एका दिवसात बदलणार नशीब! बुध उदय होताच ‘या’ राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा…
26 May Horoscope Budh Uday: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, व्यापार, संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा कारक मानलं जातं. ज्योतिषीय गणनेनुसार, ग्रहांचा राजकुमार बुध देव २६ मे रोजी वृषभ राशीत उदय होणार आहे. ज्योतिषात कोणत्याही शुभ ग्रहाच्या उदयाला विशेष महत्त्व दिलं जातं. बुध देव उदयाला येतात तेव्हा त्याचा थेट परिणाम जीवनाच्या अनेक गोष्टींवर दिसून येतो. बुधाचं हे परिवर्तन खास मानलं जात आहे, कारण ते मित्र राशीत उदयाला येत आहेत.