१६ ‘मे’ला ‘या’ ३ राशींचं रातोरात बदलणार नशीब! चंद्राचं डबल गोचर देणार दुप्पट फायदा…
16 May Horoscope: चंद्र ग्रह भावना आणि मनाचे कारक मानले जातात. सध्या चंद्र ग्रह तूळ राशीत गोचर करत आहेत. ज्योतिष शास्त्रात शनी जयंतीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, १६ मे २०२६ रोजी शनी जयंती येत आहे. या दिवशी चंद्र ग्रहाची चाल बदलणार आहे. शनी जयंतीच्या दिवशी चंद्र राशी बदल आणि नक्षत्र बदल करणार आहे. १६ मे रोजी रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत चंद्र १८ मेपर्यंत राहणार आहे.