अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व
Akshaya Tritiya 2026 Muhurat, Date, Puja Vidhi, Significance : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते. हिंदू पंचागांनुसार, अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या वर्षी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. दरम्यान, यावर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि त्याचे महत्त्व काय जाणून घेऊया.