प्लास्टिक हा उपयुक्त पदार्थ छोटय़ा छोटय़ा रासायनिक रेणूंचे शंृखलायुक्त महारेणूत संश्लेषण करून तयार केला जातो. वेगवेगळ्या रेणूपासून आज २० वेगवेगळ्या तऱ्हेचे प्लास्टिक तयार केले जाते. वजनाने हलका असलेला हा पदार्थ मानवी जीवनात विविध कार्यासाठी चपखल उपयोगी पडतो. त्याचे अगणित उपयोग आहेत व सार्वजनिक आरोग्यासाठी ते मोठय़ा प्रमाणात वापरत आहे. शरीरात विरघळून जाणारे शस्त्रक्रिया करताना वापरायचे धागे, शरीराचे कृत्रिम भाग, ही त्याची उदाहरणे होत. शिवाय, कमी ऊर्जा वापरून कमी किमतीत संश्लेषित केले जाणारे प्लास्टिक नरम, पारदर्शक किंवा लवचीक असते. त्यापासून हात मोजे, डायलेसिसच्या नळ्या, शरीरांतर्गत वापरायच्या पिशव्या, प्लास्टिक सिरीज या उपयुक्त वस्तू डिस्पोजेबल स्वरूपात बनवता येतात. त्यामुळे, अशा साधनांचे एरवी वारंवार करावे लागणारे र्निजतुकीकरण टाळता येते.

प्लास्टिकला वामनाचे चौथे पाऊल म्हणतात, ते काही उगाच नाही. आपले सारे जीवन या पदार्थाने आपल्या विविध रूपात व्यापले आहे. जगणे हलके-फुलके करण्यात त्याचा वाटा आहे पण त्याच वेळी जमिन-पाण्यातील प्रदूषणासोबतच मानवी आरोग्याला ते बाधा पोहोचवित आहे.
अ‍ॅरीझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या बायोडिझाइन इन्स्टिटय़ूट या संस्थेतील एक संशोधक रॉल्फ हेल्डन यांनी प्लास्टिकच्या रासायनिक पाऊलवाटेचा मागोवा घेत, त्याचा पर्यावरण आणि मानवी स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांचा छडा लावला आहे.  प्लास्टिक हा उपयुक्त पदार्थ छोटय़ा छोटय़ा रासायनिक रेणूंचे शंृखलायुक्त महारेणूत संश्लेषण करून तयार केला जातो. वेगवेगळ्या रेणूपासून आज २० वेगवेगळ्या तऱ्हेचे प्लास्टिक तयार केले जाते. वजनाने हलका असलेला हा पदार्थ मानवी जीवनात विविध कार्यासाठी  उपयोगी पडतो. त्याचे अगणित उपयोग आहेत व सार्वजनिक आरोग्यासाठी ते मोठय़ा प्रमाणात वापरत आहे. शरीरात विरघळून जाणारे शस्त्रक्रिया करताना वापरायचे धागे, जैव अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या उती, शरीराचे कृत्रिम भाग, ही त्याची उदाहरणे होत. शिवाय, कमी ऊर्जा वापरून कमी किमतीत संश्लेषित केले जाणारे प्लास्टिक नरम, पारदर्शक किंवा लवचीक असते. त्यापासून हात मोजे, डायलेसिसच्या नळ्या, शरीरांतर्गत वापरायच्या पिशव्या, प्लास्टिक सिरीज या उपयुक्त वस्तू गरजेनुसार तयार करता येतात व एकदा वापर करून टाकून देता (डिस्पोजेबल स्वरूपाच्या) येतात. त्यामुळे, अशा साधनांचे एरवी वारंवार करावे लागणारे र्निजतुकीकरण टाळता येते. ही र्निजतुकीकरणाची प्रक्रिया महागडी असतेच, पण फारशी परिणामकारक देखील नसते. शिवाय या एकदाच वापरायच्या प्लास्टिकच्या वैद्यकीय साधनांमुळे रक्तातून पसरणाऱ्या हिपॅटिटीस बी आणि एचआयव्ही रोगांना आळा बसतो. वैद्यकीय क्षेत्रात प्लास्टिक साधनांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढत असल्यामुळे नानातऱ्हेच्या बहुशृंखलीय प्लास्टिक रेणूंची निर्मिती होत आहे.
परंतु, हॅल्डेनसारखे संशोधक याबाबत सावधगिरीचा इशारा देत आहेत. प्लास्टिक साधनांच्या सातत्याच्या संपर्कामुळे शरीराच्या आत त्याच्या विघटनाने निर्माण झालेल्या घटकांचे प्रमाण वाढत जाते व ते शरीराला बाधक ठरू शकतात. बिस्फेनोल ए (BPA) आणि डायएथिलएक्सील थॅलेट (DEHP) या प्लास्टिकच्या दोन प्रमुख घटकांमुळे प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होतो, ही प्राण्यांवरील प्रयोगात सिद्ध झालंय. अमेरिकेत झालेल्या पाहणीत ९५ टक्के प्रौढांच्या लघवीत या दोन रसायनांचा प्रादुर्भाव वाढलेला आढळला आहे. या रसायनाच्या शरीरातील अस्तित्वामुळे अकाली कामेच्छा, प्रजोत्पादन क्षमतेचा ऱ्हास, आक्रमक स्वभाव इ. लक्षणे दिसून येतात. पॉलीव्हायनील या प्लास्टिकमध्ये असलेले डी.ई.एच.पी. हे रसायन इन्सुलीन या संप्रेरकाच्या निर्मितीला बाधा आणणे, कमरेचा घेर वाढणे, स्त्री-पुरुषांच्या लैंगिक कार्यात अडथळा आणणे, अशी दृष्कृत्ये करीत असते. त्यामुळे प्लास्टिकशी निगडित मूलभूत रसायनांचा आरोग्यांवर नेमका काय परिणाम होतोय याचा संशोधक आपल्या प्रात्यक्षिक अभ्यासातून छडा लावीत आहेत. काही रसायने ही प्लास्टिकची अंगभूत घटक नसतात, तर प्लास्टिकच्या विशिष्ट कार्याला पूरक ठरणारी रासायनिक पुरके असतात. तीच तर जास्त हानीकारक असल्याचे आढळत आहे.
जगभरातील वापरात असलेल्या प्लास्टिक पदार्थाची उलाढाल लक्षात घेतली, तर संशोधकांनी दिलेला इशारा किती गंभीर स्वरूपाचा आहे, हे लक्षात येईल. दरवर्षी जगात ३० कोटी मेट्रीक टनाइतक्या प्लास्टिकच्या वस्तू तयार  होत असतात. त्यातील साधारण ५० टक्के पदार्थ एक वर्षांच्या आत टाकावू बनतात. एकटय़ा अमेरिकेतील इस्पितळातील प्लास्टिकचा कचरा १५ ते २५ टक्के पर्यंत पोहोचतो. या प्लास्टिक कचऱ्यांची विल्हेवाट लावणे मोठय़ा जिकिरीचे काम आहे. प्लास्टिकचे जैवविघटन सहसा होत नाही. त्यामुळे तो जमिनीत डांबल्यावर कोंडल्यागत पडून राहतो. जमिनीचा कस कमी करतो. काही कचरा भट्टीत जाळला जातो. काहीची भुकटी करून त्याची पुनर्निर्मिती (recyling) करण्यात येते. नव्या प्रकारच्या प्लास्टिकचे काही प्रमाणात जैवविघटन होत असले, तरी त्याचे शृंखलाघटक असलेले छोटे रासायनिक रेणू वातावरणात विखरून प्रदूषण करतात. प्लास्टिकचा कचरा जाळला जातो, तेव्हा हवेत हरितगृह वायू मुक्त होतात. जमिनीत गाडलेले टाकावू प्लास्टिक त्याच्या प्रचंड प्रमाणामुळे पाण्यातून झिरपून जमिनीच्या पोटाखालील पाण्यात जमा होऊ शकते. प्लास्टिकची पुनर्निर्मिती करताना खूप दक्षता घ्यावी लागते. शिवाय हे प्लास्टिक वैद्यकीय साधनांसाठी निरुपयोगी ठरते. कारण त्याचा मूळचा दर्जा खालावलेला असतो.
प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या विविध स्वरूपी समस्यांना तोंड देण्यासाठी संशोधक वेगवेगळ्या उपायांच्या शोधात आहेत. धातूमय उत्प्रेरके (catalysts वापरून कार्बन डायोक्साइड व कार्बन मोनोक्साइड वायूपासून, जैविक विघटन होणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी संशोधक धडपडत आहेत.
त्यातून दोन फायदे होतील. एकतर ग्लोबल वॉर्मिगला कारणीभूत ठरणारे हरितगृह वायू वापरून कमी होतील आणि दुसरे मक्यासारख्या मानवी अन्नाचा भाग असलेल्या वनस्पतीपासून जैविक प्लास्टिक निर्माण करण्याचा भार कमी होईल.
सामान्य माणसांनी इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी. झटपट वापरून फेकून देता येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, बाजारहाटाच्या पिशव्या, पॅकेजिंगच्या पट्टय़ा, फोमचे कप, दात साफ करण्याच्या छोटय़ा फितीचे धागे, या सारख्या वस्तू छोटय़ा काळासाठी उपयुक्त वाटतात, पण वापरून फेकून दिल्यानंतर या साऱ्यांचा कचरा पर्यावरण आणि मानवी आरोग्य यास धोका पोहोचवित असतो. यास्तव अमेरिकेतील इस्पितळात ‘डिस्पोजेबल’ वस्तूंचा वापर टाळला जात आहे व पुन्हा पुन्हा वापरता येणारी प्लास्टिक साधने लोकप्रिय होत आहेत.
जपानमधील निहोन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकताच आग्नेय आशिया आणि उत्तर अमेरिकेतील वीस देशांच्या समुद्रावरील वाळूचे आणि पाण्याचे नमुने तपासले. तेव्हा त्यांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले. शरीरातील इंडोक्राइन ग्रंथीच्या कार्यात बाधा आणणारे व प्रजानन संस्थेत बिघाड आणणारे बी.पी.ए. रसायनाचे प्रमाण समुद्रकिनारी वाढीस लागलेले आहे. या रसायनाचा प्रादुर्भाव तिथे नेमका कसा झाला याचा छडा लावताना त्यांना समजले की समुद्रात कचरा म्हणून फेकून दिलेल्या कठीण पॉलिकाबरेनेट प्लास्टिक आणि जहाजाच्या पृष्ठभागावर वापरल्या जाणाऱ्या इपोक्सी प्लास्टिक पेन्टमधून ही रसायने समुद्राच्या पाण्यात घुसली होती. पॉलिकाबरेनेटचे प्लास्टिक खूप कठीण असते व त्यापासून स्क्रू-ड्रायव्हरची हँडल्स, ठिणग्यांपासून डोळ्यांचे रक्षण करणारी आयशिल्ड्स आणि अन्य टिकावू पदार्थ निर्माण करतात. त्यांचा कचरा समुद्राच्या पाण्यात विघटित होत असताना, बी.पी.ए. रसायने मुक्त होत असतात. एकटय़ा जपानमध्ये दरवर्षी १५,००० टन टाकावू प्लास्टिक येनकेन प्रकारेण समुद्रात ढकलले जाते व त्यामुळे जलचरांना धोका पोहोचू शकतो, असा इशारा तिथले शास्त्रज्ञ देत आहेत. त्याशिवाय या जपानी वैज्ञानिकांनी फोम प्लास्टिक निर्मितीसाठी वापरले जाणारे पॉलिस्टीरीन या स्थिर प्लास्टिकचे सुद्धा समुद्राच्या पाण्यात विघटन होत असल्याचा दावा केला आहे. सर्वसाधारण तापमानाला हे चिवट प्लास्टिक हळूहळू विघटित होते आणि स्टीरीन मोनोमर (SM) स्टीरीन डायमर (SD) आणि स्टीरीन ट्रायमर (ST) ही रसायने मुक्त होतात. ही तिन्ही रसायने कर्कप्रेरकी आहेत व निसर्गात ती अन्यथा अस्तित्वात नसतात. प्लास्टिकच्या या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी संशोधक सूक्ष्म जीवाणूंची मदत घेणार आहेत. शेफिल्ड युनिव्हर्सिटीतील सेंटर फॉर एन्वायर्नोमेंटच्या संशोधकांनी या दृष्टीने पावले उचलली असून, समुद्रकिनारी जोमाने वाढणारा नि प्लास्टिक फस्त करणारा जीवाणूच्या वाणाची ते परीक्षा घेत आहेत. प्लास्टिक विघटित होऊन, समुद्राच्या पाण्यात त्याचे  ५ मि.मी. आकाराचे किंवा त्याहून छोटे तुकडे तरंगत असतात. हे तुकडे (मायक्रोप्लास्टिक) जलचर सहजगत्या गिळतात व त्यांना हानी पोहोचू शकते. पण काही सामुद्रिक सूक्ष्म जीवाणू अशा तुकडय़ांवर वसाहत तयार करून त्यांना बायोफिल्मच्या रूपात झाकून टाकतात. त्यातील विषारी घटकाचे विघटन करून, सागराच्या पाण्याला सुरक्षित ठेवू शकतात.

How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट