जेव्हा अचानक गोळीबार होतो व एखादी व्यक्ती जखमी होते, युद्धात सैनिक जखमी होतात तेव्हा गोळीच्या जखमातून रक्त वाहात असते अशा वेळी फार कमी वेळात उपचार करणे आवश्यक असते ही गरज ओळखून आता गोळीबाराची जखम अवघ्या पंधरा सेकंदात भरून येईल अशी एक पाकिटाच्या आकाराची सिरिंज वैज्ञानिकांनी तयार केली आहे. या सिरिंजचे नाव एक्सस्टॅट असे असून ती ओरेगॉन येथील रेव्हमेडक्स या कंपनीने तयार केली आहे. या सिरिंजच्या मदतीने विशेष आवरण असलेले स्पाँजेस जखमेत भरले जातात. या सिरिंजने जखमीचे प्राण वाचू शकतात, जखम लवकर बरी करण्यास मदत होऊ शकते. पॉप्युलर सायन्स या मासिकात याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही जखमेत काहीतरी भरता त्याचा विस्तार होतो व रक्त वाहणे थांबते, असे अमेरिकेच्या लष्करी कारवाई विभागाचे माजी प्रमुख जॉन स्टेनबॉग यांनी म्हटले आहे. यात स्पाँजेस एक सेंटिमीटर आकाराच्या वर्तुळात कापून जखमेत भरले जातात, प्राण्यांवर हा प्रयोग यशस्वी झाला असून जेव्हा रक्त गळायचे थांबले तेव्हा आमचे डोळेच विस्फारले. आमचाच आमच्यावर विश्वास बसेना असे स्टेनबॉग यांनी सांगितले. त्यांनी एक्स आकाराचे मार्कर स्पाँजच्या रूपात तयार केले ते क्ष किरणांच्या मदतीने दिसू शकतात, अपघाताने कुठलेही स्पाँजेस शरीराच्या आतील भागात विशिष्ट आकार दिल्याशिवाय राहू शकत नाहीत हे स्पाँजेस जखम भरण्यासाठी अवघे १५ सेकंद घेतात व एक प्रकारचा दाब निर्माण करून तीव्र रक्तस्राव थांबवतात. स्पाँजेस हे ओलसर भागात चिकटतात त्यामुळे ते बाजूला फेकून रक्त बाहेर येत नाही, जेव्हा आपण जखमेवर बँडेज लावतो तोपर्यंत रक्तस्राव रोखण्याची ही अभिनव युक्ती आहे असे स्टेन बॉग यांनी सांगितले.