१५ मार्चपासून पैसाच पैसा! ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत वाढेल धनसंपत्ती
15 March Horoscope: बुद्धी, व्यवसाय आणि बोलण्यावर परिणाम करणारा ग्रह बुध आणि पैसा, प्रेम व ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र हे एकमेकांपासून ३० अंशांच्या अंतरावर येणार आहेत. त्यामुळे एक शक्तिशाली योग तयार होईल. १५ मार्च २०२६, रविवार रोजी रात्री १२:२६ वाजता बुध आणि शुक्र एकमेकांपासून ३० अंशांवर असतील. या स्थितीमुळे द्विद्वादश दृष्टि योग तयार होईल. या योगाचा फायदा ४ राशींच्या लोकांना होणार आहे. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील, पैशाचा लाभ होईल आणि व्यवसायातील अडचणी दूर होतील.