उद्या ‘या’ ५ राशींना भाग्याची साथ; पैसाच पैसा तर मिळेल आनंदाची बातमी, अचानक धनलाभ…
Today Horoscope 29 November: उद्या म्हणजे २९ नोव्हेंबर शनिवार असून मार्गशीर्ष महिन्याची नवमी तिथी असेल, ज्याला नंदन नवमी म्हणतात. त्या दिवशी शनिवारचे अधिपती शनी देव मीन राशीत मार्गी अवस्थेत असतील आणि त्यांच्यावर गुरूची नवमी दृष्टी असेल. उद्या चंद्राचा गोचर कुंभ राशीतून पुढे मीन राशीत होईल, ज्यामुळे चंद्र आणि गुरू यांच्या स्थितीतून वसुमान योग तयार होईल. तसेच सूर्य आणि गुरू यांच्यात नवम-पंचम योग बनेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या संयोगाने हर्ष योगही प्रभावी असेल.