंडीवर भारताचा आठवा क्रमांक लागतो. अंटाíक्टका खंड म्हणजे उल्कापाषाणांची खाणच. एकूण नोंदींपकी सुमारे २०,००० नोंदी या एकटय़ा अंटाíक्टकावरील आहेत आणि पृथ्वीवरील इतर एकत्रित नोंदींपेक्षा ही संख्या कितीतरी पटीनं जास्त आहे. याचं मुख्य कारण असं की तेथील भूभाग बर्फाळ आहे आणि अशा बर्फाळ भागात उल्कापाषाण सापडणं फारसं अवघड जात नाही!
शिवाय या भूभागावर कुठल्याही एका देशाचं नियंत्रण नाही. यानंतरचा क्रमांक लागतो तो वाळवंटी भागाचा. सपाट प्रदेश, अती कोरडे हवामान यामुळे तिथं शेकडो वर्षांपूर्वी पडलेल्या या उल्कापाषाणांवर क्षय (६ीं३ँी१्रल्लॠ) किंवा अवसादनासारखे (२ी्िरेील्ल३ं३्रल्ल) परिणाम होत नाहीत. तसंच पांढऱ्या वाळूवर हे काळसर उल्कापाषाण चटकन उठून दिसतात.
सायबेरियातील तुंगुस्का इथं १९०८ साली झालेला उल्कापात आतापावेतो ज्ञात असलेल्या उल्कापातातील सर्वात मोठा गणला जातो. तो ‘तुंगुस्का इव्हेंट’ या नावाने प्रसिध्द आहे. या उल्कापातामुळे सुमारे आठ कोटी वृक्ष जळून भस्मसात झाले होते. भारतातील उल्कापाषाणांचे १३२ संदर्भ नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या संकेतस्थळावरील उल्कापाताच्या नोंदीत सापडतात.  उल्कावर्षांव होतो तेव्हा अनेकदा ते घन पदार्थ परग्रहावरील धुलीकणाच्या रूपातच असतात. अर्थात जेव्हा मोठय़ा आकाराचे घन पदार्थ कोसळतात तेव्हा पृथ्वीवर मोठे विवर / खड्डे निर्माण होतात. महाराष्ट्रातल्या लोणार सरोवराचे आपल्यासमोर मोठे उत्तम उदाहरण आहे.
 पृथ्वीवर येऊन आदळणाऱ्या उल्का या मंगळ आणि गुरू यामधील लघुग्रहातील पट्टय़ातून येतात असे ढोबळपणे मानलं जातं. अवकाशात हे घन पदार्थ दुसऱ्या एखाद्या वस्तूवर आदळून सूर्याच्या भ्रमण कक्षेतून बाहेर फेकले जातात किंवा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे भ्रमण कक्षेबाहेर पडतात. याशिवाय काही उल्का चंद्र आणि मंगळ या ग्रहावरूनही आलेल्या असतात. चंद्राला किंवा मंगळाला दुसऱ्या कशाचा तरी धक्का लागल्यामुळे त्यांचा टवका उडतो. तो धक्का इतका जबरदस्त असतो की तो टवका त्या ग्रहावरून बाहेर पडून त्यांचा प्रवास सूर्याच्या भ्रमण कक्षेत होतो आणि शेवटी तो उल्कापाषाणाच्या रूपात पृथ्वीवर विसावतो.
फेब्रुवारी २०१३ मध्ये रशियात उरल पर्वतराजीजवळ झालेल्या उल्कावर्षांवामुळे सुमारे ९०० जण जखमी झाल्याच्या बातम्या आहेत. गेल्या वर्षी काटोल येथे पडलेल्या उल्कांमुळेही थोडेसे नुकसान झालेच. उल्कापाषाण घरांवरील पत्रे फोडून आत आले. हा उल्कापात अकोला ते नागपूर या २०० कि.मी. पट्टय़ातील लोकांना त्यावेळी झालेल्या मोठय़ा आवाजामुळे जाणवला. तर काहींनी लालसर ते पिवळसर-लाल तप्त गोळे पडताना पाहिले. या उल्का पडताना किमान दोन वेळा तरी त्यांचे विखंडन (ऋ१ंॠेील्ल३ं३्रल्ल) झालं असं गोळा केलेल्या उल्कापाषाणांवरून दिसतं. पहिला वर्षांव अकोला ते मोर्शी भागात झाला आणि त्या उल्का पडतानाच जळाल्या असा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे, तर दुसरा वर्षांव काटोलच्या सुमारे दोन कि.मी. परिघात झाला. या उल्का लंबगोल पध्दतीने खाली आल्या. त्यातल्या मोठय़ा आकाराच्या उल्का पाषाणाच्या रूपात लंबगोलाच्या शेवटास (ऋं१ील्ल िऋी’’्रस्र्२ी) उत्तरेकडे आणि लंबगोलाच्या उत्तर-पूर्व बाजूस विखुरल्या गेल्या, लंबगोलाच्या दक्षिण-पश्चिम दिशेस पडलेल्या उल्का तुलनेने लहान आकाराच्या होत्या.
भारतात झालेल्या उल्कावर्षांवाच्या इतिहासात डोकावलं तर सर्वात जास्त अभ्यास गुजरात राज्यातील धजला इथं जानेवारी १९७६ मध्ये झालेल्या उल्कापाषाणांवर झालेला आहे. सुमारे २६ शोधनिबंध यावर लिहिले गेले. हा वर्षांव लंबगोलात सुमारे १८ कि.मी. लांबीत झाला. वर्षांव होताना तेथील रहिवाशांनी चंद्रापेक्षा जास्त चमकणारा तप्त गोळा मोठे स्फोट करत खाली येताना पाहिला.  अहमदाबादच्या पदार्थविज्ञान संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. भंडारी आणि डॉ. लाल (हे नुकतेच निवर्तले) यांनी त्या भागातल्या शाळांमधल्या मुलांना गोळा केलं. त्यांना हे उल्कापाषाण कसे दिसतात हे समजावून सांगितलं, काही नमुने दाखवले आणि या विद्यार्थ्यांनी हा सुमारे १८ कि.मी. चा परिसर अक्षरश: िपजून काढला. या वर्षांवातले सुमारे ३०० तुकडे गोळा केले. ज्यांचं एकूण वजन जवळ जवळ ४५ किलो इतकं भरलं. यातील सर्वात मोठा तुकडा १२ किलोग्रॅम वजनाचा होता.
दुसरी एक या संदर्भातली महत्त्वाची नोंद म्हणजे बिहारमधील गया जिल्ह्यातील शेरघाटी भागात ऑगस्ट १८६५ साली झालेला उल्कापात. मंगळावरून आलेल्या उल्केचे हे जगातील पहिले ज्ञात उदाहरण आहे. सुमारे ५ किलो वजनाचा उल्कापाषाण तो पाहाणाऱ्यांनी लगेच मिळवला.  लघुग्रहांच्या पट्टय़ातून येणाऱ्या उल्कांचे वय सूर्यमालेच्या वयाइतकेच म्हणजे साधारण साडेचार अब्ज वर्ष असतं. पृथ्वीवरील कुठलेही खडक इतके प्राचीन नसतात. कारण त्यांच्यात पृथ्वीवरील घर्षण आणि भूगर्भातील सतत होणाऱ्या बदलांमुळे अव्याहत नवनिर्मिती होत असते. त्यामुळे पृथ्वीवर इतके जुने खडक मिळणे जवळ-जवळ अशक्यच!
मंगळावरून आलेल्या शेरघाटीतील उल्कापाषाणाचे यामुळेच जास्त महत्त्व. हा उल्कापाषाण मंगळावरील भूभागाच्या अंतर्भागाची कोडी सोडवण्यास मदत करतो. हा उल्कापाषाण सुमारे ४.१ कोटी वर्षांपूर्वीचा आहे आणि नंतरचे शेकडो वर्षांचे त्यावर संस्कार झाल्याने तिथल्या उत्क्रांतीची झलक तो दाखवतो. चंद्रावरील उल्कापाषाण अपोलो आणि तत्सम चांद्रमोहिमेदरम्यान गोळा केलेल्या खडकांशी साधम्र्य दाखवतात.
हे उल्कापाषाण काही सेंटिमीटर ते अगदी मीटरभर व्यासाच्या आकाराचेही असतात पण त्यांना विशिष्ट आकारात बसवणे मात्र अशक्य आहे. ते शक्यतो ओबडधोबडच दिसतात पण वेगाने खाली येताना त्यांचं घर्षण होत जातं आणि त्यामुळे ते गुळगुळीत होतात. त्यांना कंगोरे नसतातच. अर्थात काही उल्कापाषाणांवर घर्षणावेळी वितळलेल्या वरच्या थरामुळे लांब ओरखडे मात्र दिसतात. सर्वसाधारणपणे ते पृथ्वीवरील त्याच आकाराच्या दगडापेक्षा मात्र बरेच जड असतात. कारण त्यांच्यात निकेल आणि लोखंडाचे प्रमाण अधिक असते. त्यांच्यातील लोखंडाच्या अंशामुळे ते चुंबकाकडे आकर्षलेि जातात. उल्कापात झाल्यानंतर लगेचच गोळा केलेल्या उल्कापाषाणांचा रंग काळाच पण चमकदार असतो त्याचे कारणही वातावरणातून खाली येताना त्याचे हवेशी घर्षण हेच आहे.
उल्कापाषाणांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण त्यातील खनिजांचे प्रमाण आणि ते कुठल्या ग्रहावरून आले त्यानुसार केले जाते. सर्वसामान्यपणे आतापावेतो आढळलेल्या उल्कापाषाणात (सुमारे ९४%) ‘खडकाळ’ (२३ल्ल८) गुणधर्माचे उल्कापाषाणच असतात. यात मुख्यत्वेकरून सुमारे ७५-९० % गारगोटी आणि १०-२५% निकेल-लोखंड मिश्रधातू आढळतो. या प्रकारातही दोन उपजाती आहेत. (१) कॉन्ड्राईट् – यात चुना आणि अ‍ॅल्युमिनियमचा अंश इतर खनिजांसोबत आढळतो. हा दगडातील सर्वात प्राचीन प्रकार जो अद्याप त्याचे गुणधर्म टिकवून आहे. काटोल येथे झालेल्या उल्कापातात याच प्रकारच्या उल्कापाषाणांचा वर्षांव झाल्याचं दिसतं. (२) अकॉन्ड्राईट् – या प्रकारचे उल्कापाषाण वेगळ्या लघुग्रहांवरचे असतात. घन पदार्थाच्या एखाद्या टकरीमुळे वितळलेला लाव्हा वेगाने बाहेर पडून पुन: गोठला जाऊन हे तयार होतात. साध्या नजरेला त्यांच्यात आणि पृथ्वीवरच्या खडकात फरक करता येत नाही म्हणून त्यांचा शोध तितकासा सोपा नसतो. उल्कापाषाणांचा दुसरा एक प्रकार म्हणजे ‘लोह-अश्म’. यात त्याच्या नावाप्रमाणे लोखंडाचे अतिरिक्त प्रमाण असते. त्यांची घडण निकेल-लोह मिश्रधातूंमधून झालेली असते आणि त्यामुळे ते पृथ्वीच्या कवचाचेच गुणधर्म धारण करतात. सुमारे ५% उल्कापाषाण आजपावेतो अशा स्वरूपात सापडले आहेत. काटोल येथील उल्कापातातही काही उल्कापाषाणांवर अशा प्रकारचे लोह-निकेलचा अंश जडवलेले छोटे गोळे आढळले आहेत, तर नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या संकेतस्थळावरील भारतात मिळालेल्या उल्कापाषाणांच्या नोंदीत केवळ ८ नोंदी लोह-अश्माच्या आढळतात. उल्कापाषाणांचा तिसरा प्रकार म्हणजे ‘लोह-खडकाचा’ (२३ल्ल८-्र१ल्ल). यात गारगोटी आणि निकेल-लोहाचे प्रमाण सम असते. भारतातील सिंगूर येथील मिळालेल्या उल्कापाषाणात अशी एकुलती एक नोंद नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या संकेतस्थळावरील यादीत आहे. भारतात सापडलेले उल्कापाषाण ही देशाची संपत्ती समजली जाते आणि ती भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत जमा केली पाहिजे असा कायदा आहे, तर अमेरिकेच्या कायद्यात ज्याच्या जमिनीवर तो सापडला त्याला त्याचा मालकी हक्क दिला आहे. सहाराच्या वाळवंटात शेकडय़ांनी असे उल्कापाषाण सापडतायत असे १९८०-९० च्या दरम्यान परकियांना कळलं तेव्हा तिथं अनेक वैज्ञानिक, हौशी मंडळींनी सहली आयोजित केल्या. काही जणांनी ते गोळा करून त्याचा संग्रह आणि व्यापार करायला सुरुवात केली.
जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा स्थानिक मंडळींनीही यात हात धुवून घेतले. विशेषत: लिबिया, मोरोक्कोसारखे देश यात आघाडीवर होते. त्या देशातील भटक्या जमातींनी तर वाळवंट अक्षरश: िपजून काढून अनेक उल्कापाषाण गोळा केले. आता ओमान, वगरे देशांनी त्यांच्या देशात सापडलेले उल्कापाषाण ही त्या देशाची ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून घोषित केली आहे आणि रशिया, अमेरिका आणि युरोपमधून हे गोळा करण्यासाठी आलेल्या चमूंना कायदेभंग केल्याबद्दल तुरुंगवासाची हवाही चाखवली आहे! इतकं असूनही अद्याप यांचा व्यापार राजरोसपणे चालतोय. इंटरनेटवरही याचा बाजार भरवणारी संकेतस्थळं आहेत.        
                                 

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

सर्वात पहिला उल्कापाषाण १६२१ साली जालंदर येथे सापडल्याची नोंद आहे, तर एकूण १० नोंदी महाराष्ट्राच्या नावावर आहेत. काटोल उल्कापातापूर्वी भारतात २००८ साली तामीळनाडूमधील होसूर भागात उल्कापात झाला होता, तर त्यापूर्वी हरयाणातील खेरी-माहम भागात मे १९८६ साली झालेला उल्कापात ज्ञात असलेल्या भारतातल्या उल्कापातात सर्वात मोठा असल्याचा दावा वैज्ञानिक करतात. एकूण ७३ किलो वजनाचे उल्कापाषाण या उल्कापातातून गोळा केले गेले. सर्वात मोठा उल्कापाषाण सुमारे २९ किलो वजनाचा होता. भारतात झालेल्या एकूण उल्कापातांच्या नोंदीपकी १२४ नोंदी ‘फॉल’ तर केवळ ८ नोंदी ‘फाइंड’ प्रकारात मोडतात त्यामुळे ‘फाइंड’ प्रकारात मोडणाऱ्या नोंदी एकूण नोंदींच्या किरकोळ प्रमाणात असतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.